twitter
rss

[2/10, 5:45 PM] Deepak Mali: 🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🌞वार - शुक्रवार

🌄 दिनांक - 10/02/2017

🎯 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🎯

-----------------------------------------------
_*साभार -Online पुढारी,लोकमत,म.टा.,सकाळ .*_

-----------------------------------------------

_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

-----------------------------------------------
'

दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..
[2/10, 5:45 PM] Deepak Mali: *🎋मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर*

Maharashtra Times | Updated Feb 9, 2017

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

मुंबईसह दहा महापालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २८३ पंचायत समिती निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी राज्य निवडणूक आयोगानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तशी अधिसूचनाच निवडणूक आयोगानं काढली आहे.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या दहाही महापालिकांसाठी मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून त्यादिवशी या महापालिका क्षेत्रांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. *तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि गडचिरोली या ११ जिल्हा परिषदांकरिता व त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांच्या क्षेत्रातही मतदानाच्या दिवशी म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.* मात्र संपुर्ण गडचिरोलीत निवडणुका नाहीत, गडचिरोली जिल्हा परिषदेतील अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या ४ पंचायत समितींसाठीच निवडणुका असल्यानं गडचिरोलीत एवढ्या भागापुरतीच ही सुट्टी मर्यादीत राहणार आहे.

जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड,नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या १५ जिल्हापरिषदांकरिता त्याच्या कार्यक्षेत्रात व त्यांतर्गत १६५ पंचायत समित्या क्षेत्रांध्ये गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतू गडचिरोलीत केवळ कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी आणि मुलचेरा या ८ पंचायत समित्यांपुरतीच ही सुट्टी मर्यादित राहणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/10, 5:45 PM] Deepak Mali: *🌴‘अधांतरी’ शिक्षकांना आर्थिक झळ*

म. टा. वृत्तसेवा, ठाणे

जुन्या शाळेने फिरविलेली पाठ आणि समायोजित शाळेने रूजू होण्यास केलेला मज्जाव यांमुळे अधांतरी राहिलेल्या शिक्षकांना यंदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. समायोजनाच्या अपूर्ण राहिलेल्या प्रक्रियेमुळे नोकरीबाबत टांगती तलावर असतानाच जुन्यासह नव्या शाळांनीही जानेवारी महिन्याचा पगार न दिल्याने जिल्ह्यातील ५० शिक्षकांमधील अस्वस्थता अधिक वाढली आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत खासगी शाळांमधील शिक्षकांना गेल्या काही महिन्यांपूर्वी समायोजन प्रक्रियेचा सामना करावा लागला. अशा अतिरिक्त शिक्षकांना जुन्या शाळांतून निरोप देत नव्या शाळांमध्ये रूजू होण्याचे आदेश देण्यात आले. समायोजित शिक्षकांनी दिलेल्या संबंधित नव्या शाळांमध्ये हजेरी लावली असता या शाळांनी शिक्षकांना भरती होण्यास परवानगी दिली नाही. सरकारची शिक्षक भरतीस बंदी तसेच शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या संस्थाचालकांनी स्वखर्चाने रिक्त जागांवर पात्र शिक्षकांची नेमणूक केल्याने समायोजित शिक्षकांची भरती करण्यास अनेक शाळांनी नकार दर्शविला. सुरुवातीला शिक्षकांची संख्या अधिक होती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून त्यापैकी अनेकांचे समायोजन झाले आहे. मात्र सध्या ५०शिक्षक अद्यापही समायोजनाच्या कात्रीत अडकले आहेत. या शिक्षकांना त्यांच्या जुन्या शाळांकडून पगार देण्याची सूचना शिक्षण आयुक्तांनी दिली असली तरी अनेक शाळा त्या नियमाकडे डोळेझाक करत आहेत. नव्या शाळेत न झालेली भरती आणि जुन्या शाळांकडून बंद झालेले वेतन यांमुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मायोजन प्रक्रियेमुळे पगार बंद झाल्याची तक्रार शिक्षकांकडून केली जात आहे. या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडे धाव घेतली असली तरी अद्याप त्यांना उत्तर मिळालेले नाही.
सध्या हे सर्व शिक्षक जिल्हा परिषदेत नियमित हजेरी लावत असून तेथे सांगितली जाणारी कामे त्यांना करावी लागत आहेत. समायोजन प्रक्रियेत अडकलेल्या शिक्षकांची भरती व्हावी तसेच त्यांना लवकरात लवकर पगार हाती मिळावा.

दिलीप डुंबरे, ठाणे शहराध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/10, 5:45 PM] Deepak Mali: *🎋 कोल्हापूर जि. प. शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या चौकशीचे आदेश*

By pudhari | Publish Date: Feb 10 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी गुरुवारी दिले. शिंदे यांनी आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याच्या व भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गेले अनेक दिवस या विभागातील कर्मचार्‍यांची चौकशी चर्चेत आली होती. मात्र, आता शिक्षणाधिकार्‍यांच्या चौकशीचा आदेश झाला असून आणखीही तक्रारी पुढे येण्याची शक्यता आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या कारभाराबाबत गेली अडीच वर्षे असंतोष आहे. शिक्षण संस्था चालक, शिक्षक व कर्मचार्‍यांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषणाचेही अनेक प्रकार घडले आहेत. वैयक्तिक मान्यतेबाबत वाईट अनुभव येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिक्षक व संस्था चालक यांच्याबाबतीत उच्च न्यायालयाने शिक्षणाधिकार्‍यांना आदेश देऊनही त्याची दखल शिंदे घेत नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे. या सर्व तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे करण्यात आल्या होत्या. शिक्षण संस्थाचालकांप्रमाणेच विभागातील कर्मचार्‍यांनीही शिक्षणाधिकार्‍यांच्या कारभाराविरोधात तक्रार केली होती. यातील अनेक तक्रारी गंभीर होत्या. मात्र, या तक्रारींची चौकशी करण्यापेक्षा ज्या कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या, त्यांच्याच मागे प्रशासनाने चौकशीचा ससेमिरा लावला होता.

दरम्यान, विभागातील कर्मचार्‍यांनी दिलेल्या खुलाशावर स्पष्ट अभिप्राय देण्याचे आदेश शिंदे यांना देण्यात आले होते. याबाबतही तत्काळ कारवाई करण्यात आली नाही. शिंदे यांच्याविरोधात शिक्षण संस्थाचालक, शिक्षकांच्या तक्रारी वाढतच गेल्यानंतर मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शिंदे यांच्या चौकशीचे आदेश देण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्याबाबत आलेल्या तक्रारींची दहा दिवसांत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या तक्रार अर्जांची चौकशी होणार आहे यात संदीप माने, नरेंद्र मुळीक, बाळासाहेब खोपकर, जयकुमार कोले, सुशांत बोरगे, उत्तम कांबळे, निनावी तक्रार अर्ज, शिवपार्वती शिक्षण प्रसारक मंडळ, थडके दगडू मारुती, एन. एम. कांबळे व 7 फेब्रुवारी 2017 रोजी मंजूर करण्यात आलेल्या टिपणीचा समावेश आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/10, 5:45 PM] Deepak Mali: *🌱 बारावी'च्या ‘आयटी’साठी बाह्य परीक्षक*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

बारावीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) या विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी आता शाळेबाहेरचे परीक्षक नेमण्याची घोषणा बोर्डाने केली आहे. शिवाय लेखी परीक्षेप्रमाणे प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षेसाठीसुद्धा भरारी पथकांची नियुक्ती करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असून राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी या निर्णयांचे स्वागत केले आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांवर असलेले सावट दूर झाले असले तरी बुधवारी हॉलतिकटिाचा गोंधळ समोर आला. यासंदर्भात मुंबई विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप म्हणाले की, यंदा हॉलतिकीट गोंधळासंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्याची तक्रार
आपल्यापर्यंत आलेली नाही. हॉलतिकटिांमध्ये काही चुका असल्यास विद्यार्थ्यांनी कॉलेजमार्फत बोर्डाकडे संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

एकूण शिक्षकांपैकी केवळ १५ ते २० टक्केच शिक्षक प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेसाठी परीक्षक म्हणून नियुक्त केले जातात. त्यामुळे निवडणूक कामांचा परिणाम या परीक्षांवर होणार नसून परीक्षा सुरळीत होतील. त्याची काळजी विद्यार्थ्यांनी करू नये.

- विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/10, 5:45 PM] Deepak Mali: *📋कॉपीबहाद्दरांना जागेवर नोटीस*

Maharashtra Times | Updated Feb 9, 2017

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘दहावी-बारावीच्या परीक्षेत एखादा विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळला, तर त्याला त्याच दिवशी सुनावणीला उपस्थित राहण्याची नोटीस द्या,’ असा आदेशच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाचे सचिव बी. के. दहिफळे यांनी केंद्रसंचालकांना दिला.

बोर्डाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यावर यापूर्वी कॉपीकेस करण्यात येत होती. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला बोर्डाने तयार केलेल्या चौकशी समितीसमोर चौकशीसाठी बोलवले जात होते. विद्यार्थ्यांची परीक्षा संपल्यानंतर चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस त्यांना पाठवली जात होती. परंतु, यंदा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्याला लगेच नोटीस देण्यात येणार आहे. याबाबत दहिफळे यांनी सांगितले, ‘परीक्षा संपल्यानंतर बऱ्याच वेळा विद्यार्थी सुटीच्या काळात गावाला जातात. या काळात विद्यार्थ्यांना चौकशीला उपस्थित राहण्याची पाठवलेली नोटीसही मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळेच यंदापासून गैरप्रकार करणाऱ्यांना जागेवर नोटीस देण्याचे अधिकार केंद्रसंचालकांना दिले आहेत.’

दक्षता पथकांवर मुख्याध्यापकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना दहिफळे म्हणाले, ‘दक्षता पथक, भरारी पथक व बैठे पथक हे परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी नियुक्त केले जातात. दक्षता पथकातील सदस्य चुकीच्या पद्धतीने काम करीत असतील तर केंद्र संचालकांनी त्यांना योग्य भाषेत समजून सांगावे. मात्र, त्यानंतरही दक्षता पथकाचा त्रास झाल्यास त्याबाबत बोर्डाकडे अथका शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात यावी,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘प्रश्नपत्रिका घेऊन कोणताही विद्यार्थी बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्यावी, प्रश्नपत्रिकेचा गठ्ठा फोडताना त्यावर विद्यार्थी व पोलिस यांची स्वाक्षरी घ्यावी, प्रात्यक्षिक परीक्षा वेळेवर घ्याव्यात, परीक्षा चालू असताना परीक्षा केंद्राच्या आवारात व्हिडिओ चित्रिकरण करावे,’ अशा सूचनाही दहिफळे यांनी दिल्या.

‘जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान तीन वर्षांपासून राबवले जात आहे. परंतु, आपला जिल्हा शंभर टक्के कॉपीमुक्त होण्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा असून यंदा त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे’, असे आवाहन शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी केंद्रसंचालक व मुख्याध्यापकांना केले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम नियोजन करण्यासाठी केंद्रप्रमुखांची गुरुवारी न्यू आर्टस् कॉलेजच्या शाहू महाराज सभागृहामध्ये बैठक झाली. या बैठकीला बोर्डाचे विभागीय सचिव बी. के. दहिफळे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले, दिलीप थोरे, उमेश डोंगरे, रामदास खेडकर, राजेंद्र पवार, अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्यासह जिल्ह्यातील २५४ केंद्राचे केंद्रसंचालक उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी पोले म्हणाले, ‘परीक्षा शांतपणे व सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रसंचालकांनी योग्य नियोजन करावे. पर्यवेक्षकांची बैठक घेऊन त्यांना सूचना द्याव्यात. जे पर्यवेक्षक अधिकृत असतील त्यांचीच नियुक्ती करावी. परीक्षा केंद्रांवर अनधिकृत व्यक्ती प्रवेश करणार नाही, याची काळजी घ्यावी. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने कॉपीकेस केली जाते, याबाबतही केंद्रसंचालकांनी माहिती करून घ्यावी. प्रत्येक केंद्रावर स्थापलेल्या दक्षता पथकाची मदत घ्यावी.’ 

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃