🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
🍍🍅 *आरोग्य-MANTRA* 🍋🍉
*भाग -* 2⃣8⃣3⃣
*जांभूळ खा आणि तंदुरुस्त राहा*
*जाणून घ्या जांभळाचे दहा फायदे*
साभार~लोकसत्ता ऑनलाइन
June 29, 2017
१. जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचं रूपांतर ऊर्जेमध्ये होतं.
२. जांभळाच्या फळासोबतच जांभळाच्या बियांची पावडर, जांभळाच्या झाडाची साले, जांभळाचा रस याचाही मधुमेहाच्या उपचारात चांगला उपयोग होतो.
३. जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यासारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.
४. जांभूळ नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ खाल्ल्यानेही रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.
५. जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
६. जांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.
७. जांभूळ खाल्ल्यानं दात आणि हिरड्या मजबूत होतात. तसेच दात आणि हिरड्यात संसर्ग होत नाही.
८. जांभळाच्या बियांची पावडर गायीच्या दूधात मिक्स करून हा लेप चेहेऱ्याला लावल्यास चेहेऱ्यावरच्या मुरूम, पुटकुळ्या निघून जातात.
९. ज्यांना भूक लागण्याची समस्या आहे त्यांनी जांभळाचं व्हिनेगर/ सिरप दिवसातून दोन ते तीन वेळेस पाण्यासोबत समप्रमाणात घेतल्यास भूक वाढते .
१०. जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अॅनेमिया यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती वाढते.
🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_