twitter
rss



*🎯शिष्यवृत्तीचा अंतरिम निकाल जाहीर*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/scholarship-result/articleshow/58723262.cms

*🎯 वैद्यकिय शिक्षण सलाइनवर*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/nagpur-vacant-posts-creating-problems-for-medcial-students/articleshow/58722952.cms



🏻‍🏫 गुरुजी जिंकले; बदल्यांना स्थगिती*

By pudhari | Publish Date: May 17 2017

कोल्हापूर : प्रतिनिधी
बरीच वर्षे मोक्याच्या ठिकाणावर राहणार्‍या शिक्षकांना सुगम-दुर्गमचा निकष काढून दणका देण्याची तयारी प्रशासनाने केली; पण थेट न्यायालयातूनच बदलीच्या निकषांनाच स्थगिती आणण्यात गुरुजी यशस्वी झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने 16 जूनपर्यंत स्थगिती दिल्याने सध्या सुरू असलेली जिल्ह्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.
यावर्षीपासून सुरू झालेल्या या बदली प्रक्रियेतील सुगम-दुर्गम या निकषावर आक्षेप घेत राज्यभरातील शिक्षक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेनेही या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी त्याची न्या. गडकरी व न्या. बदंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्ते शिक्षकांच्या बाजूने अ‍ॅड. तानाजी म्हातुगडे, तर सरकारतर्फे अ‍ॅड. विकास माळी यांनी न्यायालयात बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर 16 जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती देत असल्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले.
यावर्षी केवळ शिक्षकांच्या बदल्यांसाठी वेगळे धोरण आणि अध्यादेश काढून प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुगम-दुर्गम शाळा निश्‍चित करून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राज्यात एकाच वेळी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने सर्व्हर डाऊनची समस्याही उद्भवली.  यातूनही मार्ग काढत तालुकास्तरीय याद्या तयार झाल्या आहेत. 20 मे ते 31 मेअखेर ही बदली प्रक्रिया पूर्ण करावयाची होती. सुगम-दुर्गमच्या निकषाने 10 वर्षे सुगम अर्थात दळणवळणाच्या उत्तम सोयीसुविधा असलेल्या ठिकाणी राहणार्‍या शिक्षकांना दुर्गम भागात जावे लागणार होते. जिल्हा परिषदेने तशी यादीही तयार केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 2,002 शाळांपैकी 1,356 सुगम, तर 646 शाळा या दुर्गम क्षेत्रात मोडणार्‍या आहेत. दुर्गम भागात जायला लागणार म्हणून सुरुवातीपासूनच शिक्षकांमध्ये अस्वस्थता होती. त्यांनी बदली प्रक्रियेला न्यायालयातूनच स्थगिती आणत शिक्षण विभागावर हबकी डाव खेळला आहे. यात त्यांना यशही मिळाले आहे. त्यामुळे यावर्षी शिक्षकांच्या बदल्या न होण्यावर आता जवळपास शिक्कामोर्तबच होण्याची शक्यता आहे.


🎯प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या अडचणीत*

सकाळ वृत्तसेवा
03.48 AM

सातारा - ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत नव्याने अध्यादेश काढल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्याविरोधात सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने त्यावर न्यायालयाने 30 जूनपर्यंत "जैसे थे'चे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया अडचणीत आली आहे.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन करण्याबरोबर प्रथम सर्वसाधारण व अवघड क्षेत्रातील शाळांची निश्‍चिती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. ग्रामविकास विभागाच्या शिक्षक बदली अध्यादेशात अनेक संदिग्धता असल्याचे शिक्षक संघटना, शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या बदली अध्यादेशातील संदिग्धता, त्रुटी दूर कराव्यात, यासाठी सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र ढमाळ यांच्यासह 496 शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायमूर्ती शंतनू केमकर, न्यायमूर्ती बी. पी. कोलाबावल्ला यांनी 30 जूनची पुढील सुनावणी होईपर्यंत संबंधित शिक्षकांना पदे न देता "जैसे थे' स्थिती ठेवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत, असे श्री. धुमाळ यांनी सांगितले.

या निर्णयामुळे जिल्हा परिषद प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. न्यायालयाचा निर्णय असल्याने संबंधित खंडाळा, खटाव येथील 496 शिक्षकांना वगळून बदली प्रक्रिया राबवायची, की संपूर्ण बदली प्रक्रिया पुढे ढकलायची, याबाबत अडचण निर्माण झाली आहे. या शिक्षकांना वगळून ऑनलाइन बदली प्रक्रिया राबविणे शक्‍य होणार नाही. तसे केल्यास इतर शिक्षकही न्यायालयात जाण्याची दाट शक्‍यता आहे. 31 मेपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासन निर्णय आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन मागविण्याच्या सूचना अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांना दिल्या आहेत.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

♻ प्राथ. शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती*

लोकमत न्यूज नेटवर्क( दि.१८)

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. १५ जूनपासून शाळा सुरू होणार असून १६ जूनपर्यंत बदल्यांना स्थगिती दिल्याने आता शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता मावळली आहे.

यंदा शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने नवा आदेश काढला होता. त्यानुसार 'सुगम आणि दुर्गम गावे' आणि त्यानुसार बदली असे धोरण ठेवले होते. ज्यांनी दहा वर्षे 'सुगम' गावांमध्ये काम केले आहे त्यांना सक्तीने 'दुर्गम' गावांमध्ये जाणे बंधनकारक होते. याबाबत तालुका पातळीवरील प्रक्रिया पूर्ण होऊन २० मेपासून जिल्हा पातळीवरील बदली प्रक्रिया सुरू होणार होती

जिल्ह्णात २००२ शाळा असून त्यातील १३५६ गावे ही 'सुगम'मध्ये तर ६४६

गावे 'दुर्गम'मध्ये टाकण्यात आली होती.

दरम्यान, शासनाच्या या 'सुगम', 'दुर्गम' निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय संघटनेने मंगळवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बुधवारी याबाबत सुनावणी होऊन १६ जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली. संघटनेच्यावतीने अ‍ॅड. तानाजी मातुगडे यांनी तर सरकारी वकील म्हणून विकास माळी यांनी काम पाहिले. न्या. गडकरी व न्या. बदंग यांच्यासमोर ही सुनावणी झाली.

*दोन प्रकारच्या बदल्यांना स्थगिती*

एकीकडे जिल्हा परिषदेतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बदल्यांना औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली असताना दुसरीकडे जिल्ह्णातील प्राथमिक शिक्षकांच्याही बदल्यांना स्थगिती मिळाली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

🎋उच्च शिक्षण विभागात मंत्री विरुद्ध अधिकारी संघर्ष*

_*संचालक निलंबनाच्या घोषणेवरुन वाद*_

मधु कांबळे, मुंबई | Updated: May 18, 2017 1:40 AM

*संचालक निलंबनाच्या घोषणेवरुन वाद*

नोकरभरतीतील गैरव्यवहार प्रकरणाचा ठपका असलेलेले संचालाक धनराज माने यांच्या निलंबनाची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केल्यानंतरही त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. संचालकांचे निलंबन करण्याइतपत सबळ कारणे नाहीत, असा पवित्रा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे. तर, निलंबनाच्या निर्णयावर मंत्री ठाम आहेत. त्यामुळे सध्या उच्च शिक्षण विभागात मंत्री विरुद्ध अधिकारी असा संघर्ष सुरु झाला आहे.
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात २०११ ते २०१४ या कालावधीत प्रपाठक, अधिव्याख्याते व वर्ग तीनचे कर्मचारी अशा ५३ पदांच्या भरतीत घोटाळा झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी धनराज माने हे विद्यापीठात कुलसचिव होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती. समितीने या भरतीतील घोटाळाप्रकरणी माने यांच्यावर ठपका ठेवला होता, असे सांगितले जाते. त्यानंतर २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन धनराज माने यांची उच्च शिक्षण संचालकपदावर निवड झाली.

विशेष म्हणजे ५ एप्रिल २०१७ रोजी यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करुन त्यांची संचालक म्हणून कायम नियुक्ती करण्याचा उच्च शिक्षण विभागाने आदेश काढला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भरती घोटाळ्याच्या कथित आरोपावरुन त्यांना निलंबित करण्यात आल्याची घोषणा मंत्री तावडे यांनी विधानसभेत केली. माने यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करुन त्यांना सेवेत कायम करण्याच्या निर्णयावरुनच मंत्री विरुद्ध अधिकारी असा संघर्ष सुरु झाल्याचे विभागात चर्चा सुरु आहे. माने यांचे त्या विभागाच्या दोन सचिवांनी गोपनीय अहवाल लिहिले होते व मुख्य सचिवांनी ते कायम केले होते. त्यामुळे नियमानुसार त्यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याचा निर्णय घेणे बंधनकारक होते, असे सूत्राकडून सांगण्यात आले. धनराज माने यांचे एका राजकीय पक्षाशी संबंध असल्याने ते अडचणीत आल्याचीही विभागातील अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे.
या संघर्षांचे पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मराठवाडा विद्यापीठ भरती घोटाळ्याचा ठपका असल्याने माने यांना निलंबित करुन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा या खात्याचे मंत्री म्हणून विनोद तावडे यांनी केली. इतकेच नव्हे तर, भरती घोटाळा प्रकरणात माने यांच्यावर कारवाई करण्यास नकार देणाऱ्या किंवा त्यांना पाठीशी घालणाऱ्या सचिवांसह अन्य अधिकाऱ्यांची निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करण्याचे तावडे यांनी जाहीर केले. परंतु विधानसभेत मंत्र्याने घोषणा करुनही माने यांच्या निलंबनाचा अजून आदेश निघाला नाही. अद्याप ते त्या पदावर कार्यरत आहेत. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाडा विद्यापीठातील भरतीसाठी कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली अकरा अधिकाऱ्यांची समिती होती. त्यामुळे त्या कथित घोटाळ्याला एकटे माने कसे जबाबदार असा प्रश्न अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर चौकशी अहवाल संदिग्ध असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यावरुन निलंबन प्रकरण अंमलबजावणीविना अडवून ठेवले असल्याचे समजते. या संदर्भात उच्च शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयावर काही बोलण्यास नकार दिला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन, संचालकांच्या निलंबनाचे काय झाले असे विचारले असता, या संदर्भातील फाईल सध्या मुख्य सचिवांकडे आहे, असे त्यांनी सांगितले. निलंबनाची कारवाई करताना सामान्य प्रशासन विभागाचे मत घ्यावे लागते. त्या विभागाकडून फाईल आता मुख्य सचिवांकडे गेली आहे. आश्वासनपूर्तीसाठी दोन महिन्यांचा कालावधी असतो, त्या कालवधीत यावर कार्यवाही होईल, असे त्यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🐀डोंगर पोखरून काढला उंदीर!*

सकाळ वृत्तसेवा
02.48 AM

_*सोलापूर - प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशामध्ये किंचित बदल करत सुधारित धोरण गुरुवारी निश्‍चित केले. मात्र, हे सुधारित धोरण म्हणजे "डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे' असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिल्या आहे. या सुधारित धोरणाबाबत संघटना नाखूष आहेत.*_

सोलापूर - प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशामध्ये किंचित बदल करत सुधारित धोरण गुरुवारी निश्‍चित केले. मात्र, हे सुधारित धोरण म्हणजे "डोंगर पोखरून उंदीर काढल्यासारखे' असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षक संघटनांनी दिल्या आहे. या सुधारित धोरणाबाबत संघटना नाखूष आहेत.

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचा विषय 27 फेब्रुवारीला ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशापासून गाजत आहे. या नवीन धोरणाच्या विरोधात राज्यातील अनेक शिक्षक संघटनांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अनेक शिक्षक संघटनांनी ग्रामविकासमंत्री, ग्रामविकास सचिव यांच्याशी अनेक वेळा चर्चा करून त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ग्रामविकास विभागाने सुधारित धोरण जाहीर केले आहे. मात्र, त्या धोरणामुळे या बदली प्रक्रियेमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे स्पष्ट झाले.

याआधीच्या आदेशामध्ये एका शिक्षकाला बदलीसाठी 20 शाळांच्या पसंतीचा प्राधान्यक्रम दिला होता. नव्या धोरणानुसार शिक्षकांनी पसंतिक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास त्या शिक्षकाच्या नियुक्तीसाठी उपलब्ध शाळांच्या यादीपैकी पुन्हा एकदा प्राधान्यक्रम देण्याची संधी दिली जाणार आहे. ही संधी दिल्यानंतर काही शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमाची शाळा मिळाली नाही तर अंतिमतः त्यांची बदली उपलब्ध रिक्त जागांवर केली जाणार आहे. त्याचबरोबर मणक्‍याचे विकार असलेले कर्मचारी यातून वगळण्यात आले आहेत.

*इतर मागण्यांचा विचार नाही*

सरकारच्या या सुधारित धोरणामध्ये शिक्षक संघटनांनी केलेल्या एकाही मागणीचा समावेश झाला नाही. महिलांच्या बदलीसाठी वयाची अट 50 करणे, शिक्षकांच्या तालुक्‍याच्या बाहेर बदल्या न करणे, समानीकरण न करणे या प्रमुख मागण्यांचा विचारच ग्रामविकास विभागाने केला नाही. त्यामुळे शिक्षक संघटनेच्या नेत्यांनी केलेली धडपड वाया गेली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ वेतन*

*एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा*

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 19, 2017

रात्रशाळांतील शिक्षकांना दिलासा; एका तपानंतर प्रश्नांवर तोडगा
राज्यातील रात्रशाळांमधील शिक्षकांची एका तपाची प्रतीक्षा अखेर संपली असून आता या शाळांमधील अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ पगार मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आला आहे.
या निर्णयानुसार एकाच वेळी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये नोकरी करून रात्रशाळेतही घुसखोरी करणाऱ्या शिक्षकांना चाप लागणार आहे. यापुढे रात्रशाळांमध्ये काम करणारा शिक्षक हा पूर्णवेळ शिक्षक म्हणून गणला जाणार आहे. शाळाबाह्य़ मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा, तसेच या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी रात्रशाळेत या मुलांना सामावून घेण्यासाठी खास तरतूद करण्यात आली असून वयाच्या अकराव्या वर्षांपासून या शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असला तरी प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादेची कोणतीही अट मात्र लागू राहणार नाही याचीही खास तरतूद या निर्णयातून करण्यात आली आहे.
राज्यात आत्तापर्यंत रात्रशाळांना अनेक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले होते, मात्र या निर्णयामुळे या शाळा आता अर्धवेळ शाळा म्हणून गणल्या जातील.
प्रत्येक विद्यार्थ्यांची आणि शिक्षकाचीही बायोमेट्रिक हजेरी केली जाणार असून अनुदानित, सरकारी शाळांतील शिक्षकांना देण्यात येणारे सर्व प्रकारचे लाभ या शाळेतील शिक्षकांना मिळणार आहेत. यात वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, शालेय वेतन प्रणाली, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुकंपा तत्त्वाने भरती धोरणही लागू राहणार आहे.
विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळणार
रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना आता प्रयोगशाळेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तूर्तास आजूबाजूच्या शाळेतील प्रयोगशाळांचा वापर करता येईल, मात्र त्या-त्या शाळांमध्ये प्रयोगशाळांसाठी अनुदानही मंजूर केले जाणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋रात्रशाळा शिक्षकांना दिलासा*

Updated May 18, 2017

*कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणार; वैद्यकीय लाभ मिळणार*

म. टा. प्रतिनिधी, पुणे

राज्यातील रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना आता वैद्यकीय सुविधांसोबत सेवेतील इतर लाभही मिळणार आहेत.
राज्यात १७६ माध्यमिक रात्रशाळा, ५६ ज्युनियर कॉलेज आणि ८ सीनियर कॉलेज आहेत. त्यामध्ये मिळून ३३,५८० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळा-कॉलेजांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २,१००पेक्षा अधिक आहे. त्यापैकी एक हजार ३५८ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी दिवसा पूर्णवेळ आणि रात्री अर्धवेळ शाळा-कॉलेजांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची नोकरी दुबार होत होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर ३४.५० कोटींचा अतिरिक्त बोजा पडत होता.
मात्र, सरकारच्या या निर्णयाचा फायदा गेल्या अनेक वर्षांपासून रात्रशाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांना होईल. त्यांची संख्या सुमारे ६१० इतकी आहे. दुबार नोकरीमुळे होणारा खर्च टाळण्यासाठी शिक्षण विभागाने निर्णय घेऊन रात्रशाळा आणि ज्युनियर कॉलेजांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार आता शिक्षक-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियामवलीनुसार वैद्यकीय सुविधा आणि सेवेतील इतर लाभ मिळणार आहेत.
दरम्यान, आता शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतरत्र दुबार नोकरी करता येणार नाही. तसेच, रात्रशाळा आणि कॉलेजांना बायोमेट्रिक प्रणाली लावावी लागेल. या कर्मचाऱ्यांना सेवा मिळण्यासाठी प्रा. अविनाश ताकवले, निरंजन गिरी, सुनील सुसरे, दर्शना पांडव यांच्यासह शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले. या निर्णयाबद्दल राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष प्रा. ताकवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि विभागाचे सचिव नंदकुमार यांचे अभिनंदन केले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

🎯कॉपीबहाद्दरांसाठी विद्यापीठाची खास सूट*

By pudhari | Publish Date: May 18 2017 9:42PM

औरंगाबाद : प्रतिनिधी

परीक्षा आटोपल्यानंतर त्याच दिवशी उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रातून विद्यापीठाच्या स्ट्राँगरूममध्ये जमा होणे अत्यावश्यक असते, परंतु विद्यापीठाकडूनच या परीक्षा केंद्रांना उत्तरपत्रिका जमा करण्यास दोन ते चार दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या ढिसाळ कारभाराचा फायदा साई इन्स्टिट्यूटसारखे महाविद्यालये उचलत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, बुधवारचा सामूहिक कॉपीचा प्रकार उजेडात आल्यानंतरही विद्यापीठाने या संदर्भात कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत.

उत्तरपत्रिका दोन-दोन दिवस केंद्रप्रमुखांच्या ताब्यात राहत असल्यामुळे परीक्षा संपल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी दिल्या जात असल्याचा गैरप्रकार बुधवारी उघडकीस आला. असे असतानाही विद्यापीठ प्रशासन उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यात कुचराई करताना दिसत आहे. 13 मे ते 16 मे दरम्यानच्या उत्तरपत्रिका अद्याप विद्यापीठात पोहोचलेल्या नाहीत. जालना, बीड, उस्मानाबाद येथील 16 तारखेचे पेपर शुक्रवार आणि शनिवारपर्यंत विद्यापीठात पोहोचणार आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेपासून ते एमपीएससी-यूपीएससी परीक्षेत, पेपर संपल्यानंतर त्या उत्तरपत्रिका त्याच दिवशी स्ट्राँग रूममध्ये जमा केल्या जातात. रात्री कितीही उशीर झाला तरीही उत्तरपत्रिका स्ट्राँग रूमपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी परीक्षा नियंत्रकाची असते.

मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडूनच दोन ते चार दिवसांचा कालावधी केंद्रप्रमुखांना देण्यात आला आहे. उस्मानाबाद उप केंद्रांतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना चार दिवस तर औरंगाबाद आणि जालना येथील केंद्र प्रमुखांनी दोन दिवसांत उत्तरपत्रिका जमा करण्याच्या सूचना विद्यापीठ प्रशासनाकडूनच देण्यात आलेल्या होत्या. हीच संधी होम सेंटर असलेल्या महाविद्यालयांना मिळाली. सायंकाळी पाच वाजता पेपर संपल्यावर सील फोडून पुन्हा उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिल्या गेल्या. होम सेंटरला परीक्षा झाल्यावर उत्तरपत्रिका तातडीने विद्यापीठाकडे देण्याच्या सूचना नव्हत्या.

विद्यापीठाची गाडी जेव्हा त्या मार्गावर येईल, त्या वेळेला सील केलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विद्यापीठ प्रशासन उचलून नेते. विद्यापीठाकडे दोनच वाहने आहेत. त्यामुळे जरी विद्यापीठाने औरंगाबाद-जालन्यासाठी दोन दिवस दिले असले तरीही प्रत्यक्षात चार ते पाच दिवसांनंतर उत्तरपत्रिका विद्यापीठात पोहोचविण्यात आल्या. साई इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या प्रकारानंतरही या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही.  प्रशासनाकडून धिम्यागतीने पावले उचलली जात आहेत. विद्यापीठाकडे उत्तरपत्रिका आणण्यासाठी वाहन व्यवस्था नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.

*17 रोजी एका सेंटरचीच गाडी पाहोचली विद्यापीठात...*

16 मे रोजी अभियांत्रिकाच्या उत्तरपत्रिकेचा गैरप्रकार समोर आल्यानंतर विद्यापीठच्या परीक्षा विभागाकडून शहरातील उत्तरपत्रिका अर्ध्यातासाच्या आता विद्यापीठात पोहोचल्या पाहिजे म्हणून सूचना देण्यात आल्या. सकाळ आणि दुपारच्या सत्रात 13 सेंटरवर औरंगाबादेत परीक्षा झाली. त्यापैकी केवळ एकाच सेंटरची गाडी 17 रोजी सायंकाळी सहा वाजता विद्यापीठाच्या परीक्षा विभागात उत्तरपत्रिका घेऊन उभी होती.

*मूल्यांकन केंद्राचे संचालक उत्तरपत्रिकांची करणार पडताळणी*

2 मे ते 15 मे दरम्यान झालेल्या विविध विषयांच्या उत्तरपत्रिका या मूल्यांकन केंद्राचे संचालक व त्या विषयातील तज्ज्ञांकडून पडताळल्या जाणार आहेत. त्यानंतर या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाईल. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत साम्य आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. साई अभियांत्रिकी महाविद्यालयात 13 मे पर्यंत विविध पाच शाखांच्या 82 विषयांचे पेपर झाले. 2 हजार 200 विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या हातात आल्या आहेत. 14 ते 16 दरम्यान झालेल्या विषयांच्या उत्तरपत्रिका मात्र अद्याप विद्यापीठाला मिळालेल्या नाहीत. त्या साई केंद्रावरच अडकलेल्या आहेत. 16 मे पूर्वीच्या सर्व उत्तरपत्रिकांची पडताळणी केली जाणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃