twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣8⃣

*🛰चांद्रयान-२ मोहिमेत बेडगच्या सुपुत्राची भरारी*

Published On: Sep 09 2019 1:35AM

सांगली : स्वप्निल पाटील,दैनिक पुढारी.

*चांद्रयान-2 मोहिमेत अविनाश कल्याण कुलकर्णी (वय 59) या बेडगच्या सुपुत्राचा सहभाग असून विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.*

अविनाश कुलकर्णी हे गेल्या 30 वर्षांपासून इस्रोत वरिष्ठ संशोधक म्हणून काम करीत आहेत. चांद्रयान-2 मोहिमेतील लँडर आणि ऑर्बिटरमध्ये समन्वय ठेवण्याचे काम कुलकर्णी यांच्याकडून केले जात आहे.

कुलकर्णी यांचे प्राथमिक शिक्षण मिरजेत, तर माध्यमिक शिक्षण सांगली मध्ये झाले आहे. वॉलचंद कॉलेजमधून त्यांनी बीईपर्यंत शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी आयआयटी बॉम्बे मधून एमटेक पदवी घेतली आहे. यानंतर ते इस्रोमध्ये संशोधक म्हणून रुजू झाले.

इस्रोच्या वेगवेगळ्या मोहिमेत कुलकर्णी यांची महत्त्वाची भूमिका असते. 2008 मध्ये सोडलेल्या मंगळयान मोहिमेतदेखील त्यांचा कंट्रोलर म्हणून सहभाग होता. मंगळयान मोहीम यशस्वी करण्यात कुलकर्णी यांचे मोलाचे योगदान होते.

चांद्रयान-2 मोहिमेतही त्यांचा नियंत्रक म्हणून सहभाग आहे. विक्रम लँडर आणि ऑर्बिटर यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कुलकर्णी यांचे आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किमी अंतरावरून विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. त्यामुळे संपर्क तुटलेल्या लँडरचे ठिकाण शोधण्याचे इस्रोचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. लँडरचा संपर्क तुटून देखील ऑर्बिटरने रविवारी लँडरचे फोटो पाठविले होते. त्यामुळे विक्रम लँडरशी पुन्हा संपर्क करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. यामध्येही कुलकर्णी यांचे मोठे योगदान असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.

*इच्छाशक्‍तीच्या जोरावर बनला इस्रोेचा संशोधक*

अविनाश कुलकर्णी हे मूळचे मिरज तालुक्यातील बेडग येथील असून  त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील आहे. कुलकर्णी यांचे शिक्षण मिरज व सांगलीत झाले आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. प्रचंड आत्मविश्‍वास असणार्‍या कुलकर्णी व त्यांच्या पथकामार्फत ‘विक्रम लँडर’चा ऑर्बिटरबरोबर संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

https://pudhari.news/news/Sangli/the-son-of-Bedg-was-gives-his-efforts-on-Chandrayaan-2-Campaign/m/


📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_