twitter
rss

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄

*🖥♻ गुरुवर्य टिप्स् ♻🖥*

*आता क्षणार्धात शोधा आधार-बँक लिंकिंग...*

आधारकार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे पाहण्यासाठी आता मोबाइलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका पिन नंबरच्या आधारे आपले आधार कोणत्या बँकेशी लिंक आहे हे जाणून घेण्याविषयी मेसेज सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.
आपले आधारकार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे पाहण्यासाठी मोबाइल मध्ये *९९ *९९ # असे डायल केल्यानंतर पहिल्या ऑप्शनमध्ये आपला बारा अंकी आधार क्रमांक टाकून आपण तपासून पाहू शकतो, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आधार क्रमांक टाकल्यावर ते कोणत्या बँकेेशी लिंक आहे, याबद्दलची माहिती तत्काळ मिळत आहे. व्हायरल झालेली माहिती आणि पिन नंबरच्या आधारे बहुतांश जणांनी आपले आधार बँकेेशी लिंक असल्याचे पडताळूून पाहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आधार नंंबर बँक खात्याशी लिंक असणेे अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने बहुतांश जणांना याचा फायदा झाला आहे. आधार हे बँकेेशी लिंक असणे सध्या सर्वच ठिकाणी अनिवार्य आहे. संबंधित मेसेजेसमुळे बँकेेत आधारकार्ड लिंक तपासण्यासाठी लागणारा वेळ आणि कष्ट कमी झाले असून, अनेकांना याचा फायदा होत आहे.
--

*हे आहे अनिवार्य*

आधार नंबर बँक खात्याशी लिंक करण्यासाठी स्वतःचा मोबाइल नंंबर बँकेेशी लिंक असणे अनिवार्य आहे. मोबाइल नंबर बँकेेशी लिंक नसल्यास प्रथम तो लिंक करावा. ज्यांचा मोबाइल नंबर बँकेशी लिंक नाही त्यांना या सुविधेेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे या सुविधेेचा फायदा मिळविण्याठी मोबाइल नंबर बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे.

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_