twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🚀 *PSLV-C37 च्या ऐतिहासिक उड्डाणाचे काउंटडाउन सुरू* 🚀

      भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) उद्या *एकाचवेळी १०४ उपग्रह* अवकाशात सोडून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याच्या वाटेवर आहे. पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही) या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येतील. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून पीएसएलव्ही-सी ३७ अवकाशात झेपावेल. पीएसलव्ही प्रक्षेपकाचे हे ३९ वे उड्डाण असून रॉकेटला अतिरिक्त मोटर्स लावण्यात येणाऱ्या एक्सएल प्रकारातील हे पीएसएलव्हीचे १६ उड्डाण ठरेल. इस्रोच्या या यशामुळे आता अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

🛰 *पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण कधी होणार?*

पीएसलव्ही सी-३७ च्या उड्डाणाचे काउंटडाउन मंगळवारी पहाटे पाच वाजून २८ मिनिटांनी सुरू झाले आहे. उद्या सकाळी नऊ वाजून २८ मिनिटांनी पीएसएलव्ही सी -३७ अवकाशात झेपावेल.

🛰 *पीएसएलव्ही सी-३७ कुठून प्रक्षेपित होणार?*

आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-३७ उड्डाण करेल.

*🛰पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण कुठे पाहता येईल?*

पीएसएलव्ही सी-३७ च्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहता येईल. याशिवाय, इस्त्रोच्या संकेतस्थळावर उड्डाण ऑनलाईन पाहता येईल.

पीएसएलव्ही सी-३७ किती उपग्रह घेऊन उड्डाण करणार?
पीएसएलव्ही सी-३७ यावेळी एकाच उड्डाणातून १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल. यामध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रहांचा समावेश आहे.

🛰 *पीएसएलव्ही सी-३७ कोणत्या देशांचे उपग्रह अवकाशात सोडेल?*

पीएसएलव्ही सी-३७ च्या माध्यमातून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये १०१ विदेशी आणि तीन भारतीय उपग्रह असतील.यामध्ये अमेरिका, जर्मनी, इस्त्रायल, कझाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.

   🛰 *पीएसएलव्ही सी-३७ चे उड्डाण ऐतिहासिक का ठरणार आहे?*

एकाचवेळी प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या संख्येमुळे ‘पीएसएलव्ही सी ३७’चे उड्डाण ऐतिहासिक ठरणार आहे. एकाच उड्डाणातून अधिकाधिक उपग्रह वाहून नेल्यास प्रत्येक उपग्रहामागील उड्डाणाचा खर्च अत्यंत कमी होतो. एकाच उड्डाणातून इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित देशांचे उपग्रह व्यावसायिक तत्त्वावर इस्रो प्रक्षेपित करत असल्यामुळे जगभरातील अवकाश कंपन्यांचे ‘पीएसएलव्ही’च्या उड्डाणाकडे विशेष लक्ष आहे. अवकाश क्षेत्रातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेतील खासगी कंपन्या आपले उपग्रह नासा किंवा अमेरिकी कंपन्यांऐवजी ‘इस्रो’च्या माध्यमातून प्रक्षेपित करणे किफायतशीर समजत आहेत, यातच येत्या काळात भारतासाठी उपलब्ध होणाऱ्या व्यावसायिक संधीची झलक दिसून येते. त्यामुळे अवकाश संशोधनाच्या क्षेत्रामध्ये एका नव्या दरयुद्धाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

🛰 *इस्रोची यापूर्वीची ऐतिहासिक कामगिरी काय होती?*

-यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) एकाचवेळी २० उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले होते. जानेवारी महिन्यात एकाचवेळी ८३ उपग्रह अंतराळात सोडण्याचा इरादा होता. मात्र, ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आता आणखी २० उपग्रहांची भर पडली असून उद्या पीएसएलव्ही सी-३७ एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करेल. यापूर्वी एकाच उड्डाणातून अमेरिकेने सर्वाधिक २९, तर रशियाने ३७ उपग्रह अवकाशात पाठवले आहेत.

🛰  *भारताचे किती उपग्रह आहेत. त्याचा फायदा काय होणार आहे?*

-पीएसएलव्ही सी-३७कडून प्रक्षेपित करण्यात येणाऱ्या १०४ उपग्रहांमध्ये भारताच्या तीन उपग्रहांचा समावेश आहे. कार्टोसॅट-२डी (वजन ७३० किलो) , आयएनएस १ए आणि आयएनएस १बी (वजन प्रत्येकी ३० किलो) अशी या उपग्रहांची नावे आहेत. यापैकी कार्टोसॅट-२डी हा कार्टोसॅट मालिकेतील पाचवा अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह असेल. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी आणि अवकाशातून पृथ्वीची छायाचित्रे पाठविण्यासाठी मुख्यत्त्वेकरून कार्टोसॅट-२डी चा वापर केला जाईल. या माहितीचा उपयोग मॅप अॅप्लिकेशन्स, नागरी व ग्रामीण विकास आणि सुविधा व्यवस्थापनासाठी केला जाईल.
तर आयएनएस १ए या नॅनो उपग्रहाचा वापर भविष्यातील प्रयोग, विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात येणारे उपग्रह व अन्य तंत्रज्ञानासाठी केला जाईल.
आयएनएस १बी हादेखील नॅनो उपग्रह असून आएएनएस १ए नंतर तो अवकाशात प्रक्षेपित केला जाईल. या उपग्रहातील रिमोट सेन्सिंग कलर कॅमेऱ्याचा वापर उच्च क्षमतेची छायाचित्रे काढण्यासाठी करण्यात येईल.

🛰  *पीएसएलव्ही सी-३७ मोहिमेचे प्रमुख कोण आहेत.?*

-भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) प्रमुख या नात्याने ए.एस. किरण कुमार यांच्याकडे पीएसएलव्ही सी-३७ मोहिमेची जबाबदारी आहे.
पीएसएलव्ही सी-३७ च्या उड्डाणाचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवर पाहता येईल. याशिवाय, इस्त्रोच्या संकेतस्थळावर उड्डाण ऑनलाईन पाहता येईल.

*🛰पीएसएलव्ही सी-३७ किती उपग्रह घेऊन उड्डाण करणार?*