twitter
rss

आजपासून बारावीची परीक्षा*
Maharashtra Times | Updated Feb 28, 2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. यंदा या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील एकूण ९ हजार १४३ ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी यंदा ही परीक्षा देणार आहेत.
*आऊट ऑफ टर्नचा पर्याय*
बारावीच्या परीक्षेदम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला ऐनवेळी काही वैद्यकीय अथवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत या प्रात्यक्षिक परीक्षेला बसता आले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा मंडळाने नवीन पर्याय यावेळी दिला आहे. ही परीक्षा २७ ते २९ मार्च या कालावधीत जिल्हानिहाय केंद्रावर घेतली जाईल.
*शिक्षकांना मोबाइल बंदी*
गेल्यावर्षी बारावी परीक्षे दरम्यान बुक किपींग या विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेत व्हॉटस अॅपवर आढळून आला होता. याची गंभीर दखल घेत यंदा परीक्षा केंद्रातील परिक्षकांना मोबाइल बंदीचा निर्णय बोर्डातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाची सक्तीची अंमलबजावणी करण्याची सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.

गुरुवर्य न्यूज
सांगली
बारावीची परीक्षा आजपासून सुरू.
By pudhari | Publish Date: Feb 28,2017
सांगली : प्रतिनिधी
बारावीची परीक्षा मंगळवारपासून (दि. 28) सुरू होत आहे. जिल्ह्यात 42 केंद्रांवर 37 हजार 503 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन दक्षता घेतली आहे.
बारावीची परीक्षा दि. 28 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत आहे. जिल्ह्यात 42 केंद्रांवर 37 हजार 503 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिराळा परीक्षा केंद्र उपद्रवी व संख नं. 1 परीक्षा केंद्र कुप्रसिद्ध म्हणून घोषित आहे.
दहावीची परीक्षा दि. 7 मार्चपासून सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा 103 केंद्रांवर आहे. 44 हजार 937 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मालगाव, शिराळा नं. 1, वाळवा, येलूर, कुची ही पाच परीक्षा केंद्रे उपद्रवी तर एरंडोली, मिरज नं. 1, भवानीनगर, उमदी व कवठेमहांकाळ अशी पाच कुप्रसिद्ध केंद्रे म्हणून घोषित आहेत. बारावी, दहावीच्या उपद्रवी, कुप्रसिद्ध 12 परीक्षा केद्रांवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा   वॉच तसेच बैठी पथके असणार आहेत.
गुरुवर्य न्यूज
 बारावी परीक्षा पेपर तपासणीस ‘असहकार’*
By pudhari | Publish Date: Feb 27 2017 9:17PM
कोल्हापूर : प्रतिनिधी
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्‍वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी दि. 3 मार्चपासून बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीस ‘असहकारा’चा पवित्रा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 27) कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वसंत पायमल यांना दिले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून, बैठकीत मान्य सर्व मागण्यांची एक महिन्यात अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन महासंघास दिले. त्याची पूर्तता न झाल्याने डिसेंबर 2016 मध्ये आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जानेवारीत जलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी 15 दिवसांत सर्व मागण्यांची अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली गेली. मात्र, हे आश्‍वासनही फोल ठरले. यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करावी, शिक्षण आयुक्‍त पद रद्द करावे, यासह अन्य मागण्यांसाठी महासंघाच्या आदेशानुसार असहकार आंदोलन करण्यात येणार आहे.
शिक्षक रोज एक पेपर तपासणार असहकार आंदोलनाचा एक भाग म्हणून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक रोज एकच उत्तरपत्रिका तपासतील व त्याचे नियमन करतील. याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असा इशारा संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
*☄ प्रमुख मागण्या...*
ऑनलाईन संचमान्यतेमधील त्रुटी दूर करून प्रचलित निकषानुसार संचमान्यता द्यावी  कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे  2011-12 पासूनच्या वाढीव पदांना त्वरित मान्यता द्यावी  अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात प्रथम तीन फेर्‍या अनुदानितच्या कराव्यात  कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे  2005 नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी  शिक्षक सेवक योजना रद्द करावी .
गुरुवर्य न्यूज
 मुलांसाठी छोट्या प्रयोगशाळांची गरज*
Maharashtra Times | Updated Feb 28, 2017
अरविंद परांजपे,अतिथी संपादक
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर हे १९८७ मध्ये भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. विज्ञानासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये रुची वाढावी, विज्ञानाचा प्रसार, प्रचार व्हावा, यासाठी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचे ठरले. भारतात विज्ञानामध्ये भरीव कामगिरी करून नोबेल पुरस्कार मिळवलेल्या डॉ. सी. व्ही. रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रामन परिणाम’ पाहिला. या दिवसाचे वैज्ञानिक महत्त्व लक्षात घेऊन हाच दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरले.
राष्ट्रीय पातळीवर जितक्या संस्था-संघटना आहेत त्या सर्व संस्थांची दारे सामान्यांसाठी खुली व्हावीत, विज्ञानाविषयी कार्यरत असलेल्या संस्थांना येथे प्रवेश मिळावा, हादेखील यामागील उद्देश होता. एक अनुभवी शिक्षक विज्ञानप्रसाराचे काम शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जातो. या विज्ञानदिनाच्या माध्यमातून शिक्षकांनाही प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांमधील सहजसुलभ वैज्ञानिक कुतूहल वाढीस लागावे, यासाठी या दिवशी विविध कार्यक्रम घेण्यात येतात.
जयंत नारळीकरांनी जेव्हा ‘आयुका’मध्ये विज्ञानदिन साजरा करण्यास सुरुवात केली तेव्हापासून मी या कार्याशी जोडला गेलो . विद्यार्थी, शिक्षकांसह सामान्यांमध्येही हा कार्यक्रम प्रसिद्ध झाला. मात्र या कार्यक्रमाची २८ फेब्रुवारी ही तारीख विद्यार्थ्यांच्या परीक्षा पाहता फारशी सोयीची नाही. उन्हाच्या तीव्र झळाही या दिवसांत वाढलेल्या असतात. विद्यार्थ्यांना इच्छा असूनही या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येत नाही. त्यामुळे हा दिवस दिवाळीच्या सुटीच्या नंतरच्या कालावधीमध्ये साजरा झाला तर विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल, या बाबीचा सरकारने प्रकर्षाने विचार करायला हवा. या दिनाच्या निमित्ताने जे वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात, त्यात विज्ञानविषयक छोट्या फिल्म्स बनवण्यामध्ये सामान्य व्यक्तींचा पुढाकार असतो. मात्र तोच उत्साह स्वतःहून छोटी वैज्ञानिक उपकरणे बनवण्यामध्ये दिसून येत नाही. विज्ञानाचा प्रचारप्रसार व्हावा यासाठी अनेक व्यक्तींनी, संस्थांनी पुढाकार घेतला, ही सकारात्मक बाब आहेच. पण तरीही सहजरित्या विज्ञान शिकायचे असेल तर छोट्या प्रयोगशाळांची गरज आहे. आजही अनेक शाळांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा नाहीत, उपकरणांची वानवा आहे. मुलांना अनेक प्रयोग करायचे असतात, त्यांच्यामध्ये जाणून घेण्याची उत्सुकता असते. विद्यार्थ्यांना सातत्याने प्रयोग करता यावेत, त्यातील निरीक्षणे नोंदवता यावीत यासाठी नेहरु तारांगणाच्या बेसमेंटमध्येही अशी प्रयोगशाळा मार्च महिन्यामध्ये सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.
अगदी सुलभतेने ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्यांचा वापर करून विद्यार्थी प्रयोग करतील, काही उपकरणे सोबत घेऊनही जातील. या प्रयोगांपासून स्वयंप्रेरित होऊन इतरांनाही विज्ञानप्रसाराशी जोडून घेतील अन् ही मोहीम खऱ्या अर्थाने सक्षम होईल यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. अनेकदा शिक्षकांनाही विद्यार्थ्यांना असंख्य प्रयोग करून दाखवण्याची सांगण्याची आंतरिक उर्मी असतेच. मात्र उपकरणे तुटली फुटली तर काय करायचे, या भीतीने ते पुढाकार घेत नाहीत. विज्ञानाच्या प्रचार प्रसारामध्ये असणारे अनेक सूक्ष्म अडसर काढून हा प्रवास प्रत्येकासाठी पथदर्शक व्हावा. विज्ञानाच्या कक्षा रुंदावत जाऊन प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन वृद्धिंगत झाला तर राष्ट्रीय विज्ञान दिनाचा खरा उद्देश निश्चित सफल होईल.
 गुरुवर्य न्यूज 
[2/28, 4:04 AM] Deepak Mali: * शैक्षणिक साहित्यांनी सोपा झाला विज्ञानमार्ग *
Maharashtra Times | Updated Feb 28, 2017.
*गतीसाठी गोटी प्रयोग*
भांडुपच्या श्री सरस्वती विद्यामंदीर येथील लिलाधर महाजन यांनी पाचवीच्या विद्यार्थ्यांना विज्ञानातील गती आणि त्याचे प्रकार समजून घेण्यासाठी एक प्रयोग केला आहे. त्यांनी एक वेगळे शैक्षणिक साहित्य तयार केले. त्याच्या माध्यमातून गोटी उतरत्या दिशेने सोडण्यात येते. ती सोडल्यानंतर गती म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना शिकविता येते. या साहित्यात डोलक बसविण्यात आले आहे. गोटी जेव्हा डोलकाला स्पर्श होते. त्यातून डोलक गतीची व्याख्या मुलांना सहज समजत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या साहित्यात चक्राचादेखील वापर करण्यात आला असून, गोटी चक्राला स्पर्श केल्यानंतर फिरते चक्र आणि चक्र गतीची व्याख्या विद्यार्थ्यांना अवगत होत असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. २५ वर्षांत महाजन यांनी अनेक शैक्षणिक साहित्यांची निर्मिती केली आहे. विज्ञानातील प्रयोगांची भीती विद्यार्थ्यांच्या मनातून दूर करण्यासाठी ते मुद्दाम विद्यार्थ्यांकडूनच प्रयोग करून घेतात, असे त्यांनी सांगितले.
*फिरती प्रयोगशाळा*
दहावीच्या विज्ञानाच्या अभ्यासक्रमातील जीवशास्त्रात शरीरातील अनेक अवयव आणि इंद्रियांचा समावेश आहे. याबद्दल विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळावी यासाठी आता बहुतांश शिक्षकांकडून इंटरनेटचा वापर केला जातो. मात्र पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रयोग करता यावेत, यासाठी मुलुंडच्या वामनराव मुरनजन हायस्कूलमधील दीपककुमार सोनावणे यांनी फिरत्या प्रयोगशाळेचा यशस्वी प्रयोग केला आहे. घरगुती वापरातील विविध साहित्य वापरून त्यांनी ही प्रयोगशाळा बनविली आहे. यासाठी विविध संस्थांची मदत झाल्याचे ते सांगतात .
*रासायनिक कार्ड*
विज्ञानातील समीकरणे आणि क्लिष्ट भाषेमुळे विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटतो. तो सहजरीत्या समजविण्यासाठी मुलुंड येथील आयईएस शाळेतील मानसी धारप २५ वर्षांपासून नानाविध प्रयोग राबवत आहेत. केवळ शैक्षणिक साहित्यांच्या वापराने विद्यार्थ्यांना कंटाळा येत असतो. त्यामुळे विविध प्रयोग आणि विज्ञानाची भाषा सोपी करून विज्ञानाचे धडे त्या विद्यार्थ्यांना देत आहेत. ‘रासायानिक कार्ड’ या त्यांनी केलेला सध्या चर्चेत आहे. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे रासायनिक कार्ड तयार करण्यात आले आहे. या कार्डांची जोडी तयार करून रासायनिक समीकरणे समजून देण्यात येतात. ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रयोग केला जात आहे.
 गुरुवर्य न्यूज 