🌞वार - शनिवार
🌄 दिनांक - 04/02/2017
🎯 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🎯
-----------------------------------------------
_*साभार -Online पुढारी, लोकमत,म.टा.,सकाळ & A. B. P. माझा*_
-----------------------------------------------
_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
-----------------------------------------------
'
दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....
http://guruvarykm.blogspot.in/
या blog ला भेट द्या..
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *💶 शिष्यवृत्तीसाठी खात्याला जोडा आधार क्रमांक*
म. टा. प्रतिनिधी, पुणे
सरकारच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा आधार क्रमांक शिष्यवृत्ती जमा होणाऱ्या बँकेच्या खात्याशी तातडीने जोडावा, असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त के. एस. आढे यांनी केले आहे. बँकेच्या खात्याशी आधार क्रमांक जोडलेला असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्राधान्याने शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याचे आढे यांनी जाहीर केले आहे.
सरकारतर्फे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा परतावा देण्यात येतो. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तो आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडून शाळा अथवा कॉलेजला सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर पात्र विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती त्याच्या बँक खात्यावर, तर शिक्षण शुल्काची रक्कम कॉलेजच्या बँक खात्यावर परस्पर जमा केली जाते.
यापुढे विद्यार्थ्यांना ही रक्कम मिळवण्यासाठी आधार क्रमांक खात्याला जोडावा लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची आणि आधार कार्डाची छायांकित प्रत बँकेत जमा करायची आहे. त्यानंतर बँकेकडून खात्याला आधार क्रमांक संलग्नित केल्याची पावती घेऊन ती शिष्यवृत्तीला जोडायची आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *🌾सांगली जि.प.शाळांची गुणवत्ता वाढली*
सकाळ वृत्तसेवा
सांगली - खासगीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेतही जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी प्राथमिक शाळांत पटसंख्या वाढवली. आंतरबाह्य शाळांची सुधारणा, शिष्यवृत्तीत खासगी संस्थांपेक्षा सरस निकाल लागले. प्रगत शैक्षणिक उपक्रमांतही सर्व शाळा अग्रेसर ठरल्या. खासगी, इंग्रजी माध्यमातील मुले पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वळायला लागले. त्याचे श्रेय शिक्षकांना जाते.....
'' प्राथमिक शाळांच्या शिक्षकांबद्दलची ओरड गेल्या चार वर्षांपासून थांबलीय. आम्ही राबविलेल्या विविध उपक्रमांना पालक साथ देत आहेत. त्यामुळे लोकवर्गणीतून आंतर-बाह्य शाळा सुधारल्या. गुणवत्तेत आम्ही कमी पडणार नाही. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटना पदाधिकाऱ्यांनाही हेलपाटे घालायला लागू नयेत, असे प्रशासकीय काम व्हावे. प्रशासनाचे सहकार्य झाले तर झेडपीच्या शाळा राज्यात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी आमच्या संघटना जबाबदारी घेतील.''
*- विनायकराव शिंदे, जिल्हाध्यक्ष शिक्षक संघ*
*जमेच्या बाजू*
झेडपीच्या १७०५ शाळा
पैकी डिजिटल शाळा- ५०३
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रमध्ये ५०१ शाळा
प्रगतमध्ये विभागात सांगली प्रथम
कृतियुक्त अध्ययन शाळा- ९०
सेमी इंग्रजी शाळा- ६८१ (४० टक्के)
आयएसओ शाळा-६००
सुधारित शाळा संधी- २८१
शिक्षक पदे मंजूर ६२३४,
रिक्त-१७१
सर्व शाळांत ज्ञानरचनावाद उपक्रम
प्रगत केंद्र ८४ (प्राथ. ४३, उच्च प्राथमिक-४०)
दोन वर्षांत पटसंख्या वाढली
यंदापासून तालुका-
जिल्हा क्रीडा स्पर्धा सुरू
*उणिवा अशा*
रोस्टरपूर्ती अभावी २०१४ पासून पदोन्नत्या रखडल्या
दोन वर्षांपासून समायोजन रखडले
आठवीचे वर्ग सुरू, शिक्षक मात्र मिळेनात
पटानुसार पद मान्यता,
खोल्यांअभावी शिक्षक मिळेनात
सेवाज्येष्ठता याद्यांचा घोळ कायम
अंशदानच्या स्लिपा देण्यात दिरंगाई
शिक्षकांच्या पगारास विलंब
पदवीधर शिक्षक लाभापासून वंचित
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी
प्रलंबित
काही सहाव्या आयोग हप्त्यांच्या लाभापासून वंचित
शिक्षण सेवकांना नियमानुसार शिक्षक म्हणून घ्यावे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *🎋‘खासगी क्लासेसवर नियंत्रणाची गरज’*
Maharashtra Times | Updated Feb 4, 2017,
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
खासगी कोचिंग क्लासेस बंद करता येणार नाहीत. परंतु त्यांच्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे, असे महत्त्वपूर्ण मत शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच केंद्र सरकारने यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे आदेशही न्यायालयाने यावेळी दिले.
मान्यता नसलेल्या खासगी कोचिंग क्लासेसचे पीक आले असून, त्यांच्याकडून शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडया’ने (एसएफआय) याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायधीश ए. के. गोयल आणि यू. यू. ललित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तन्यायालयाकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे. केंद्राने पात्रता परीक्षांतील गुणांना महत्त्व देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. देशात शेकडो बोर्ड आहेत. त्यांच्या प्रवेश परीक्षा रद्द करता येणार नाहीत. परिणामी खासगी क्लासेस बंद करणे शक्य नाही. त्यांच्यावर नियंत्रण आणता येईल व सरकारने याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करावीत, असे खंडपीठाने नमूद केले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *📖 पुस्तकातल्या ‘त्या’ चुकीचे होणार परीक्षण - शिक्षणमंत्री*
Published :04-February-2017
मुंबई : समाजात मानवी मूल्ये जोपासली जावीत, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हा समाजशास्त्र विषयाचा मुख्य हेतू आहे. पण, या विचाराला तडा जाईल असेउल्लेख बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात हुंडापद्धतीविषयी आढळल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली. समाजशास्त्राच्या पुस्तकातून असे धडे विद्यार्थ्यांना कसे दिले जातात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात ‘भारतातील प्रमुख सामाजिक समस्या’ नावाचा धडा आहे. या धड्यामध्ये हुंडापद्धतीविषयी माहिती देताना भारतातील काही महिला या कुरूप असल्यामुळे त्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात. त्यामुळे हुंडा पद्धतीला वाव मिळतो, असे नमूद करण्यात आले आहे. मुलीच्या लग्नात अडचणी येत असल्यास मुलीच्या पालकांना अथवा कुटुंबीयांना मुलाच्या घरच्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतात.त्यामुळे हुंडा पद्धत सुरू राहते, अशा आशयाचा हा मजकूर आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या या हलगर्जीपणाबद्दल आणि शिक्षणतज्ज्ञांनी घेतलेल्या आक्षेपानंतर शिक्षणमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले. समाजशास्त्राच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील धड्यातील मजकुराबाबत घेतलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याशी चर्चा केली. त्यांना यासंदर्भात योग्य सूचना देण्यात आल्या आहेत.हा अभ्यासक्रमातील धड्यातील मजकूर जुना असून तो गेल्या ३ वर्षांपासून या पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. परंतु या विषयात राजकारण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम असे दोन्ही विषय एकत्रित करू नये, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.हा अभ्यासक्रमाचा विषय असून अभ्यासक्रम ठरविण्याचे काम हे अभ्यास मंडळ करीत असते. समाजातील वास्तव अशा प्रकारच्या अभ्यासक्रमातून दाखविण्याचा प्रयत्न अभ्यास मंडळाने केला असावा, असेही तावडे यांनी सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *🌸मराठीचे अस्तित्व धोक्यात!*
By pudhari | Publish Date: Feb 4 2017
पु. भा. भावे साहित्य नगरी (डोंबिवली) : प्रतिनिधी
आपली भाषा, साहित्य आणि संस्कृती ही वैश्विक दबावाने आलेल्या आणि फोफावत चाललेल्या इंग्रजी सावटामध्ये अडकून पडली आहेच, पण भौतिक संपन्नतेच्या आणि तद्दन सुखवादी कल्पनांच्या आहारी गेलेल्या समाजामुळेही तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आपल्या जीवनाला सुखवादी बनविण्यासाठी जे शिक्षण, ज्या पदव्या आणि ज्या नोकर्या हव्या आहेत त्या केवळ इंग्रजीच्या खिंडीतूनच निघून मिळत आहेत. यामुळे मराठी संस्कृती ही मराठी मनांच्या जागरूकतेवर आणि त्यांच्या उत्स्फूर्त कृतिपूर्णतेवर अवलंबून राहिली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे स्पष्ट मत 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
डोंबिवलीत 90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शुक्रवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे, मावळते अध्यक्ष श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. कपिल पाटील, महापौर राजेंद्र देवळेकर, स्वागताध्यक्ष गुलाब वझे आदी उपस्थित होते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
[2/4, 11:57 AM] Deepak Mali: *🎋'माझा' इफेक्ट : अखेर त्या शिक्षकांना 14 महिन्यांचा थकीत पगार मिळाला!*
By: विशाल बडे, एबीपी माझा, मुंबई
मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरे गावातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांचा अखेर 14 महिन्यांचा थकीत पगार मिळाला आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिल्यानंतर पगार देण्यास सुरुवात केली होती. मात्र आता थकित पगारही शिक्षकांना मिळाला आहे.
पटसंख्या कमी असल्याचं कारण दाखवत आदिवासी विकास विभागाकडून या शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार तब्बल 14 महिन्यांपासून रोखण्यात आला होता. शिक्षकांनी अनेकदा मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिल्यानंतर शिक्षकांना नियमित पगार देण्यास सुरुवात करण्यात आली होती.
मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांना दोन टप्प्यांमध्ये 14 महिन्यांचा पगार देण्यात आला. 14 महिने या शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. तसेचं बँकेचे हफ्ते थकल्याने अनेकांनी जप्तीची नोटीस देखील बँकेने बजावली होती. आता पगार मिळाल्याने सर्वच शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
*काय आहे प्रकरण ?*
उंबरे गावातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांचा पगार 14 महिन्यांपासून रोखण्यात आला होता. या शाळेत शिकवणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.
पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षकांचा पगार बंद करण्यात आल्याचं आदिवासी विकास विभागाकडून सांगण्यात येत होतं. विशेष म्हणजे ही शासकीय अनुदानित शाळा आहे. संबंधित विभागाकडून पगार दिला जाईल, एवढंच आश्वासन शिक्षकांना दिलं जात होतं. मात्र 14 महिने या शिक्षकांना पगारापासून वंचित रहावं लागलं.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃