twitter
rss

📄 दहावीच्या हॉलतिकिटात चुका*

By pudhari | Publish Date: Feb 16 2017

मुंबई : प्रतिनिधी

बारावीपाठोपाठ दहावीच्या परीक्षेच्या हॉलतिकिटांवरही चुकाच चुका असल्याचे समोर आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळांमधून हॉलतिकीटांचे वाटप सुरू असून नाव एका विद्यार्थ्याचे तर फोटो भलत्याच विद्यार्थ्याचा, नावाचे स्पेलिंग चुकीचे, आईच्या नावात गोंधळ, जन्मतारीख अशा अनेक चुका हॉलतिकिटांमध्ये झाल्या आहेत. 

दहावीची परीक्षा 7 मार्चपासून सुरु होत असून या अगोदरच हॉलतिकीट दुरुस्ती करण्याची शाळांत कसरत सुरु आहे.यंदा दहावी, बारावीच्या हॉलतिकीटांची ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्याचे काम शाळांवरच टाकण्यात आले होते. त्यामुळे शाळेने जी माहिती भरली त्यानुसारच हॉलतिकीट छापले आहे, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे.

हॉलतिकिटांवरील ज्या चुका शाळांमध्येच सुधारणे शक्य आहे, अशा चुकांची मुख्याध्यापक स्तरावर दुरूस्ती सुरू असून चुकीचा फोटो, नाव यांची दुरूस्ती शिक्षण मंडळात करण्यात येणार आहे, यासाठी शाळांना 50 ते 100 रूपये दंड आकारला जाईल असेही मंडळाने म्हटले आहे, शाळांनी दिलेल्या माहितीआधारे प्रि-लीस्ट तयार करून तपासणीसाठी ती शाळांकडे पाठविण्यात आली होती. चुका दुरूस्तीची शाळांना संधी देऊनही हॉलतिकिटांमध्ये काही चुका राहिल्या आहेत. तरी या चुकांची लवकरच दुरूस्ती केली जाईल. असे मुंबई विभागीय शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💼दप्तराचे ओझे कमी करणार*

Maharashtra Times | Updated Feb 16, 2017

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या संकल्पाचा बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुनरुच्चार केला. त्यासाठी सीबीएसईच्या शाळा नवे मापदंड तयार करीत असल्याचे जावडेकर यांनी एका समारंभात बोलताना सांगितले.
येथील इंडिया हॅबिटेट सेंटर येथे सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हॉयर्नमेंटच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ग्रीन स्कूल’ कार्यक्रमात पुरस्कार वितरण करताना जावडेकर यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्धार जाहीर केला. सीबीएसईच्या शाळांना त्यासाठी नवे मापदंड तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यावर काम सुरू असल्याची माहिती जावडेकर यांनी यावेळी दिली. मुलांना
शाळेत अनावश्यक पुस्तके आणि वह्या न्याव्या लागू नये म्हणून सीबीएसईच्या शाळा नवे नियम तयार करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला अनेक शाळांचे विद्यार्थीही उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रकल्पांचे काम सामान्यपणे आई-वडीलच पूर्ण करतात, असा उल्लेख करीत शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रकल्पांच्या कामातही बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. जिथे मुले चुका करतात आणि शिकतात तिथेच शिक्षण मिळते, असे जावडेकर यांनी सांगितले.

🍃🍂🍃Guruvarya News 🍃🍂🍃

📋‘६ मार्चचे बारावीचे पेपर पुढे ढकला’*

Maharashtra Times | Updated Feb 16, 2017

मुंबईः येत्या ६ मार्चला मुंबईत मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी राज्यभरात बारावी बोर्ड परीक्षेचा पेपर आहे. मोर्चामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान अडचण होऊ नये म्हणून हा पेपर पुढे ढकलण्याची मागणी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना केली आहे.
या मागणीसाठी शिक्षणमंत्र्यांकडे निवेदन देण्यात आले आहे. सहा मार्च रोजी बारावीचा ११ ते २ या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र तर दुपारी ३ ते ६ यावेळेत व्यावहारिक हिंदी या विषयाच्या परीक्षा आहेत. एचएचसी व्होकेशनलचा इंजिनीअरिंग व तंत्रज्ञान या विषयाचाही पेपर होणार आहे. म्हणूनच मोर्चामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी हे पेपर पुढे ढकलण्यासंदर्भातील हे निवेदन आहे.

🍃🍂🍃Guruvarya News 🍃🍂🍃

🎋 अतिरिक्त शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न कायम*

By pudhari | Publish Date: Feb 16 2017

मुंबई : प्रतिनिधी

राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षक संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची वेळ आलेल्या मुंबईतील शेकडो शिक्षकांपुढे आता नवा प्रश्‍न उभा राहिला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. या विरोधात शिक्षकांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन रिक्त जागा असलेल्या शाळांमध्ये करण्यात आले. मात्र, अनेक शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेतल्याने अतिरिक्त शिक्षक त्यांच्या मूळ शाळेत परत गेले. अशा शिक्षकांचे वेतन डिसेंबरपासून अचानक बंद करण्यात आले. याविरोधात शिक्षक परिषदेपासून शिक्षक भारती, इतर संघटनांनी शिक्षण विभागाकडे दाद मागत आवाज उठवला होता. मात्र त्यानंतरही याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. यावर शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडून वेतन सुरू करण्याबाबत पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव दिले असल्याचे थातुरमातुर उत्तर दिले जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी एकमेकांविरोधात बोट दाखवून चालढकल करत असल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃