🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣1⃣9⃣
*हनुमानउडी*
*उडी* - लांब आणि उंच उडी...एक वैयक्तिक स्पर्धाच...
पण,याचा आपल्या जीवनाशी संबंध जोडला तर...
*लांब उडीचच बघा ना...*
लांबून पळत पळत यायचं आणि उडी घ्यायची......
जो जेवढया लांबून पळत येतो तेवढयाच लांब त्याची उडी जाते....अर्थात जो जादा कष्ट करतो,जो जादा संघर्ष करत,त्याला यश देखील जादाच मिळतं...
अशाचप्रकारे परिस्थितीशी झगडून *हनुमानउडी* मारणाऱ्या,
ज्या मातीने जगाला कबड्डी हा खेळ दिला,याच खेळाशी संबंधित एका मराठमोळ्या तरुण खेळाडूची ही संघर्षमय कथा....
*_ही कथा आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका मागासवर्गीय कुटुंबातील एका मेहनती तरुणाची..._*
18 डिसेंबर 1992 रोजी एका अल्पभूधारक आणि गरीब,तालमीशी संबंधित कुटुंबात या तरुणाचा जन्म झाला.
कुस्तीची आवड नसल्याने,वयाच्या 13 व्या वर्षी कबड्डी खेळायला सुरुवात केली.
आपल्या 6 फूट उंचीचा पुरेपूर वापर करून त्याने कबड्डीत अल्पावधीतच आपला दबदबा निर्माण केला.
2013 साल उजाडलं ते दुःखाचा डोंगर घेऊनच...याच वर्षी या तरुणाने आपल्या जन्मदात्याला गमावलं... *वय वर्षे 21* कब्बडीत करियर घडवायचंय तो पर्यंतच घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडली.
हातात खुरपे घेऊन हा तरुण आता दुसरीच्या शेतावर कामाला जाऊ लागला... यावेळी या तरुणाच्या काकांनी त्याला मुंबईत जाऊन कबड्डीचा सराव करण्याचा सल्ला दिला.शिवाय प्रोत्साहन ही दिले..आणि हाच या तरुणाच्या जीवनातील खरा *टर्निंग पॉईंट* ठरला.
तो तरुण मुंबईला आला.मन लावून मेहनत करू लागला...
राष्ट्रीय पातळीवर निवड होण्यासाठी हा तरुण जीव लावून मेहनत करू लागला.पण,एक आक्रीत घडलं. *SAI (स्पोर्ट्स ऑफिरिटी ऑफ़ इंडिया)* ने या तरुणाला आणखी मेहनत कर असे सांगून त्याची निवड केली नाही.
हा तरुण या पराभवाने खचला नाही.मोठया जोमाने आणखी तयारी केली.प्रयत्नांची पराकाष्ठा केली.दुसऱ्या वेळी तो यशस्वी झाला.
महिंद्रासाठी खेळताना एका सामन्यात या तरुणाने *हनुमान उडी* मारून 7 पैकी 6 खेळाडू बाद करूनवेगळा इतिहास निर्माण केला.ही हनुमान उडी त्या तरुणाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन गेली ते खाली न येण्यासाठीच....
2014 साली *प्रो-कबड्डी* स्पर्धेत या तरुणाला *दबंग दिल्ली* ने आपल्या संघात सामील करून घेतले. तो तरुण स्टार रायडर म्हणजेच.... *काशीलिंग आडके उर्फ काशी.*
हा काशी PKL चा एकमेव असा खेळाडू आहे,ज्याने दोन्ही सिजन मध्ये 100 पेक्षा अधिक पॉईंट मिळविले आहेत....
*मित्रांनो काशी चा प्रवास खरंच प्रेरणादायी असा आहे.जर त्याने काकांच ऐकून मुंबईला जाण्याची हनुमानउडी मारली नसती तर......आज काशीलिंग आडके हे नाव आपल्या ओठी असते का???परिस्थिती समोर न झुकता,अपयशाला न जुमानता प्रयत्नांची पराकाष्ठा केली.*
म्हणूनच, मला काशी एक *यशवंत* वाटतो.
आपल्यापैकी बरेच जण वेळेवर हनुमानउडी मारायला घाबरतात आणि वेळ निघून गेल्यावर मात्र रडत बसतात....आयुष्यात संधी पुन्हा पुन्हा येत नाही.तेंव्हा वेळेवर हनुमानउडी माराच.
आता इथेच थांबतो.उद्या भेटू संकटावर हनुमानउडी मारून यशस्वी होणाऱ्या आणखी एका *यशवंता* सोबत.
तोपर्यंत नमस्कार..
*✒लेखन:-श्री संदीप पाटील सर,*
*मु.पो.दुधगाव.ता.मिरज,जि.सांगली.*
*9096320023*
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_