*💻 लॅपटॉपसाठी कुलिंग पॅड कसा निवडाल*
*॥गुरुवर्य ग्रुप टिप्स ॥*
_लॅपटॉप सतत वापरत असताना तो नेहमी गरम होतो. लॅपटॉपची हिट कमी करण्यासाठी आपण कुलिंग पॅड विकत घेतो. मात्र कधी कधी हे कुलिंग पॅड नावापुरतेही उपयोगाला येत नाहीत. अशावेळेस कुलिंग पॅड निवड करताना नेमके कोणते पॉइंट लक्षात घ्यायला हवेत याविषयी थोडंसं._
तुमचा लॅपटॉप वापरात असताना फार गरम होतो का? तापमान अधिक वाढल्याने तुमच्या लॅपटॉपचा आयुष्यकाळ कमी होऊ शकतो आणि त्याच्या परफॉर्मन्सवरही परिणाम होऊ शकतो. इतकंच काय, अगदी संपूर्ण सिस्टम फेल होऊ शकते, हे तुम्हाला माहीत आहे काय? ओह! हा त्रास सिस्टम फेलरसाठी नाही तर आता उष्णतेमुळे लॅपटॉप मांडीवर घेऊन वापरता येणार नाही, यासाठी आहे.
खरे पाहता, लॅपटॉप गरम होणे ही लॅपटॉप वापरकर्त्यांना भेडसावणारी एक सामान्य समस्या आहे. अधिक वेळ वापर असल्यास त्यातील इन-बिल्ट कुलिंग सिस्टम इतका वेळ बँडविथ पुरवू शकत नाही, इतके साधे कारण यामागे आहे. मात्र, या साध्या समस्येवर उपायही तितकाच साधा आहे.
तुमचा लॅपटॉप गरम होऊ नये आणि त्याचे ऑपरेटिंग तापमान कमी राहावे यासाठी कुलिंग पॅड हा उत्तम पर्याय आहे. मात्र, सर्व कुलिंग पॅड्समुळे ही समस्या दूर होतेच, असे नाही. त्यामुळे कुलिंग पॅड निवडताना खाली दिलेल्या काही साध्या गोष्टी ध्यानात ठेवा -
👉सोबत नेण्यास सोयीस्कर :
आजच्या डायनॅमिक जगात कामामुळे तुम्हाला जगभरात फिरावे लागते. त्यामुळे, तुमचा ‘बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर’ म्हणजे लॅपटॉपही तुमच्यासोबतच असतो. त्यामुळेच, कुलिंग पॅड वजनाला हलके आणि वाहून नेण्यास सोपे असावे. तुमच्या बॅगेत सामावू शकेल, अशा आकाराचे असावे. त्याचवेळी तुमच्या लॅपटॉपच्या आकाराचेही असावे. कारण, त्यामुळेच अचूक परिणाम साधता येईल.
👉यूएसबी पॉवर्ड :
यूएसबी पॉवर्डचा पर्याय असलेल्या कुलिंग पॅडची निवड करा. त्यामुळे, ऊर्जा प्रवाह नसतानाही यूएसबीने जोडलेला कुलिंग पॅड तुमच्या लॅपटॉपला थंड ठेवेल. शिवाय, यूएसबी पॉवर्ड कुलिंग पॅड कधीही, कुठेही वापरता येतात. त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिक बटनावर अवलंबून राहावे लागत नाही.
👉कुलिंग कॅपॅसिटी :
लॅपटॉप कुलरच्या परफॉर्मन्समधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून बाहेर पडणा-या हवेचे प्रमाण. हे अगदी साधे आहे – लॅपटॉप कुलरचे पंखे जितके अधिक शक्तिशाली तितक्या जास्त क्षमतेने ते लॅपटॉपला थंड ठेवतील.
👉शांतपणा :
आवाज हा आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही काम करा किंवा लॅपटॉपवर एखादा गेम खेळा, कोणत्याही प्रकारच्या आवाजाने तुमच्या कामात व्यत्यय येणारच. सुदैवाने, बरेचसे लॅपटॉप कुलर्स आवाजाच्या बाबतीत पूर्णपणे शांत किंवा हलक्या आवाजात मोडतात.
👉डिझाईन :
लॅपटॉप डेस्कवर वापरणार असाल तर योग्य दर्शनी मांडणीसाठी उंची कमी जास्त करता येण्याची सुविधा आहे का, हे पाहा. तुम्ही मांडीवर किंवा बिछान्यावर ठेवून लॅपटॉप वापरणार असाल तर वर्तुळाकार कोन असलेले आणि पंखे वरच्या दिशेने असलेल्या कुलरची निवड करा. त्यामुळे पांघरूण किंवा इतर गोष्टींचा अडथळा होणार नाही. तुमच्या दैनंदिन गरजांप्रमाणे निवड करा.
अखेरचा मुद्दा म्हणजे, लॅपटॉप कुलर विकत घेण्यापूर्वी त्याच्या टिकाऊपणाचा विचार करायला हवा. सर्वात टिकाऊ पर्याय मजबूत प्लास्टिक, रबराचे मजबुतीकरण आणि काही वेळा मेटल मॅशच्या बाह्य आवरणाने बनलेले असते. तुमच्या गरजा काहीही असोत, त्या गरजा पूर्ण करणा-या लॅपटॉप कुलरचीच निवड करायला हवी.
म्हणूनच, खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला नेमके काय हवे, याची यादी तयार करा. योग्य उपकरणांच्या माध्यमातून तुमच्या लॅपटॉपची कार्यपद्धती विकसित करण्याची हीच वेळ आहे!
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला अवश्य भेट द्या .