🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣3️⃣0️⃣
*कोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत*
Last Updated: May 29 2020 6:48PM
_*सुजाता सुहास रोकडे यांचे गहाळ झालेले मंगळसूत्र पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी परत केले.*_
साभार : पुढारी ऑनलाईन
एकीकडे कोरोनाचे भयानक संकट समोर आहे. या संकटाचा सामना महाराष्ट्र पोलिस देखील डोळ्यात तेल घालून करत आहेत. तर मुंबई, पुण्यातील पोलिसांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली आहे. यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. त्यांना सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र त्यांनी परत केले आहे. या मंगळसूत्राची किंमत साधारण सव्वा लाख रुपये आहे. त्या दांपत्यास ते सोने परत मिळाल्याने त्यांनी पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचे आभार मानले.
कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदी आहे. जिल्हाच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त आहे. या सीमेवरुन अत्यावश्यक सेवेसाठी लोकांची ये-जा सुरु असते. काल चिकुर्डे येथील चेकपोस्टवर मांगले गावचे रहिवासी सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता सुहास रोकडे या कोल्हापूर येथे हॉस्पिटलला जाण्यासाठी चेकपोस्टवर आल्या होत्या. यावेळी गावी परत जाताना त्यांचे अडीच तोळ्याचे मंगळसूत्र गहाळ झाले. ते कुरळप पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन मोरे यांना सापडले.
याबाबत पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी सर्व व्हॉटसअॅप सग्रुपला कल्पना दिली व ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले. संबंधीत मांगले या गावाच्या रोकडे दांपत्यास ओळख पटवून आज पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी हा मोलाचा दागिना प्रामाणिकपणे कसलेही बक्षीस न स्वीकारता त्यांना दिला. हा दागिना घेताना अक्षरशः त्या दांपत्याला गहिवरुन आले होते. शाबासकीची थापही दिली. पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचे कौतुक होत आहे.
https://www.pudhari.news/news/Sangli/police-return-gold-sangli/m/
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला अवश्य भेट द्या.