twitter
rss

🎋  निवडणुकीनंतर शिक्षकांना रजा द्यावी*

पुणे : जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग ४६ ते ४८ तास काम करावे लागते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामावर रुजू व्हावे लागते, परिणामी कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे निवडणुकीचे काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना रजा द्यावी, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कामावर आहेत. येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच सर्वांना संबंधित केंद्रावर कार्यरत व्हावे लागणार आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सर्व निवडणूक यशस्वीपणे पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत निवडणुकीचे काम चालणार आहे. परिणामी सलग ४६ ते ४८ तास काम केल्याने या कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडणार आहे.
त्यामुळे निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने रजा द्यावी, या मागणीचे निवेदन शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव, राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*📜मोडी लिपीतील इतिहास धूळखात*

By pudhari
पिंपरी : वर्षा कांबळे

आजकाल इंग्रजी शिकणार्‍यांची संख्या वाढत आहे, ही काळाचीही गरज आहे. इंग्रजीचे इतर भाषांमध्ये भाषांतर करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे; परंतु मोडी लिपीतील दडलेला इतिहास समोर यावा, यासाठी मोडी लिपी अभ्यासकांची गरज आहे. अनेक ऐतिहासिक कागदपत्रे मोडीमध्ये असून, संशोधकांअभावी धूळखात पडलेली आहेत.

शिक्षण व नोकरीमध्ये यशस्वी होण्यासाठी इंग्रजी भाषा येण्यासाठी सर्व जणच धडपडत आहेत. इंग्रजी भाषा गरजेपोटी व प्रतिष्ठेसाठी शिकली जाते, तशी मोडी लिपी शिकणारे व लिहिता- वाचता येणारे अभावाने कमीच आहेत. मोडी लिपी शिकण्याविषयी फारशी जागृती होताना दिसून येत नाही, त्यामुळे ही मोडी लिपी शिकलो तर आपल्याला पुढील काळात उत्पन्नाचे साधनही बनू शकते, हा संदेश आजकालच्या तरुणांपर्यंत पोहचत नाही. मराठी साम्राज्याचा मोडी कागदांमध्ये दडलेला इतिहास समोर यावा, यासाठी मोडी लिपी शिकणे महत्त्वाचे आहे. शिवकालीन मोडी लिपी व पेशवेकालीन मोडी लिपी असे मोडी लिपीचे दोन प्रकार आहेत. यामध्ये पेशवेकालीन पुस्तके व शिवकालीन कागदपत्रे उपलब्ध आहेत. आज कितीतरी साहित्य, कागदपत्रे आदी मोडी लिपीमध्ये उपलब्ध असून,  85 टक्के इतिहास हा परकीय भाषांतील लिखाणामधून घेतलेला आहे आहे. फक्त 15 टक्के इतिहासच मोडी लिपीमधून घेतला आहे. मोडी लिपीचे अभ्यासक मिळत नसल्यामुळे पूर्णत: इतिहास जगासमोर आलेला नाही. कालबाह्य मोडी लीपीचे पुनरुज्जीवन व्हावे, मोडीतील जुन्या कागदपत्रांचे वाचन करता यावे, अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकणे, इतिहास विषयाची आवड निर्माण करणे, संशोधनवृत्ती निर्माण करणे, यासाठी मोडी लिपीची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. विद्यापीठस्तरावर मोडी लिपीचे वर्ग, कार्यशाळा घेणे अशा प्रकारचे उपक्रम घेतले जातात, त्यास फारसा प्रतिसाद मिळत नाही. तसेच वारसाहक्काची काही कागदपत्रे ही मोडी लिपीमध्ये उपलब्ध आहेत. मोडी लिपीचे वाचन फारसे कोणाला येत नसल्यामुळे ज्यांच्याकडे अशी कागदपत्रे आहेत, त्यांना अशा अभ्यासकांचा शोध घ्यावा लागतो. आणि त्यांच्याकडून त्याचे वाचन व भाषांतर करून घ्यावे लागते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*🎋कोल्हापुरातील टेंबलाईवाडीच्या मुलांना मिळतेय लंडनचे शिक्षण*

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 17 - 

सुमारे १६६७साली स्थापन झालेल्या त्र्यंबोली विद्यालयात २०१२ पर्यंत तसा सुविधांचा वाणवाच होत. शाळेत सुमारे दोनशे विद्यार्थी शिकतात. त्यामुळे  इमारत अपुरी पडायाची. त्यात वीज नव्हती की पिण्याच्या पाण्याची सोय. अशा वेळी प्रिन्स्टन्स हॉस्पिटलमधल्या  डॉ. सचिन कुलकर्णी  यांच्याकडे संशोधनानिमित्त जेन कॉनव्हे यांचं येणं झालं. डॉ. कुलकर्णी हे टेंबलाईवाडीमध्येच राहतात. काही कारणामुळे जेन यांना या शाळेत जायचायोग आला. यावेळी  शाळेची अवस्था पाहून जेन यांना आश्चर्य वाटले व तिथल्या मुलांबद्दल आस्था निर्माण झाली. शाळेची अवस्था फारच बिकट होती अशा वेळी इथल्या सोयी-सुविधांविषयी जेन यांनी विचारणा केली व मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यामध्ये डॉ. कुलकर्णी यांनाही सहभागी करीत शाळेत पाणी शुद्धीकरण यंत्र, नवीन वर्गांची बांधणी करुन  पुस्तके भेट दिली, असे मुख्याध्यापक सुर्यकांत माने यांनी सांगितले.शाळेतील मुले हुशार आहेत. घरची परिस्थती गरीब असल्याने तसेच शाळेतही फारश्या सुविधा नसल्याने त्यांच्या विकासात अडथळे येत होते. हे पाहून वाईट वाटले. या मुलांना इंग्रजीची तोंड ओळख करुन द्यावी याउद्देशाने लंडनमधील मार्टीन स्कूलशी संलग्नता मिळवून दिली. तसेच ज्युली टेलर व मिस शॉना या शिक्षकांनाही मुलांना शिकवण्यासाठी आणल्याचे  जेन यांनी सांगितले.मुलांना बसण्यास बेंच नव्हते प्रिस्टिन वुमेन्स हॉस्पीटलने रोटरी क्लब आॅफ टेक्सटार्सल सिटी इचलकरंजीच्या मदतीने ५५ बेंच शाळेस भेट देण्यात आली, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.आत्तापर्यंत जेन दाम्पत्यांनी तीन हजार पौंडाच्या आसपास रक्कम शाळेच्या विकासासाठी खर्ची घातली आहे. शैक्षणिक गगुणवत्तेबरोबरच भौतिक सुधारणा जास्तीत जास्त कशा उपलब्ध करता येतील याकडे जेन दांम्पत्यांसह, प्रिस्टन हॉस्पीटलच्या डॉ. कुलकर्णी, डॉ. अजित पाटील, कॉनव्हे दांम्पत्यांसह शिक्षकांची धडपड सुरु असते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*🎋अनुदान वाढल्यास शाळांचा दर्जा सुधारेल*

मोहन सरवळकर

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

महापालिका शाळांचा दर्जा वाढविण्याची केवळ चर्चाच होते; मात्र महापालिका अंदाजपत्रकातील तरतूद पाहता "बडा घर पोकळ वासा' अशी अवस्था आहे. प्रत्येक वर्षी 30 ते 35 कोटी रुपयांची मागणी होते. प्रत्यक्षात एक कोटीची कशीबशी तरतूद होते आणि हाती पडतात दहा ते पंधरा लाख. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेसा निधी आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी हवी तशी मानसिकता.
- मोहन सरवळकर, निवृत्त लेखापाल, मनपा शिक्षण मंडळ

महापालिका शाळांचा दर्जा वाढविण्याची केवळ चर्चाच होते; मात्र महापालिका अंदाजपत्रकातील तरतूद पाहता "बडा घर पोकळ वासा' अशी अवस्था आहे. प्रत्येक वर्षी 30 ते 35 कोटी रुपयांची मागणी होते. प्रत्यक्षात एक कोटीची कशीबशी तरतूद होते आणि हाती पडतात दहा ते पंधरा लाख. महापालिका शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी पुरेसा निधी आणि शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी हवी तशी मानसिकता.
- मोहन सरवळकर, निवृत्त लेखापाल, मनपा शिक्षण मंडळ

महापालिका शिक्षण मंडळाच्या (सध्या समिती) शाळा या सामान्यातील सामान्य कुटुंबातील मुलांच्या श्‍वास आहेत. एके काळी याच शाळांनी सुवर्णकाळ अनुभवला. काळाच्या ओघात लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे झालेल्या दुर्लक्षामुळे ठराविक शाळा वगळता अन्य शाळांतील विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी झाली. शहरात 59 शाळा आहेत. 391 शिक्षक, 142 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शासन फंडातील 355 शिक्षक, व 136 शिक्षकेतर कर्मचारी आहेत. वेतन व भत्त्यापोटी शासन निधी आणि महापालिका निधीतून प्रत्येकी पन्नास टक्के खर्च केला जातो. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च महापालिका निधीतून केला जातो. वर्षाला 25 ते 27 कोटी रुपये खर्च वेतनापोटी होतो. शिक्षण मंडळाने वेतन व सेवानिवृत्ती वेतनासाठी 30 ते 35 कोटींची मागणी केली. त्यातील एक कोटीचीही तरतूद न करता 20 ते 25 लाखच निधी शिक्षण समितीस दिला जातो. प्रत्यक्ष हाती मात्र 15 लाखच पडतात.
बहुतांश शाळांत गेली 30 ते 35 वर्षे जुने नादुरुस्त साहित्य पडून आहे. एक ते दोन खोल्या भरून साहित्य वाहत आहे. या साहित्याचा तातडीने लिलाव होणे आवश्‍यक आहे. बंद खोल्या शालेय उपक्रमासाठी वापरात येऊ शकतील. लिलावातून येणाऱ्या पैशांमधून नवे फर्निचर खरेदी करता येईल. गेल्या 25 वर्षांपासून शाळांना नवे फर्निचर, शैक्षणिक तक्ते, विज्ञान, साहित्य दिलेले नाही. सर्व शिक्षा अभियानातून दिलेले संगणक बंद अवस्थेत आहेत. शिक्षकांना प्रत्येक वर्षी संगणक प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. वेळोवेळी प्रशिक्षण दिले जात नाही. संगणकाची चर्चा होते; मात्र अपवाद वगळता विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण दिले जात नाही. ई-लर्निंगची व्यवस्था आठ ते नऊ शाळांत आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्हा नियोजन मंडळाकडून 32 लाखांचा निधी यासाठी मिळाला होता. पण निविदा आपल्याचा मर्जीतील लोकांना मिळावी यासाठीची चढाओढ आणि अधिकाऱ्यांचा निरुत्साह यामुळे निधी परत गेला. निम्म्या शाळांत ई-लर्निंगची व्यवस्था असती तर गोरगरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला असता. शैक्षणिक तक्ते, विज्ञान साहित्य, उपकरणांची खरेदी यासाठी गेल्या 25 वर्षांत एक रुपयाही अनुदान दिलेले नाही. ही बाब गंभीर आहे. सामान्य मुलांसाठी या शाळा आधारवड असताना महापालिका अपेक्षेप्रमाणे निधीची तरतूद करत नाही. शिक्षक संघटनाही म्हणाव्या तशा प्रयत्नशील नाहीत. क्रीडा सुविधेचे तीन तेरा वाजले आहेत. 30 ते 35 वर्षांत सेवा पुरविल्या गेल्या नाहीत. त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत महापालिका शाळांतील विद्यार्थी चमकू शकले नाहीत. 59 पैकी 45 शाळांची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे आहे. 25 वर्षांत रंगरंगोटी आणि दुरुस्ती

अशी असावी वेतनेतर तरतूद (आकडे रुपयांमध्ये)
कार्यालय इमारत भाडे व कर 5 लाख
कार्यालय फर्निचर साहित्य 5 लाख
कार्यालय सादिलवार 25 हजार
डुप्लीकेटिंग साहित्य 25 हजार
कार्यालयीन छपाई 25 हजार
संगणक देखभाल दुरुस्ती 50 हजार
शाळा इमारत भाडे व कर 15 लाख
शिपाई, गणवेश खर्च 3 लाख
शालेय सराव परीक्षा 50 हजार
विज्ञान, शैक्षणिक साहित्य 2, लाख 50 हजार
मुलांना मोफत दप्तरे 5 लाख
संगणक देखभाल दुरुस्ती 10 लाख
शिष्यवृत्ती रोख बक्षीस 1 लाख
क्रीडा, सांस्कृतिक 1 लाख 50 हजार
शारीरिक प्रशिक्षण शिबिर 1 लाख 50 हजार
विज्ञान प्रदर्शन 1 लाख
आदर्श शाळा 15 हजार
सेमी इंग्रजी वर्ग 1 लाख 50 हजार
दृक श्राव्य शिक्षण 3 लाख 50 हजार

महापालिकेच्या शाळांचा दर्जा खूप चांगला आहे; मात्र महापालिकेकडून अंदाजपत्रकामध्ये अपेक्षेप्रमाणे तरतूद केली जात नाही. त्याचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होतो. चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्यास मुले महापालिकेच्या शाळांकडे आकर्षित होतील.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

*📋 शिष्यवृत्तीसाठी बहुसंच प्रश्नपत्रिका*

First Published :18-February-2017

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ फेब्रुवारी रोजी घेतल्या जाणाऱ्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेस राज्यातील ९ लाख ४८ हजार २३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला असून, विद्यार्थ्यांना प्रथमच बहुसंच प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना एकूण प्रश्नांपैकी २० टक्के प्रश्नांची दोन उत्तरे द्यावी लागणार आहेत.शिष्यवृत्ती परीक्षेस विद्यार्थ्यांना प्रथमच ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (पाचवी) उत्तराच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल. परंतु, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (आठवी) प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. दोन्ही पर्याय नोंदवणे बंधनकारक असून, दोन्ही अचूक पर्याय न नोंदवल्यास शून्य गुण दिले जातील. कोणत्या प्रश्नांची दोन उत्तरे द्यावीत याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्ट सूचना प्रश्नपत्रिकेत दिल्या जाणार आहेत. प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून, तेथून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांनी काढून घ्यायची आहे, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

(प्रतिनिधी)

*पद्धतीत बदल*

    राज्याच्या शिक्षण विभागातर्फे यंदा चौथीऐवजी पाचवीच्या विद्यार्थ्यांची आणि सातवीऐवजी आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता पाचवीच्या एकूण ५ लाख ४५ हजार ३५९ तर आठवीच्या ४ लाख २ हजार ८७७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी केलेले बदल लक्षात घ्यावेत, असे आवाहन परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃