twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄

*🖥♻ गुरुवर्य टिप्स् ♻🖥*

*💳📲Online Transaction करताना घ्यावयाची दक्षता*

*💳 ATM मशीन मधून पैसे काढताना..*

1. आपल्या ATM चा पिन नंबर टाईप करताना एक हात वर आडवा धरावा व नंबर टाईप करावेत ज्यामुळे आपल्या पाठीमागे रांगेत असणाऱ्या व्यक्तीस तसेच आपला ATM पिन नंबर दिसणार नाही किंवा तेथे मायक्रोकॅमेरा लपवलेला असेल तर तो मायक्रोकॅमेराही आपला पिन ओळखू शकणार नाही.

2. ATM मधून पैसे काढल्यानंतर मिळणारी स्लिप फक्त चुरगाळून न टाकता लहान लहान तुकडे करुन फाडून टाकावी...

   (जर स्लिप फक्त चुरगाळू टाकली तर खाते नंबरचे शेवटचे 4 अंक तसेच शेवटचा व्यवहार एवढी माहिती हॅकर्सला पुरेशी ठरु शकते.)

*💳  credit card debit card यांचा वापर करताना...*

1. आपला OTP कोणालाही शेअर करु नका.

2. कोणतेही  shopping करताना कार्ड सेल्समनला न देता स्वत: मशीनचा वापर करा,ज्यामुळे ते कार्ड नंबर आणि CVV पाहू शकणार नाहीत...

3.शक्य असेल तर... कार्डवरील CVV पाठ करावा आणि कार्डवरील CVV पर्मनंट मार्करने खोडावा.

*🖥 Online banking करताना*

1.बँकेची अधिकृत वेबसाईट open करावी ...

2. आपला पासवर्ड टाईप करण्यासाठी Virtual keyboard चा वापर करावा.

3.आपला OTP कोणासही शेअर करु नका..

4. आपला व्यवहार झालेनंतर  logout करण्यास विसरु नका.

*📱mobile wallet चा वापर करताना*

1.आपला पासवर्ड कोणाला शेअर करु नका.

2.नेहमी App Lock वापरा.

3.App वर आपल्या कार्डची माहिती Save करु नका..

   Online Transaction करताना वरील प्रमाणे दक्षता घेतल्यास आपले Online Transaction सुरक्षित होवून आपण फसवणूकीपासून वाचू शकाल....

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_