🌾 शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 9 लाख विद्यार्थी*
By pudhari | Publish Date: Feb 14 2017
मुंबई : प्रतिनिधी
यंदा प्रथमच पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी शालेय शिष्यवृत्ती परीक्षा 26 फेब्रुवारीला होणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून राज्यातील 6 हजार 841 परीक्षा केंद्रांवर एकूण 9 लाख 58 हजार 259 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
आतापर्यंत स्कॉलरशीप परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येत होती पण यंदापासून पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पहिलीच परीक्षा होणार आहे. पाचवीच्या परीक्षेसाठी 5 लाख 50 हजार 400 तर आठवीच्या परीक्षेसाठी 4 लाख 7 हजार 859 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव ढेरे यांनी दिली.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी) मध्ये घेण्यात येईल. मराठी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी, तेलगू, सिंधी व कन्नड या आठ भाषातून ही परीक्षा होईल. याशिवाय सेमी इंग्रजी माध्यमही असणार आहे. या दोन्ही परीक्षेसाठी प्रत्येकी दोन पेपर होणार आहेत. सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार आहेत. पाचवीसाठी विविध प्रकारचे 16 हजार 683 तर आठवीसाठी 16 हजार 578 शिष्यवृत्ती संच उपलब्ध असणार आहेत. यंदा शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठीयापुढे पास- नापास घोषित न करता, शिष्यवृत्तीसाठी पात्र किंवा अपात्र असे जाहीर करण्यात येणार आहे. मात्र शिष्यवृती पात्रतेसाठी विद्यार्थ्यांला मात्र प्रत्येक पेपरला किमाण 40 टक्के गुण मिळवावे लागणार आहे. 40 टक्केपेक्षा कमी गुण असणारे विद्यार्थी अपात्र ठरणार आहेत.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
📋 दहावीसाठी यंदा कृती प्रश्नपत्रिका*
By pudhari | Publish Date: Feb 14 2017
पुणे : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या भाषा विषयांमधील गुणवत्तेत वाढ व विकास व्हावा या उद्देशाने यंदा पहिल्यांदाच इंग्रजीसह मराठी, हिंदी, संस्कृत या भाषा विषयांच्या कृती प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून, राज्यातील विद्यार्थ्यांची अशा प्रकारची पहिलीच परीक्षा असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सोमवारी दिली.
यंदाच्या परीक्षेत आकलन कृती, व्याकरणाधारित कृती, अभिव्यक्ती अशा प्रकारच्या कृती असणार आहेत. याचा फायदा असा की, पूर्वी विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रश्नांना उत्तरे लिहिताना विचार करून त्यांची उत्तरे लिहीत असत. परंतु आता विद्यार्थ्यांकडून कृतीयुक्त उत्तरे लिहिण्यावर परीक्षा मंडळाकडून भर देण्यात आला आहे. यामध्ये जोड्या लावा, योग्य पर्याय निवडा, चूक की बरोबर लिहा अशा पद्धतीच्या प्रश्नांवर जास्त भर देण्यात येणार आहे. संंबंधित विषयांच्या शिक्षकांना याबाबतचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले होते.
माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रकाश पवार म्हणाले, अभ्यास मंडळाने केलेला हा बदल स्तुत्य आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांना वाचन व आकलन करावे लागणार आहे. पाठांतर करून उत्तरे लिहिण्याच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांची वाचन क्षमता कमी झाली होती. आता संपूर्ण पाठ समजून घेतल्याशिवाय तो कृती लिहू शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खर्या अर्थाने भाषा कळणार आहे. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
*🌱 बहिस्थ विद्यार्थ्यांनाही देता येणार कलचाचणी*
By pudhari | Publish Date: Feb 14 2017
पुणे :
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी कलचाचणी यंदापासून नियमित विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरून परीक्षा देणार्या विद्यार्थी (17 नंबर फॉर्म) देता येणार असल्याची माहिती राज्य बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.
राज्य बोर्डाकडून मागील वर्षीपासून विद्यार्थ्यांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे. तसेच विद्यार्थ्याला कोणता कोर्स करण्यात रस आहे याची चाचणी घेण्यास सुरुवात केली होती. मागील वर्षी 15 लाख विद्यार्थ्यांची ही चाचणी घेण्यात आली होती. गेल्या वर्षी पहिलेच वर्ष असल्याने ही चाचणी अनिवार्य नव्हती. मात्र या वर्षीपासून ती नियमित विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर मागील वर्षी बाहेरून परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांना ही चाचणी देता येत नव्हती. मात्र, यंदा बाहेरून परीक्षा देणार्यांना विद्यार्थ्यांना चाचणी देता येणार आहे. याबाबत म्हमाणे म्हणाले की, बाहेरून परीक्षा देणारे विद्यार्थी लाखो विद्यार्थी असतात. मागील वर्षी पहिलेच वर्ष होते; त्यामुळे नियोजन करणे शक्य नव्हते. मात्र या वर्षी आम्ही विद्यार्थ्यांना चाचणीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मागील वर्षी ज्याप्रमाणे आम्ही परीक्षा घेण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतलेली ती यावर्षी घेणार नाहीत. मात्र यावर्षी कलचाचणीचा पेपर श्यामची आई फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनेच काढला असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांकडून तो प्रमाणित करून घेतला असल्याचेही म्हमाणे यांनी सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
*🌴 गुणवत्तेसाठी ‘शाळासिद्धी’ मानांकन*
By pudhari | Publish Date: Feb 14 2017
पुणे : गणेश खळदकर
राज्यातील इयत्ता 1 ते 12 वीच्या सर्व शाळांना यापुढे त्यांचा दर्जा ठरविण्यासाठी ‘शाळासिद्धी’ मानांकन देण्यात येणार असून, यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. यासाठी सर्व शाळांना नोंदणी करणे बंधनकारक असून, हे मानांकन पाच वर्षांसाठी वैध राहणार आहे. 7 विविध क्षेत्रांतील 46 गाभामानकांचा अभ्यास करून शाळांना हे मानांकन देण्यात येणार आहे. यावरूनच शाळांचा दर्जा ठरणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनाच आता शाळेचा दर्जा समजणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने 30 मार्च 2016 रोजी शाळांचा दर्जा ठरविणार्या वेगवेगळ्या पद्धती रद्द करून व शाळांनी घेतलेली वेगवगेळी मानांकने रद्द करून शासनाच्या स्वयं मूल्यांकनावर आधारित शाळासिद्धी हे मानांकन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात या वर्षीपासून करण्यात येणार आहे.
आजपर्यंत शाळांचा दर्जा ठरविण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबवण्यात येत होत्या. या पद्धतींबरोबरच काही शाळा या आयएसओ मानांकनदेखील घेत असत परंतु शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता ही सगळी मानांकने रद्द करण्यात आली असून शासनाचे स्वत:चे ‘शाळासिद्धी’ हे मानांकन तयार करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील सर्व शाळांना लॉगइन आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. त्यांनी मूल्यांकनासंदर्भातील सर्व माहिती संकेतस्थळावर भरावयाची आहे. यासाठी 999 गुणांची स्वयं मूल्यांकनावर आधारित चाचणी तयार केली आहे. यामध्ये सात वेगवेगळी क्षेत्रे व 46 गाभामानके तयार करण्यात आली आहेत.
या संदर्भातील सर्व माहिती शाळांना ऑनलाइन भरणे बंधनकारक आहे. यामध्ये ज्या शाळांना 900 पेक्षा जास्त गुण मिळतील त्या शाळांची एका त्रयस्थ यंत्रणेमार्फत फेरतपासणी करण्यात येणार असून, त्यांना शाळासिद्धी हे मानांकन देण्यात येणार आहे. शासनाने शाळांना त्यांच्या सुधारणेत सातत्याने व्यग्र राहण्यास सक्षम करणारे सकारात्मक पाऊल म्हणून शाळा मानके व मूल्यांकनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार केलेला आहे. सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिणामकारक शाळा व सुधारणात्मक शालेय कामगिरी यांची वाढती गरज भारतीय समाजात जाणवत आहे.
त्यामुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शाळांनी त्यांची कामगिरी व सुधारणाकेंद्रित गुणवत्ता वाढविण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणूनच शालेय सुधारणाकेंद्रित सर्वंकष व सर्वांगीण शालेय मूल्यांकन यंत्रणा विकसित करण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून शाळांना शाळासिद्धी मानांकन देण्यात येणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
*✍ शिक्षणासाठी काश्मीरची तरुणाई झगडतेय*
First Published :14-February-2017
कोल्हापूर : काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कॉलेजला जाता आले नाही. मात्र, इंटरनेट आणि मित्र-मैत्रिणींकडून माहिती घेऊन केलेली मेहनत आणि निव्वळ जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झाल्याचे काश्मीर विद्यापीठाची विद्यार्थिनी अरुणा खान हिने सांगितले.शिक्षण घेऊन भविष्य घडविण्यासाठी काश्मीरची तरुणाई झटत असल्याचेही तीने सांगितले.ती म्हणाली, सहा दिवस जीव मुठीत घेऊन बसचा प्रवास करून कानपूरमधील महोत्सवात सहभागी झालो होतो. कोल्हापूर, महाराष्ट्रबद्दल काहीच माहीत नाही. मात्र, याठिकाणी आल्यानंतर इथल्या लोकांचा स्वभाव आवडला. (प्रतिनिधी)
युनिव्हर्सिटी आॅफ जम्मूची गौरी ठाकूर हिने जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीत मोठा फरक आहे. याठिकाणी आम्ही निर्भयपणे जीवन जगत आहोत. ‘यहाँ की अंबामाता का मंदिर और कोल्हापुरी जूतों के बारे में सुना है. अब अंबामाता का दर्शन जरूर करुंगी और कोल्हापुरी जूता लेकरजाऊंगी.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃