अक्षयपात्र'तर्फे वीस लाख विद्यार्थांना भोजन
- सकाळ
वृत्तसंस्था
बंगळूर - भारतातील
लहान-मोठ्या गावांतील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांना शाळेकडे परत
वळविण्यासाठी त्यांना दुपारच्या भोजनाची सेवा देण्याचे काम सुरू केले. या
शिक्षणाच्या चळवळीमध्ये मोलाचे काम "अक्षयपात्र‘ फाउंडेशन करत आहे. विविध सरकारी
शाळांमध्ये या संस्थेमार्फत दुपारचे जेवण पुरविले जाते. ही योजना त्यांनी 2001 ला सुरू केली. आजमितीला भारतातील तब्बल सुमारे 15-20 लाख मुलांना शाळेत भोजन मिळते.
या फाउंडेशनने नुकतेच
त्यांचे हे यश साजरे केले. या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भरभरून
कौतुक केले. ते म्हणाले, ""देशात भूकबळी ही अजूनही मुख्य समस्यांपैकी एक आहे. चौदा
वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण शासनाने करण्यासाठी घटनात्मक
आश्वासन दिले आहे.‘‘
अक्षयपात्र फाउंडेशनचे
अध्यक्ष आणि संस्थापक मधू पंडित दास म्हणाले, ""या उपक्रमाची सुरवात अवघ्या शंभर लोकांच्या मदतीने आणि दीड
हजार मुलांना सेवा देण्यापासून झाली. 2030 पर्यंत पन्नास लाख मुलांपर्यंत ही सेवा देण्याचा निश्चिय
केला आहे. देशात भुकेचा प्रश्न गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अक्षयपात्रचे पहिले
स्वयंपाकघर पश्चिम बंगाल येथे सुरू झाले. सध्या देशात 26 परिपूर्ण स्वयंपाकघरे आहेत. जगातील सर्वांत मोठा माध्यान्ह
भोजन कार्यक्रम आहे.
"या
योजनेतील प्रत्येक डब्याची किंमत अवघी अकरा रुपये इतकी आहे. अक्षयपात्र पुरवत
असलेल्या माध्यन्ह भोजनाच्या कार्यक्रमामुळे शाळेतील गळतीचे प्रमाण 18-20 टक्के कमी झाले असून, नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. या उपक्रमामुळे मुलींच्या
उपस्थितीत आणि त्यांच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडत आहे,‘‘
असे अक्षयपात्रचे ट्रस्टी मोहनदास पै यांनी एका खासगी
वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
मी जयपूरमधील
अक्षयपात्रच्या स्वयंपाकघराला भेट दिल्यानंतर तेथील अन्नपदार्थांचा दर्जा, चव, स्वच्छता ही खरोखरच कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नव्हती. मी देशातील
सर्व शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांना या स्वयंपाकघराला एकदा तरी भेट देण्याची विनंती करेन.
माध्यान्ह भोजनासाठी अक्षयपात्रचे स्वयंपाकघर जरून पाहा आणि शिका,‘‘
असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी
सांगितले.
---
या अक्षयपात्र संस्थेची
दहा राज्यांत एकूण 27 स्वयंपाकघरे आहेत.
त्यांच्या या
स्वयंपाकघरातील काम नक्की कसे चालते, हे पाहण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
👇
https://www.youtube.com/watch?v=I8FG5dlUtrE
सौजन्य : अक्षयपात्र
फाउंडेशन
📚📕📗📘📙📔📒📚
संकलन
गुरुवर्य
ग्रुप कवठेमहांकाळ सांगली