🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣7⃣0⃣
*👨🏻✈सॅल्यूट! रुग्णवाहिकेसाठी वाहतूक पोलिसाने अडवला राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा*
*वाहतूक पोलिसाच्या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक*
साभार ~ ऑनलाइन लोकसत्ता
बंगळुरुचे वाहूतक पोलीस उपनिरीक्षक एम. एल. निजलिंगाप्पा
बंगळुरुमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने माणसुकीचे दर्शन घडवत रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करुन दिला. विशेष म्हणजे यासाठी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या गाड्यांचा ताफा अडवला. वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या या कृतीचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. कर्तव्य बजावत असताना माणुसकी जपणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे.
वाहूतक पोलिसात उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले एम. एल. निजलिंगाप्पा शनिवारी बंगळुरुतील ट्रिनिटी सर्कलवर कर्तव्य बजावत होते. यावेळी ट्रिनिटी सर्कल परिसरातून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या वाहनांचा ताफा जाणार होता. मेट्रो ग्रीनच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी बंगळुरुत आले होते. यावेळी निजलिंगाप्पा यांना राष्ट्रपतींच्या वाहनांचा ताफा येत असल्याची माहिती मिळाली. राष्ट्रपतींचा ताफा त्यावेळी राज भवनाकडे जात होता. मात्र तेवढ्यात निजलिंगाप्पा यांना एक रुग्णवाहिका गर्दीतून वाट काढण्याचा प्रयत्न करताना दिसली. यानंतर निजलिंगाप्पा यांनी रुग्णवाहिकेला गर्दीतून जागा करुन दिली. त्यामुळे रुग्णवाहिका लवकर जवळच्या एका खासगी रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातील रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी निजलिंगाप्पा यांनी राष्ट्रपतींचा ताफा काही वेळासाठी थांबवला. एका रुग्णाचा जीव वाचावा, म्हणून देशाच्या पहिल्या नागरिकाचा वाहनाचा ताफा अडवण्याचे धैर्य निजलिंगाप्पा यांनी दाखवले.
वाहूतक पोलिसात उपनिरीक्षक असलेल्या एम. एल. निजलिंगाप्पा यांच्या या कृत्याची माहिती सोशल मीडियामुळे अवघ्या काही वेळातच लाखो लोकांपर्यंत पोहोचली. बंगळुरुच्या पूर्व वाहतूक विभागाचे उपायुक्त अभय गोयल यांनी ट्विटरवरुन निजलिंगाप्पा यांच्या कामाचे तोंड भरुन कौतुक केले. देशातील सर्वोच्च व्यक्तीपेक्षाही देशातील सामान्य व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे एका व्यक्तीचा प्राण वाचवणे हे सर्वोच्च कर्तव्य असते, हे निजलिंगाप्पा यांनी स्वत:च्या कृतीतून दाखवून दिले. त्यामुळेच सोशल मीडियावरुन निजलिंगाप्पा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. ‘अशा प्रकारचे पाऊल उचलणाऱ्या पोलिसाचा सन्मान व्हायला हवा,’ असे पोलीस आयुक्त प्रवीण सूद यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटले आहे. यानंतर सर्वच स्तरांमधून निजलिंगाप्पा यांचे कौतुक करण्यात येते आहे.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_