twitter
rss

[2/9, 9:14 AM] Deepak Mali: *🔬 विज्ञानसारखा रुक्ष विषय रंजकपणे शिकवा*

By pudhari | Publish Date: Feb 8 2017

सांगली : प्रतिनिधी

विज्ञान हे तर्कावर आधारित असलेले शास्त्र असल्याने तो विषय रुक्ष आहे. विद्यार्थ्यांपर्यंत तो रंजकपणे पोहचविला पाहिजे, असे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. प. रा. आर्डे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत विज्ञान प्रदर्शनावेळी साहित्यिकांच्या मुलाखती हा कार्यक्रम झाला. संवादक विठ्ठल मोहिते यांनी प्रा. आर्डे यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. प्रा. आर्डे  म्हणाले, लहानपणी कोयना धरणाचे तंत्रज्ञान समजवून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आणि त्यातून विज्ञानाची गोडी लागली.  विज्ञान हे तर्कावर आधारित असल्याने तो रुक्षपणे शिकवला जायचा. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयाची गोडी लागत नव्हती. तो रसाळपणे शिकविण्यासाठी शिक्षकांनी विज्ञानातील अवांतर वाचन केले पाहिजे. काही विज्ञान कथा वाचून त्याची उदाहरणे विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. यासाठी त्यांनी डॉ. अब्राहम कोवूर यांच्या पुस्तकांची उदाहरणे दिली.

यावेळी त्यांनी विज्ञानातील साहसी कथा सांगणे गरजेचे आहे. याबरोबरच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर प्रेम केले पाहिजे. यासाठी त्यांनी व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘झेल्या’ या कथेची आठवण सांगितली.

त्यानंतर प्रा. आर्डे यांनी अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर संपर्क आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कार्याला सुरुवात केली. यावेळी मनोरंजनातून विज्ञानाचे सादरीकरण करीत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केले. हे करीत असताना त्यांनी मानसविज्ञान आणि अंधश्रद्धा याची सांगड घालत विद्यार्थ्यांमध्ये आपण वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवू शकतो, याची माहिती दिली.

*वैज्ञानिक कथाकथन*

सकाळच्या सत्रात वैज्ञानिक कथाकथन झाले. यामध्ये ‘अंनिस’चे डॉ. प्रदीप पाटील यांनी ‘झिका’ ही कथा सांगितली. झिका हा संसर्गजन्य रोग आता येऊ घातला आहे. विविध देशांत त्याचे रुग्ण आढळत आहे. डासांपासून उद्भवणारा हा रोग घातक असून, त्यावर अद्याप औषध निघालेले नाही. काही वर्षांत आपल्याकडे तो येईल. त्यामुळे लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवून अशा घातक आजारापासून स्वत:चे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी या कथेच्या माध्यमातून केले. तर विज्ञान शिक्षक जीवन सावंत यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावरील कथा सादर केली. यावेळी अध्यक्षस्थानी लठ्ठेचे सचिव सुहास पाटील होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/9, 9:14 AM] Deepak Mali: *📄 बारावी हॉलतिकिटांत चुका*

Maharashtra Times  Updated Feb 9, 2017

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

नमनाला घडाभर अशीच गत बुधवारपासून सुरू झालेल्या बारावी प्रात्यक्षिक परीक्षेत झाली. हॉलतिकिटांमध्ये शिक्षण मंडळाने चुकांचा भरणा केल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली, तर दुरुस्तीसाठी आर्थिक दंडाचा भुर्दंडही सोसावा लागला. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २८ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. तर, प्रात्यक्षिक परीक्ष आजपासून सुरू झाली. २५ फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी ७ फेब्रुवारीला कॉलेजांना हॉलतिकीट वितरित करण्यात आले. बुधवारी विद्यार्थ्यांच्या हाती हॉलतिकीट पडल्याच अनेकांच्या हॉलतिकिटांमध्ये चुकांचा भरणा असल्याचे समोर आले. नावासह जन्मतारखांमध्ये चुका, दुसऱ्याचे फोटो, कम्प्युटर सायन्सच्या जागी बायोलॉजी, द्वितीय भाषांमध्ये झालेला बदल, माध्यम बदल अशा चुकांची गर्दी आहे. त्यामुळे आज अभ्यास सोडून विद्यार्थी कॉलेजांमध्ये हॉलतिकिटांमधील चुका दुरुस्तीसाठी अर्ज भरण्यासाठी विचारपूस करत होते.

*भुर्दंड विद्यार्थ्यांनाच*

हॉलतिकीट दुरुस्तीसाठी वेळ खर्च होतो आहेच. त्यासह आर्थिक भुर्दंडही विद्यार्थ्यांनाच बसतो आहे. दुरुस्तीसाठी शंभर रुपयांचा खर्च मंडळ घेते. वेळेसह आर्थिक भारही सोसावा लागत असल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

*मानसिक ताण*

हॉलतिकिटांच्या चुकांमध्ये सर्वाधिक माध्यम बदल असल्याचे समोर आले. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन होते. अर्ज भरल्यानंतर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून तपासून घेतल्यानंतर अर्ज भरले जातात. त्यानंतरही अशा चुका होतात. मंडळाच्या कारभारामुळे अनेक विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो आहे.

बारावीच्या हॉलतिकिटांमध्ये अनेक चुका आहेत. माध्यम, भाषा, विषय बदल. फोटो दुसऱ्याचे येणे. अर्ज भरताना आम्ही काळजी घेतो. अर्ज व्यवस्थित भरला गेला आहे का, हे विद्यार्थ्यालाही तपासायला सांगतो. त्यानंतरही मंडळाकडून हा गोंधळ होतो. ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांना दुरुस्तीची प्रक्रिया करावी लागते. आता प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. कॉलेज स्तरावरून दुरुस्तीची प्रक्रिया होते, परंतु मंडळ स्तरावरून प्रक्रियेला अनेकदा विलंब होते. ही प्रक्रिया वेळेत व्हावी यासाठी विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलेले असते.
     - प्रा. रजनीकांत गरुड, उपप्राचार्य, देवगिरी कॉलेज.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/9, 9:30 AM] Deepak Mali: *📋 दहावी, बारावी परीक्षा वेळापत्रकानुसारच*

*अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन*

विशेष प्रतिनिधी, मुंबई, पुणे | February 9, 2017 2:11 AM

राज्य मंडळाचे स्पष्टीकरण; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
निवडणुकीच्या कामामुळे दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून करण्यात येत असताना राज्य मंडळाने परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारपासून सुरू झाली असून ती २५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि कलचाचणी १५ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत होणार आहे. मात्र सध्या कनिष्ठ महाविद्यालये, शाळांमधील शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकांच्या कामात गुंतले आहेत.

परीक्षा घेण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुरेसे शिक्षक आणि कर्मचारी नाहीत, बाह्य़परीक्षक मिळत नाहीत अशी तक्रार कनिष्ठ महाविद्यालयांकडून करण्यात येत आहे. त्या पाश्र्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडून आणि काही संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आयटीसाठी बा परीक्षकांची नियुक्ती
बारावीतील माहिती तंत्रज्ञान   या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आता बा  परीक्षक नेमण्याचा निर्णय मंडळाने  घेतला. याचबरोबर लेखी परीक्षेप्रमाणेच प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठीही भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णयही मंडळाने घेतला आहे. राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा.अनिल देशमुख यांनी मंडळाच्य या दोन्ही निर्णयाचे स्वागत केले.
प्रवेशपत्रांमध्ये चुका
प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षांमध्ये अडसर येत असतानाच प्रवेशपत्रांमध्ये चुका असल्याची बाब समोर आली आहे.  विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांमध्ये विषयांमध्ये तर उत्तर लिहण्याच्या माध्यमामध्ये चुका असल्याचे समोर आल्याने  गोंधळ उडाला आहे. काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्रच छापले गेले नसल्याचेही उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना मंगळवारपासून प्रवेशपत्राचे वाटप सुरू करण्यात आले. या वेळी बहुतांश विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रात विषय चुकविण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहेत. याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परीक्षेचे माध्यमही चुकविण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर छायाचित्र छापण्यात आले नाही. यामुळे आता विद्यार्थ्यांना या चुका दुरुस्त करण्यासाठी वेळ खर्च करावा लागत आहे. यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधला असता,  कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार आपल्यापर्यंत आलेली नसल्याचे सांगण्यात आले. प्रवेशपत्रांमध्ये काही चुका असल्यास विद्यार्थ्यांनी  मंडळांकडे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे.  परीक्षांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. ज्या ठिकाणी शिक्षकांची कमरता जाणवेल तेथे पर्यायी शिक्षक दिले जातील.   – विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*📋परीक्षा विद्यार्थी आणि शिक्षकांचीही*

Maharashtra Times | Updated Feb 8, 2017, 09:51 PM IST
म. टा. प्रतिनिधी, नगर
एकीकडे बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असताना दुसरीकडे शिक्षकांना जिल्हा परिषद निवडणुकीचे प्रशिक्षण आणि काम लागले आहे. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडणार असून लेखी परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा लवकर आटोपण्यासाठी महाविद्यालयांना कसरत करावी लागणार आहे. यासंबंधी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे साहित्य जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना मिळाले असून बुधवारपासून प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात झाली. बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना शाळा, कॉलेजांना दिल्या आहेत. त्यामध्ये दोन रविवार व २४ फेब्रुवारीला महाशिवरात्रीची सुट्टी आहे. त्यामुळे उरलेल्या पंधरा दिवसांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांचे गटही तयार करण्यात आले. प्रत्यक्षात १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक कामकाज करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील बहुतांश कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. आता पुन्हा निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे ११ फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय १५ फेब्रुवारी रोजी निवडणूक साहित्य घेऊन जाण्यासाठी या सर्वांना सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी असणाऱ्या महासैनिक लॉन येथे बोलवण्यात आले आहे. तर, प्रत्यक्ष १६ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया आहे. त्यामुळे या कामासाठी नियुक्ती झालेले शिक्षक आणि अन्य कर्मचारी यांची धावपळ होणार आहे. या काळात शाळेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसले तर परीक्षा घेणे अवघड होईल. त्यामुळे फक्त तीस टक्केच शिक्षक-कर्मचारी निवडणूक कामासाठी घ्यावेत, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघटना, अहमदनगर जिल्हा ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना यांनी नकेली आहे. परीक्षा पुढे ढकलली तर लेखी परीक्षेसाठी अभ्यासाला कमी वेळ मिळून नुकसान होण्याची शक्यता आहे.

बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु झाली आहे. १५ फेब्रुवारीला दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होईल. याकाळात शाळांमध्ये मनुष्यबळ जास्त लागते. परंतु निवडणूक कामामध्ये शाळेतील कर्मचारी गुंतल्यामुळे परीक्षेचे व्यवस्थापन करण्यात अडचणी येत आहेत. निवडणुकीचे कामकाज असलेल्या दिवशी शाळा बंद ठेवण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

- सुनील पंडित, अध्यक्ष, जिल्हा मुख्याध्यापक संघटना

परीक्षेचे नियोजन करण्यासंदर्भात गुरुवारी बोर्डाची बैठक होईल. यामध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडण्यात येतील.

- प्रा. माणिक विधाते, जिल्हाध्यक्ष, ज्युनिअर कॉलेज शिक्षक संघटना

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃