twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

*🚀 इस्रोचे विक्रमी 'उपग्रह प्रेक्षेपण'...!🛰*

By pudhari | Publish Date: Feb 15 2017 9:57AM

श्रीहरीकोटा: वृत्तसंस्था

भारतीय अंतराळ संशोधक संस्था अर्थात इस्रोने आज (बुधवार) एकाचवेळी १०४ उपग्रहांचे प्रक्षेपण करत इतिहास रचला आहे. पीएसएलव्ही या प्रक्षेपकाच्या सहाय्याने या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले असून एवढ्या मोठ्या संख्येने उपग्रह प्रक्षेपण करण्याची कामगिरी यशस्वी करून दाखवली आहे. इस्रोच्या या कामगिरीकडे जगभरातल्या शास्त्रज्ञांचे लक्ष भारताकडे लागून राहिले होते. या १०४ उपग्रहांमध्ये भारताचे कार्टोसॅट-२डी,  आयएनएस १ए आणि आयएनएस १बी या उपग्रहांचा समावेश आहे.

या यशानंतर भारताचा जगभरात संशोधन क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण होणार आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील डॉ. सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रावरून या सगळ्या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.  इस्रोकडून २० उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करण्याचा यशस्वी प्रयोग यापूर्वी झाला आहे. आता एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपण करून इस्रो नवीन इतिहास रचला आहे.

रशियाने एकाचवेळी ३७ उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते तर अमेरिकेच्या नासाने एकाचवेळी २९ उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. आता भारताने तब्बल शतकापलीकडची कामगिरी हाती घेतली आहे. एकाचवेळी एवढे उपग्रह प्रक्षेपित केल्याने प्रत्येक उपग्रहाच्या प्रक्षेपणाचा खर्च वाचणार आहे. यामुळे यामध्ये व्यावसायिक फायदाही आहे. या १०४ उपग्रहांमध्ये भारताचे ३ तर कझाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड, स्वित्झरलँड, इस्राईल आदी देशांच्या १०१ उपग्रहांचा समावेश आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना 1920 ला करण्यात आली. एस. के. मिश्रा हे प्रमुख होते. त्यानंतर पंडित जवाहलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम साराभाई यांनी 1962 ला इस्रोचा झेंडा नव्याने रोवला. इस्रोचा ‘आर्यभट’पासून सुरू झालेला प्रवास नंतर रोहिणी, एसएलव्ही 3, चंद्रायान आणि आताचे जगात आश्‍चर्य व्यक्‍त होणारे मंगळयान इथपर्यंत आहे. स्पेस शटल या भारतीच्या स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अंतराळयानाची यशस्वी मोहीम ही इस्रोच्या मेहनतीचे फळ होते.

एसएलव्ही 3 चे कौतुक इंदिरा गांधी यांनी केले होते तर मंगळयान मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे त्यांच्या शैलीत  विशेष कौतुक केले होते.

इस्रोने आजवर अनेक उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. अपवाद वगळता यामध्ये इस्रोला मोठ्या प्रमाणात यश आले आहे. अमेरिकेलाही शक्य झाला नाही असा 104 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याचा विडा इस्रोने उचलला आहे.  त्यामुळेच जगभरातल्या शास्त्रज्ञांचे लक्ष आज भारताकडे लागून राहिले होते.

दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..