twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣3⃣7⃣

*⛳ मॉरिशसमध्ये घुमणार कोल्हापूरची शाहिरी. ⛳*

by Parashuram Patil

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  कोल्हापूरचे शिवशाहीर पुरुषोत्तम ऊर्फ राजू राऊत यांच्या शिवशाहिरीचा कार्यक्रम 19 रोजी शिवजयंतीला मॉरिशसमध्ये होत आहे. या निमित्त कोल्हापूरची शाहिरी परंपरा प्रथमच सातासमुद्रापलीकडे पोहचत आहे. कोल्हापूरचा डफ या माध्यमातून जगभर कडाडणार आहे. मॉरिशसचे सांस्कृतिक मंत्री योगीता स्वामीनंदन आणि मॉरिशस राजधानी शहराचे महापौर आकाराम सोनु या मूळ मराठी माणसांच्या प्रमुख उपस्थितीत शाहिरीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

  राऊत यांचे इंटरनेटवरील पोवाडय़ाचे सादरीकरण पाहून मॉरीशसमधील मराठी साहित्य फौंडेशन तर्फे त्यांना गेली पाच ते सहा वर्षे आमंत्रित केले जात आहे. फक्त विमान खर्च तुम्ही करा येथील सर्व खर्च आम्ही करतो, असा प्रस्ताव मराठी साहित्य फौंडेशनच्यावतीने राऊत यांच्यासमोर ठेवला आहे. पण पाच जणांचा विमान प्रवास, पासपोर्ट, वेशभूषा, संगीतसाधने, आदींचा खर्च चार ते पाच लाखांच्या घरात असल्यामुळे ते मॉरिशसला जाऊ शकत नव्हते. याबाबतची माहिती कोल्हापुरातील उद्योगपती व्ही. बी. पाटील यांना कळताच राजर्षी शाहू छत्रपती प्रतिष्ठान आणि राजर्षी शाहू फुटबॉल फौंडेशनच्या माध्यमातून या शाहिरी पथकाला  काहीशी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे राऊत यांचे शाहीरी पथक लवकरच मॉरीशसला रवाना होणार असून, तिथे ते महाराष्ट्र धर्माचा जागर करणार आहेत.

  मॉरिशससारख्या देशात आमंत्रित केलेले हे देशातील पहिलेच शाहिरी पथक आहे. डफ, ढोलकी, तुणतुणे, झांज, दिमडी अशा एकूण पाच लोकांचा या पथकामध्ये समावेश आहे. शाहिर राजु राऊत यांना भार्गव कांबळे ढोलकीची साथ देणार आहेत. हार्मोनिअमसाठी शाहिर अजित आयरेकर, महेश पाटील हे तर आर्दश शिक्षक राष्ट्रपती विजेते शामराव खडके सूरसाथ करणार आहेत. राऊत हे गेल्या 20 वर्षाहून अधिककाळ शाहिरीत कार्यरत आहेत. पोवाडे, शाहिरी गीते, छक्कड, लावणी, अभंग, ओव्या, लेख, कथा लिखाणाचा जवळपास 2 हजार पानांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. तसेच कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आपल्या शाहिरीतून आवाज उठविला आहे. रंकाळा प्रदूषण, रस्ते, खंडपीठ, चित्रनगरी अशा अनेक प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलनेही केली आहेत. त्याचबरोबर करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाचे ते 1995 सालापासून विना जाहिरात, विना मोबदला थेट प्रक्षेपण करत आले आहेत.

*मदतीचे आवाहन*

या कलावंतांचा मॉरिशसमधील खर्च तेथील शासन करणार आहे; परंतु विमानप्रवास, पासपोर्ट, वेशभूषा, संगीतसाधने, आदींसाठी सुमारे चार लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. कोल्हापूरचा शाहीर परदेशात ही कला घेऊन जात असल्याने त्याच्या मदतीसाठी उद्योजक व्ही. बी. पाटील यांनी स्वत:हूनच पुढाकार घेतला आहे. त्यांनी राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठान व राजर्षी शाहू फुटबॉल फौंडेशनतर्फे काही रक्कम उत्स्फूर्तपणे दिली आहे. असेच मदतीचे आवाहन त्यांनी व्यक्ती व संस्थांना केले आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

  - http://guruvarykm.blogspot.in/

   या आपल्या Blog ला भेट द्या.....