twitter
rss

[2/12, 7:43 AM] Deepak Mali: 🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🌞वार - रविवार

🌄 दिनांक - 12/02/2017

🎯 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🎯

-----------------------------------------------
_*साभार -Online पुढारी,लोकसत्ता,म.टा.,सकाळ .*_

-----------------------------------------------

_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

-----------------------------------------------
'

दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..
[2/12, 7:43 AM] Deepak Mali: *⛳ भाषा समृद्धीसाठी एक परिच्छेद विकिपीडियावर!*

*_मराठी भाषा दिनानिमित्त शासनाचा अभिनव उपक्रम_*

नीरज पंडित, मुंबई | February 12, 2017

मराठी भाषा संवर्धनासाठी मोठय़ा प्रमाणावर  ‘ऑफलाइन’ प्रयत्न सुरू असतानाच माहिती महाजालावरही मराठी भाषा समृद्ध व्हावी या दृष्टीने येत्या मराठी भाषा दिनानिमित्त सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे अभिनव ‘ऑनलाइन’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामध्ये खुला ज्ञानकोश म्हणून ओळख असलेल्या विकिपीडियाच्या मराठी आवृत्तीत प्रत्येकाने किमान एक परिच्छेद लिहावा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात येणार आहे. यामुळे हा ज्ञानकोश अधिक समृद्ध होणार आहेच, याशिवाय महाजालावरील मराठीचे सामथ्र्य वाढविण्यासही मदत होणार आहे.


मराठी भाषा संवर्धनासाठी काळानुरूप बदल होणे आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊन मराठी भाषा विभागाने या वर्षीच्या मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संगणक व महाजालावरील मराठी समृद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने दरवर्षी शाळा, महाविद्यालयांमध्ये, सरकारी कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे यांनी जरा हटके प्रयत्न करत विकिपीडिया या महजालावरील खुल्या ज्ञानकोशावर सामान्यांनी त्यांच्या गावाबद्दल, गावातील प्रसिद्ध व्यक्तीबद्दल, शाळेबद्दल, पुस्तकाबद्दल अशा विविध विषयांवर किमान एक परिच्छेद लिहावा असे आवाहन केले आहे. यामुळे हा ज्ञानकोश अधिक समृद्ध होईल व मराठी विकिपीडियाचे संकेतस्थळ केवळ इंग्रजीतील अनुवादित माहितीवर अवलंबून न राहता संकेतस्थळावर स्थानिक व नवी माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
अभियानात सहभागी व्हा!

जास्तीतजास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे या उद्देशाने २१ फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिनापासून मराठी भाषा विभागापर्फे जाहिराती दाखविल्या जाणार आहेत. यामध्ये राज्यातील विविध मान्यवरांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तर लोकांना मराठी टंकलेखन कसे करावे त्यासाठी आवश्यक असलेली युनिकोड प्रणाली संगणकात कशी सुरू करावी या संदर्भातील माहितीपटही समाजमाध्यमांचा वापर करून सामान्यांपर्यंत पोहोचविला जाणार असल्याचे विभागाने सांगितले. या सर्व अभियानासाठी मराठी विकिपीडियाचेही सहकार्य घेण्यात आले असून सामान्यांना नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी या उद्देशाने मराठी विकिपीडियातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. सध्या मराठी विकिपीडियावर ४५ हजार ७३९ लेख आहेत.

माहितीच्या महाजालावर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. या दृष्टीने मराठी भाषा विभागातर्फे यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यासाठी ‘संगणक व महाजालावरील मराठी’ या संकल्पनेवर भर देण्यात आला आहे. यामुळे या दिवशी संकल्पनेवर आधारित सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सर्वानी विकिपीडियावर किमान एक परिच्छेद तरी लिहावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

– विनोद तावडे, मंत्री मराठी भाषा विभाग

मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारचा मराठी विकिपीडियाचे व्यासपीठ वापरण्याचा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. यामुळे मराठी विकिपीडियावरील लेखक संख्या वाढणार असून मराठी भाषेतील हा खुला ज्ञानकोश अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे.

  – राहुल देशमुख, प्र-चालक, मराठी विकिपीडिया

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/12, 7:43 AM] Deepak Mali: *🌾 इंजिनीअरिंग, आर्किटेक्चरसाठीही आता ‘नीट’*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

देशभरातील इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर कॉलेजांतील प्रवेशासाठी यापुढे देशपातळीवर एकच प्रवेश परीक्षा (नीट) घेण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०१८–१९ पासून ही परीक्षा घेण्यात येणार असून यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला (एआयसीटीई) या परीक्षेची आखणी आणि त्यासाठी आवश्यक त्या नियमांची पूर्तता करण्याची सूचना शुक्रवारी देण्यात आली. ज्याप्रमाणे आयआयटीच्या प्रवेशासाठी देशपातळीवर परीक्षा घेण्यात येते, त्याच धर्तीवर ही परीक्षा असणार असल्याचे सांगण्यात येते.
देशभरातील इंजिनीअरिंग कॉलेजातील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकसमान पात्रता परीक्षा घेण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) बैठकीत चर्चेत आला होता. त्यानंतर शुक्रवारी यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्णय घेत एआयसीटीईला त्यासंदर्भातील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारी नियमांची काळजी घेऊन हा प्रस्ताव तयार करण्याची सूचना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केल्याचे सूत्रांनी सांगितले. विद्यार्थ्यांवरील परीक्षांचे वाढते ओझे कमी करण्यासाठी या निर्णयाचा फायदा होईल, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी राज्य आणि डिम विद्यापीठांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. ही परीक्षा वर्षातून फक्त एकदाच न घेता अनेकवेळा घेण्याचा विचार असल्याचेही यावेळी सूत्रांकडून सांगण्यात येते. यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय बोर्डाची घोषणा केंद्र सरकारतर्फे करण्यात आली. याच धर्तीवर ही परीक्षा होणार असल्याचे कळते. दरम्यान, यासंदर्भात एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधला असता, या निर्णयाचा आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाशी संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/12, 7:43 AM] Deepak Mali: *🎋 सोलापूरचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी घाटगे निलंबित*

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर - भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 14 फेब्रुवारीला फाशी देण्यात आल्याचा शोध लावत जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये हा दिवस कसा साजरा करावा याचे मार्गदर्शन करणारे परिपत्रक सोलापूर जिल्हा परिषदेचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी तानाजी घाटगे यांनी काढले होते.

वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाची अवहेलना करत त्यांनी हे परिपत्रक काढल्याने शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी शिक्षणाधिकारी घाटगे यांना निलंबित केले आहे.

14 फेब्रुवारीला मुलांच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून विद्यार्थ्यांकडून त्यांचे औक्षण करावे, यासह विविध कार्यक्रम शाळास्तरावर राबविण्याची सूचना शिक्षणाधिकारी घाटगे यांनी परिपत्रकात केली होती. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्चला फाशी देण्यात आली होती. शिक्षणाधिकाऱ्यांनी चुकीची तारीख देऊन काढलेल्या या परिपत्रकाची गंभीर दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. हे परिपत्रक रद्द करत सोलापूरचे शिक्षणाधिकारी घाटगे यांच्यावर कारवाईची सूचना प्रधान सचिवांना दिली होती.

शिक्षणाधिकाऱ्यांनी धोरणात्मक परिपत्रके आपल्यास्तरावर काढू नयेत अशी सूचनाही त्यांनी केली आहे. घाटगे यांना निलंबित केल्यानंतर निलंबित कालावधीसाठी त्यांना सोलापूर मुख्यालय देण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/12, 7:43 AM] Deepak Mali: *🌴 शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात 9 मागण्यांचे ठराव*

By pudhari | Publish Date: Feb 12 2017

मुंबई : प्रतिनिधी

शिक्षकांच्या विविध 9 मागण्यांचे ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या परळ येथे झालेल्या अधिवेशनात मंजूर करण्यात आले. या अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही हजेरी लावत, शालेय शिक्षण विभागात अनेक बदल केले असून या बदलांना सामोर जावून राज्याला शिक्षणात पुढे आणण्यास सहकार्य करा असे आवाहनही केलेेेे. अशैक्षणिक लोकांनी शिक्षक चळवळीवर अतिक्रमण करुन शिक्षक आमदारकी पटकावत आहेत याला विरोध करीत शिक्षकांचा आमदार शिक्षकच असावा अशा मागणीचा सूर शिक्षकांनी या अधिवेशनात व्यक्‍त केला.

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, कलचाचणी, दहावी पुनर्परीक्षा यासह अन्य योजना राबविल्याने येत्या काही काळात राज्य शिक्षणात पुन्हा एक क्रमांकाचे राज्य होईल असा आशावाद शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्‍त केला. शालेय शिक्षण विभाग व राज्यातील सर्व शिक्षकांच्या मेहनत व कष्टाने हे सर्व शक्य होत असल्याने समाजात शिक्षकांचा सन्मानही वाढत असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी यावेळी सांगितले. नागपूर विभागाचे शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षणाधिकार्‍यांच्या भ्रष्टाचारांचा पाढा या अधिवेशनात वाचला.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃