twitter
rss

*॥गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ॥*
http://guruvarykm.blogspot.in/

👉 _*सर्वात शक्तिशाली 'क्वांटम' कॉम्प्युटर*_

_*Guruvarya General Knowledge*_

सुपर कॉम्प्युटर पेक्षाही शक्तिशाली आणि आधुनिक असलेल्या ‘क्वांटम कॉम्प्युटर’ची ‘ब्ल्यू प्रिंट’ लंडनमधील ‘युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स’ आणि ‘गुगल’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कॉम्प्युटरला जगातील आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मानले जात आहे. क्वांटम कॉम्प्युटरच्या वापराने उद्योग, विज्ञान, वैद्यकीय आणि अर्थजगतात मोठा बदल घडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या क्वांटम कॉम्प्युटरमध्ये शास्त्रज्ञांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये वास्तविक क्वांटम बीटस्ना (लहान लहान तुकडे)  प्रत्येक कॉम्प्यूटिंग मॉड्यूलमध्ये संचलित करण्यात आले आहे. क्वांटम कॉम्प्युटरच्या मदतीने संशोधक भविष्यात अवकाशातील अनेक रहस्यांवरील पडदा बाजूला सारण्यात यशस्वी होतील. विशेष म्हणजे मानवी प्रयत्नाने अशी रहस्ये उलगडण्यास हजारो वर्षे लागू शकतील. क्वांटम कॉम्प्युटरचे प्रमुख संशोधक विनफ्राईड हेनसिंगर यांनी सांगितले की, असा कॉम्प्युटर तयार करणे अशक्य असल्याचे म्हटले जायचे. मात्र, आम्ही अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. तसेच या शक्तिशाली कॉम्प्युटरचा आकार मात्र लहानच असेल.

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

  http://guruvarykm.blogspot.in/