twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣3⃣

*👩‍👧‍👦निराधार भावंडांचे विद्यार्थीच बनले पालक...!*

*- लिंगनूरच्या शाळेतील कहाणी*

*लिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला.*

By लोकमत न्यूज नेटवर्क

: _*हृदयाची नवी नाती गवसली; समाजासमोर माणुसकीचा नवा धडा*_

_*हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली.*_
_*पाठच्या बहिणीच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.*_

साभार~ मोहन मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला. मातृ-पितृ छत्र हरविल्यानंतर निराधार झालेल्या आठवीतील एका मुलाचे व त्याच्या बहिणीचे पालकत्व कोणी धनाढ्य व्यक्तीने नव्हे, तर त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांनी स्वीकारले. माणुसकीच्या वाटेवरची शाळेत जन्मलेली ही कहाणी नवा धडा बनून व्यावहारिक समाजासमोर आली आहे.
लिंगनूर येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इयत्ता बारावीच्या मुलांनी दिलेला माणुसकीचा धडा चर्चेचा विषय बनला आहे. याच शाळेत आठवी इयत्तेत शिकणाºया सूरज चंद्रकांत नाईक या मुलावर काही वर्षापूर्वी संकट कोसळले. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्याच्यावर आभाळ कोसळले. यातून सावरणं कोणालाही कठीणच. पण पाठच्या बहिणीच्या चेहºयाकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.

स्वयंपाकपाण्यापासून सगळ्या जबाबदाºया त्याने स्वत:वर घेतल्या आणि शिक्षणाचे दोरही बळकट केले. काट्याकुट्यांचा हा प्रवास तो मूकपणे चालत राहिला. पाच किलोमीटर अंतरावरील शाळा शिकताना सुरू असलेला या बहीण-भावाचा हा खडतर प्रवास त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांना दिसला. त्यांच्या हिमतीला केवळ दाद देऊन हे विद्यार्थी थांबले नाहीत. सामाजिक परिपक्वतेचे दर्शन घडविताना या विद्यार्थ्यांनी त्यांना हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली. स्वत:च्या खर्चासाठी आणलेल्या पैशातून वर्गणी काढून त्यांनी सूरज व त्याच्या बहिणीच्या शैक्षणिक वस्तूंची पूर्तता केली.

घरामध्ये आई, वडील असे मोठे कोणीच नसल्याने, घरातील सर्व कामे, तसेच लहान बहिणीसाठी व स्वत:साठीही जेवण तयार करण्याचे देखील काम सूरजलाच करावे लागते. हे सर्व करून परत शाळेला ५ कि.मी. चालत यावे लागते. त्यांची ही धडपड पाहून १२ वी मधील मुकुंद कुंभार, नितीन मगदूम, लक्ष्मण नाईक, प्रकाश पाटील, सदाशिव नाईक, बिरदेव गावडे, जोतिबा जाधव, विजय कांबळे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन, मुकुंद कुंभार या विद्यार्थ्याच्या घरातील वापरात नसलेली सायकल दुरुस्त करून घेतली व सूरजला दिली. तसेच कपडे, वह्या, पेन, चप्पल आदी साहित्यदेखील त्यांनी घेऊन दिले.

सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच शिक्षकांनी या निराधारांना आर्थिक अथवा वस्तुरूपी मदत करायला हवी. जे अपंग, अनाथ, निराधार, पीडित असतात, शिक्षणापासून वंचित असतात, जे प्रामाणिकपणे आपले कार्य करतात, अशा समाजातील मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे. आपण केलेली मदत कुणा गरजूच्या आयुष्यातील आशेचा एक किरण बनू शकतो.

- प्रा. सुनील खुट्टे
(बारावीचे वर्गशिक्षक, लिंगनूर)

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_