✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
*आरोग्य-MANTRA*
*भाग* -2⃣6⃣6⃣
* ऊन वाढतंय... म्हणून......*
थंडीला निरोप देता देता वातावरण काहीसं उन्हाळा-हिवाळा झालं आणि सध्या अचानक उन्हाचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. दुपारी घराबाहेर पडताना अनेकांना सूर्यमहोदयांचं तापणं त्रासदायक ठरत असल्याचं चित्र आहे. कोही छोट्या गोष्टींची काळजी घेतलीत; तर हा कडाका काही प्रमाणात का होईना सुसह्य होईल. ऊन वाढतंय; म्हणून या गोष्टींचा वापर घराबाहेर पडताना आवर्जून करा.
* उन्हासाठीचे गॉगल*
मित्रांनो, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास बाहेर पडणार असाल, तर खास उन्हात ड्राइव्ह करताना सुसह्य ठरेल, असा गॉगल तुमच्याकडे हवाच. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे गाडी
चालवताना समोरून कितीही प्रखर ऊन तुमच्या चेहऱ्यावर पडलं, तरी त्याचा त्रास होत नाही. कडक उन्हात दिसणारं मृगजळही हा गॉगल डोळ्यांवर असला तर दिसत नाही.
चालवताना समोरून कितीही प्रखर ऊन तुमच्या चेहऱ्यावर पडलं, तरी त्याचा त्रास होत नाही. कडक उन्हात दिसणारं मृगजळही हा गॉगल डोळ्यांवर असला तर दिसत नाही.
*☄हातमोजे....*
शरीराच्या ज्या भागाचा सातत्यानं उन्हाशी संपर्क येतो, ते भाग काळवंडतात. अनेकदा प्रखर उन्हानं त्वचा जळते आणि तिचा वरचा थर सालींप्रमाणे निघतो. गाडी चालवताना हाताचे पंजे कायमच उघडे राहतात. त्यासाठीच बोटंही व्यवस्थित झाकली जातील, असे स्टायलिश हँडग्लव्हज दाखल झाले आहेत. त्यांचा वापर करणंही फायद्याचं ठरेल.
*श्रीजल, ग्लुकोज. ...*
ऐन उन्हातही शरीराचं वातावरण थंड ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि रसदार फळं खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. बाहेर कुठं जाणार असाल, तर इतर कशापेक्षा नारळपाणी घेणं उत्तम. नीराही थकवा घालवेल. दुर्गम जागी जाणार असाल, तर श्रीजल पावडरचं पॅकेट, ग्लुकोज किंवा ग्लुकोजयुक्त बिस्किटं जवळ बाळगा. भरपूर पाणी पिण्यासह या गोष्टींनी मळमळणं, डोकं दुखणं या गोष्टी टाळता येतील.
*☄स्कार्फ....*
एरवी मुलांच्या गळ्यातला हट के स्कार्फ स्टाइल स्टेटमेंट म्हणून पाहिला जातो. मात्र, त्याचा खरा उपयोग या दिवसांमध्ये होईल. चेहऱ्याभोवती स्कार्फ व्यवस्थित गुंडाळून मान आणि गळाही झाकता येतो. अनेकजण कॅप आणि स्कार्फ यांचं छान कॉम्बिनेशन करतात, तेव्हा स्कार्फ जवळ ठेवाच.
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....
http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या .