⛳बोली भाषेमुळेच मराठीला जागतिक दर्जा
By pudhari | Publish Date: Feb 19 2017
सांगली : प्रतिनिधी
प्रस्थापितांऐवजी बोली भाषेतील साहित्य हेच मराठीला जागतिक पातळीवर नेऊ शकते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सांगलीत ते एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्याकडे दिवाळी अंक वाचून लेखक झालेली प्रस्थापिक मंडळी अधिक आहेत. त्यांच्यामुळे साहित्याला दर्जा मिळणार नाही. परंतु ज्यांचा जगण्याशी प्रत्यक्ष संबध आहे, त्यांनी जर लेखणी हाती घेतली तर मराठीला चैतन्य प्राप्त होणार आहे.
नागराज मंजुळे, वरद दौंडकर सारखी मंडळी हातात सुतकी घेण्याऐवजी लेखणी घेत आहेत. त्यामुळे मराठीत जगण्यातील जीवंतपणा दिसत आहे. त्यामुळे जगण्याशी संबंध असलेली बोली भाषा जर साहित्यात आली तर इंग्रजी ऐवजी मराठी ही ज्ञानभाषा होईल. जसे दलित साहित्याने प्रस्थापित साहित्याला धक्का दिला, तसेच विविध आडनावांची मंडळी जर साहित्यात आली तर मराठी भाषेला चैतन्यच प्राप्त होणार आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃