twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

*🌘११ फेब्रुवारीला चंद्रग्रहण आणि धूमकेतूचं एकत्र दर्शन!🌠*

_*दुर्मिळ घटनेचे साक्षीदार व्हा!   🌌*_

साभार - Online  लोकसत्ता टीम

February 10, 2017 6:56 PM

*🔭खगोलप्रेमींना पर्वणी*🔭

मोबाईल टॅबलेटमधून १८० अंशात डोकं वळवायचा छंद आहे का? तर ११ फेब्रुवारीला या सगळ्यांना पर्वणी आहे. कारण या दिवशी चंद्रग्रहण आणि धूमकेतू अशा दोन्ही खगोलीय घटना होणार आहेत.
सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येत हे तिघंही एका सरळ रेषेत आले की चंद्रावर पडणारा सूर्यप्रकाश अडवला जाऊन पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. यामुळे चंद्रग्रहण होतं. ११ फेब्रुवारीला होणारं चंद्रग्रहण खग्रास नसणार आहे. पृथ्वीची गडद छाया यावेळी चंद्रावर पडणार नसल्याने  ग्रहणादरम्यान चंद्रांचं तेज काहीसं कमी होणार आहे पण चंद्र पूर्णपणे काळा झालेला दिसणार नाही. खग्रास चंद्रग्रहणातही ते होत नाही.
पण यावेळच्या या ग्रहणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे चंद्रग्रहण होत असतानाच आकाशात धूमकेतूचंही दर्शन होणार आहे. ४५- पी हा धूमकेतू हे चंद्रग्रहण होताना आकाशामध्ये दिसणार आहे. हा धूमकेतू दर सव्वापाच वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. पण चंद्रग्रहण होत असताना हा धूमकेतू आकाशात दिसणं ही एक दुर्मिळ घटना आहे. मुंबईत  ११ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजता या ग्रहणाला सुरूवात होईल आणि सव्वासहा वाजेपर्यंत या ग्रहणात चंद्र सगळ्यात जास्त प्रमाणात झाकोळला जाईल. आणि याच वेळेस आकाशामध्ये धूमकेतू दिसण्याची शक्यता आहे.
वाचा- ट्रम्प कोर्टात हरल्यावर आता कोर्टाला कोर्टात खेचणार!
त्याचप्रमाणे युरोपमध्ये ११ फेब्रुवारीच्या पौर्णिमेला ‘स्नो मून’ सुध्दा असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात युरोपमध्ये बर्फाचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे यावेळी होणाऱ्या पौर्णिमेला स्नो मून असं म्हटलं जातं. त्यामुळे युरोपात स्नो मून, चंद्रग्रहण, आणि धूमकेतूचं दर्शन होणार आहे.
यादिवशी होणारं चंद्रग्रहण युरोप, आशिया , आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेत दिसणार आहे...

*दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....*

http://guruvarykm.blogspot.in/     

*या blog ला भेट द्या..*