twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग* -2⃣6⃣5⃣

*सर्दीचे दर्दी*

साभार - कोल्हापूर टाइम्स टीम

सर्दीमुळे नाक बंद होतं. त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होतो आणि अनेकदा श्वास कोंडल्यासारखाही वाटतो. सर्दी झाल्यावर आपल्याच मनानं औषधे घेणंही चांगलं नसतं; परंतु सर्दीमुळे नाक बंद झालं असेल, तर घरगुती उपचार सर्वांत जास्त प्रभावी ठरतात.

*वाफ घ्या*

सर्दीमुळे नाक बंद झालं असेल, तर पाणी गरम करून वाफ घ्या. यामुळे लवकर आराम पडतो. यामध्ये आयोडिनचे काही थेंब किंवा व्हिक्सची कॅप्सूलही टाकता येते. यामुळे याचा प्रभाव वाढतो. तुमच्या आवडीचं सुगंधी तेलही तुम्ही यात वापरू शकता. वाफ घेताना स्वच्छ कापडाचाच वापर करा. वाफ घेतल्यानंतर लगेचच नाक साफ करा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल. शक्यतो उठल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी वाफ घेतल्यास उत्तम. वाफ घेतल्यानंतर गार हवेत जाऊ नका.

*कोमट पाण्याचा वापर करा*

कोमट किंवा थोडं गरम पाणी घेऊन त्याचे काही थेंब नाकात टाकल्यानं लवकर आराम मिळतो. ड्रॉपरच्या मदतीनं कोमट पाणी भरून घ्या. डोकं मागं करून दोन-तीन थेंब नाकात घाला आणि डोकं सरळ करून हे पाणी नाकातून बाहेर काढा.

*नारळाचं तेल*

सर्दीमुळे नाक बंद झालं असेल, तर नारळाचं तेल बोटाला लावून नाकाच्या आतील भागात लावा. त्यानंतर दीर्घ श्वास घ्या. थोड्याच वेळात तुमचं नाक मोकळं होईल. ड्रॉपरच्या मदतीनंही तुम्ही नारळाच्या तेलाचे काही थेंब नाकात घालू शकता.

*टोमॅटो सूप*

तुम्हाला चटपटीत खाण्याची सवय असेल, तर नाक लवकरच मोकळं होईल. गरम टोमॅटो सूप तुमच्या नाकाला आराम देऊ शकतं. टोमॅटो सूपमध्ये लसूण, लिंबाचा रस मीठ टाकून प्या. कच्चे कांदे खाल्ल्यानंही बंद नाक मोकळं होतं.
सर्दी झाल्यावर आपल्या मनानं औषध घेणं हानिकारक ठरू शकतं. सर्दीमुळे नाक बंद झालं असेल, तर घरगुती आणि नैसर्गिक उपचार जास्त फायद्याचे ठरतात.

*🖋 डॉ. संदीप चौधरी, सीनिअर फिजीशियन*

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_