✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
*आजची प्रेरणादायी पोस्ट*
*भाग* -3⃣4⃣2⃣
*आमुच्या मनामनात दंगते…...!*
Maharashtra Times
*_इंग्रजी व्यवहाराची भाषा असल्याने मराठी भाषा मागे पडल्याचं नेहमी बोललं जातं. पण मराठी भाषा तुम्हाला उत्तम रोजगार मिळून देऊ शकते हे काळींनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. अशाच काही मंडळींविषयी…!_*
उत्कृष्ट भाषांतरकार, कॉपी रायटर, कवयित्री असणाऱ्या *आदिती जहागिरदार* यांनी आपल्या लेखणीची जादू दाखवून दिली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक उत्कृष्ट गाणी लिहिली आहेत. तसंच जाहिरात कंपन्यांसाठी कॉपी रायटर म्हणून देखील तिने काम केलं आहे. 'मनोगंध' नावाचं तिचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. मराठी लघुपट तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी तिने गाणी लिहिली आहेत. मराठी विषयात एमए करणाऱ्या अदितीने स्वतंत्र अल्बम आणि वेबसीरिजसाठी देखील काम केलं आहे. आपल्या भाषेतील नैपुण्याच्या बळावर अदिती आज स्वतःच्या पायावर ठामपणे उभी आहे. याबाबत ती सांगते की, " ‘लिखाणाच्या क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध आहेत. कल्पक विचार आणि ते मांडण्यासाठी मराठीचं सखोल ज्ञान असेल तर इथे यश नक्कीच मिळू शकतं. मात्र अनेक मराठी तरुण-तरुणींना या क्षेत्राच्या विस्ताराची माहिती नसते. त्यामुळे संधी असूनदेखील त्याचं सोनं करण्यात आपण मागे पडतो. भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या आणि वेगळा विचार करणाऱ्या सर्जनशील लोकांना इथे खूप मागणी आहे याची नोंद घेणं आवश्यक आहे.'
*दुर्गेश तोडणकर*
आपल्याला जे सांगायचंय ते व्यंगचित्र खूप प्रभावीपणे सांगू शकतं. चालू घडामोडींवर केलेली उपहासात्मक टीका असो किंवा आकर्षक शैलीत केलेलं एखादं भाष्य असो..व्यंगचित्रांनी नेहमीच आपली छाप पाडली आहे. दुर्गेश तोडणकरने हीच गोष्ट हेरली आणि सुरू झाला मराठी व्यंगचित्रांचा एक आगळावेगळा प्रवास. विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इथून जैववैद्यकीय अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या दुर्गेशला व्यंगचित्रांची आवड निर्माण झाली. स्वतःचं संकेतस्थळ सुरू करून तो सतत त्याची व्यंगचित्र डिजिटल स्वरूपात लोकांसमोर ठेवत असतो. सर्जिकल स्ट्राईक, काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती, महानगरपालिका निवडणूक यांसारख्या विषयांवर त्याने व्यंगचित्रांतून भाष्य केलेलं आहे. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधींबाबत तो सांगतो की, "आपले विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यंगचित्रांसारखं दुसरं सशक्त माध्यम नाही. सहज, सोपी आणि तितक्याच बेधडक आणि प्रभावशाली व्यंगचित्रांना बाजारात खूप मागणी आहे. आजकाल ऑनलाईन मासिकांमध्ये, ब्लॉग्समध्ये किंवा पेपरमध्ये अशा व्यंगचित्रकारांना चांगल्या पगाराची नोकरी उपलब्ध होऊ शकते."
*मधूलिका कोशे*
'नमस्कार..आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी' हे वाक्य ऐकल्याशिवाय आजही अनेकांचा दिवस सुरू होत नाही. खेड्यांपासून शहरांपर्यंत घराघरात पोहोचलेला हा रेडिओ मनोरंजनाबरोबरच अनेक विषयांचं चौफेर ज्ञानही देतो. त्यामुळे आरजेलाही खूप महत्त्व आलं आहे. आरजे मधूलिका कोशे हे यातलंच एक नाव. मराठी वाचनाची सुरुवातीपासून आवड असल्यामुळे आणि मग कॉलेजमध्ये एकांकिका, आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमधून भाग घेतल्यामुळे मधूलिकाला बोलण्याचा अचूक सूर सापडला. आकाशवाणीवरील कॉफी हाऊससारख्या टॉक शोमधून तिने श्रोत्यांच्या मनात घर केलं. "पूर्वी मराठीमध्ये करिअर म्हणून शिक्षकी पेशा असा समज होता. पण आता तसं नाहीय. मराठी वर्तमानपत्र, मासिकं, रेडियो,चॅनेल २४ x ७ सुरू असतात. त्यामुळे भाषांतरकार, लेखक, सर्जनशील लिखाण यामध्ये नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. श्रोत्यांशी संवाद साधता येणारं आरजे हे क्षेत्र तुम्हाला वेगळी ओळख देऊ शकतं."
*रिधीमा पळणीटकर*
विविध भाषांमधल्या कलाकृती आपल्याकडे येत असल्याने डबिंगला खूप महत्त्व आलं आहे.
अत्यंत वेगळ्या म्हणाव्या अशा डबिंग क्षेत्रात ठामपणे पाऊल टाकणारी रिधीमा पळणीटकर अनेकांसाठी उदाहरण ठरली आहे. एमबीए इन मार्केटिंग केल्यावर घसघशीत उत्पन्न देणारा व्यवसाय सोडून तिने हा मार्ग निवडला. सुमारे ९ वर्षांचा रंगभूमीचा अनुभव गाठीशी घेत तिने डबिंगच्या क्षेत्रात उडी घेतली. सुरुवातीला रिधीमाला यावरुन बोलणी ऐकून घ्यावी लागली. मात्र तिने कसलीही पर्वा न करता काम सुरू ठेवलं. हॉलिवूडपट, बॉलिवूडपट, जाहिराती, वेब सिरीज, मालिका, इ-लर्निंग, चॅनल व्हाइसिंग यांसारख्या अनेक गोष्टींसाठी तिने आवाज दिला आहे. आता सुमारे ७ वर्ष ती या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहे. याबद्दल ती सांगते की, "अत्यंत रंजक असं हे क्षेत्र आहे. मेहनत करण्याची तयारी, काम करण्याची उर्मी आणि स्वतःची जाहिरात करण्याची कला जर तुमच्याकडे असेल तर हे क्षेत्र तुम्हाला नक्कीच यश देऊ शकतं."
अत्यंत वेगळ्या म्हणाव्या अशा डबिंग क्षेत्रात ठामपणे पाऊल टाकणारी रिधीमा पळणीटकर अनेकांसाठी उदाहरण ठरली आहे. एमबीए इन मार्केटिंग केल्यावर घसघशीत उत्पन्न देणारा व्यवसाय सोडून तिने हा मार्ग निवडला. सुमारे ९ वर्षांचा रंगभूमीचा अनुभव गाठीशी घेत तिने डबिंगच्या क्षेत्रात उडी घेतली. सुरुवातीला रिधीमाला यावरुन बोलणी ऐकून घ्यावी लागली. मात्र तिने कसलीही पर्वा न करता काम सुरू ठेवलं. हॉलिवूडपट, बॉलिवूडपट, जाहिराती, वेब सिरीज, मालिका, इ-लर्निंग, चॅनल व्हाइसिंग यांसारख्या अनेक गोष्टींसाठी तिने आवाज दिला आहे. आता सुमारे ७ वर्ष ती या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत आहे. याबद्दल ती सांगते की, "अत्यंत रंजक असं हे क्षेत्र आहे. मेहनत करण्याची तयारी, काम करण्याची उर्मी आणि स्वतःची जाहिरात करण्याची कला जर तुमच्याकडे असेल तर हे क्षेत्र तुम्हाला नक्कीच यश देऊ शकतं."
*सुप्रिया देशपांडे*
इंग्रजी किंवा इतर परदेशी भाषांतील साहित्य किंवा माहिती ही अनेकवेळा सहज आपल्या पचनी पडत नाही. आपल्या मातृभाषेत त्याचं भाषांतर केल्यास आपल्याला ते समजण्या-उमाजण्यास अधिक मदत होते. वरवर हे भाषांतराचं क्षेत्र छोटंसं वाटलं तरी प्रत्यक्षात ते किती मोठं आहे हे दाखवून दिलंय सुप्रिया देशपांडे यांनी. कायदा, अभियांत्रिकी, वैद्यकीय तसंच व्यवसाय या क्षेत्रातील भाषांतर करण्यात त्या निपुण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भाषांतर समितीमध्ये देखील 'प्रायव्हेट ट्रान्सलेटर' म्हणून त्या कार्यरत आहेत. मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, रशियन, गुजराथी, तामिळ, तेलगू भाषांतील भाषांतरदेखील त्या करतात. याबद्दल बोलताना त्या म्हणतात की, ‘कोणत्याही उत्पादनाचं मार्केटिंग करायचं असल्यास ते अनेक भाषांमध्ये करावं लागतं. त्यामुळे भाषांतरकारांची गरज ही दिवसागणिक वाढत आहे. विविध भाषांमध्ये उपलब्ध झालेल्या माहितीमुळे प्रगतीची कवाडं देखील खुली होतात’.
साभार- ज्ञानेश्वरी वेलणकर, कॉलेज क्लब रिपोर्टर,म.टा.
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......
- http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या.....