🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣0⃣6⃣
*🦜सांगलीत वेड्या राघूचे झाले काय ... ?*
साभार- सकाळ वृत्तसेवा 08.19 PM
*_वेड्या राघूला शहाण्या पाखरांचे जीवदान .जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक_*
सांगली : जिल्हा परिषद शाळेच्या आवारात जखमी अवस्थेत सापडलेल्या "वेडा राघू' नावाच्या पक्ष्यावर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक उपचार करून जीवदान दिले.
विजयनगर-म्हैसाळमधील सरस्वतीनगर जिल्हा परिषद शाळेत कुतूहलाने हा प्रकार पाहणाऱ्या शिक्षकांना देखील कौतुक वाटले. पक्ष्याला वाचवण्याची धडपड पाहून त्यांचा उर भरून आला. वेड्या राघूला शहाण्या पाखरांनी जीवदान दिल्याची प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांच्या दफ्तरात लगोरी
मिरज तालुक्यातील सरस्वतीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामीण भागात दिसणारा उनाडपणा शिक्षकांनाही जाणवला होता. इथल्या काही विद्यार्थ्यांच्या दफ्तरात वह्या-पुस्तकांबरोबर चिमण्या-पाखरांना मारण्यासाठीची लगोरी दिसायची. निष्पाप पाखरांना लगोरीतून दगड मारल्यामुळे इजा होऊ शकते. प्रसंगी मृत होऊ शकतात याबाबत जाणीव नव्हती. त्यामुळे शिक्षकांनी इथे संस्कार पेरण्यास सुरवात केली.
*शिक्षकांनातून संस्काराचे धडे*
विद्यार्थ्यांना प्रार्थना, परिपाठ यामधून प्राणीमात्रावर दया करावी अशी शिकवण दिली. त्यांच्यामध्ये वृक्षारोपणाविषयी जागृती केली. मुक्या पक्षी-प्राण्याबाबत प्रेम निर्माण केली. जेवणाच्या सुटी डबा खाल्यानंतर खाली पडलेले अन्न, खरकटे गोळा करून ते पक्ष्यांसाठी झाडाखाली ठेवण्यास सांगितले.
*विद्यार्थ्यांमध्ये पक्ष्यांविषयी आवड*
त्याचा परिणाम म्हणून मुलांच्या डब्यातील शिल्लक अन्न मुक्या जीवांच्या चोचीत जाऊ लागले. मुलांमध्ये पक्षी-प्राणीप्रेम जागृत झाले. आज सकाळच्या सुमारास मुलांमधील पक्षी प्रेमाची प्रचितीच शिक्षकांना आला. शाळेच्या आवारात एक वेडा राघू नावाने संबोधला जाणारा पक्षी जखमी होऊन पडला होता. मुलांना तो दिसताच त्याच्याभोवती जमले. जखमी राघूची वेदना मुलांच्या हृदयाला जाऊन भिडली.
चिमूकल्यांची जीव वाचवण्याची तत्काळ त्यांच्यामध्ये जीव वाचवण्याची भावना जागृत झाली. इवल्याशा हातात पक्षाला नाजूकपणे घेतले. दुसऱ्याने त्याच्या चोचीत पाणी टाकण्यास सुरवात केली. राघूला उबदारपणा मिळावा यासाठी काहींनी झाडाचा पाला आणला. रिकाम्या खोक्यात पाला टाकून त्यामध्ये राघूला अलगदपणे ठेवले.
*चिमुकल्यांवरील संस्कार पाहून कौतुक*
मैदानात मुलांचा घोळका पाहून शिक्षकांनी गर्दीतून डोकावल्यानंतर त्यांना मुलांची पक्षाला वाचवण्याची धडपड दिसली. शिक्षकांनी पेरलेले संस्कारच उगवल्याचे दिसले. गावचे सरपंच विष्णू करे याचवेळी आवारात आले होते. त्यांना देखील चिमुकल्यांवरील संस्कार पाहून कौतुक वाटले.
*ऍनिमल राहतकडे सुपूर्त*
चिमुकल्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढे काय करायचे? त्यांना माहीत नव्हते. तेव्हा शिक्षकांनी पुढील जबाबदारी पार पाडली. ऍनिमल राहत या पक्षी-प्राणीप्रेमी संस्थेशी संपर्क साधला. त्यांचे कार्यकर्ते शाळेत आले. त्यांनी जखमी पक्षाला ताब्यात घेऊन पुढील उपचारासाठी नेले.
*शिक्षकांना विद्यार्थ्यांचे कौतुक*
मुख्याध्यापक लक्ष्मण पुजारी, शिक्षक राजकुमार पेडणेकर, दिलीप जाधव, वैजनाथ औताडे, अपूर्वा मिरजकर, वैशाली पाटील, पद्मिनी कदम यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
https://www.esakal.com/paschim-maharashtra/birds-life-support-sangli-243499
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_