twitter
rss

इस्रो’ची आणखी एक भरारी, PSLV C-35चं यशस्वी उड्डाण...🚀


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘ इस्त्रो’ने आज (सोमवारी)आणखी एक इतिहास रचला आहे. इस्त्रोनं पीएसएलव्ही रॉकेटमधून, एकाच वेळी 8 उपग्रह दोन वेगवेगळ्या कक्षेत सोडले आहेत. विशेष म्हणजे मुंबई आयआयटीच्या विदयार्थ्यांनी तब्बल आठ वर्षे अथक परिश्रम घेऊन तयार केलेला ‘प्रथम’ या  लघुउपग्रहाचं सुध्दा अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाले.

आज सकाळी 9.10 मिनिटांनी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला लघुउपग्रह असून, या लघुउपग्रहाचे प्रक्षेपण भारतीय अंतराळ संशोधनात एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांसह अवघ्या देशाचे ‘प्रथम’कडे लक्ष लागून राहिलं होतं.

पीएसएलव्ही सी-35 हे 37 वं उड्डाण होतं. या वेळी प्रथमच दोन विविध कक्षांमध्ये उपग्रहांना सोडण्यात आले. वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या स्कॅटसॅट-1 या 371 किलोच्या उपग्रहाबरोबरच ‘प्रथम’ आणि पायसॅट हे शैक्षणिक उपग्रह (दोन्ही भारत), अलसॅट-1 बी, अलसॅट-2 बी आणि अलसॅट-1 एन (सर्व अल्जेरिया) आणि पाथफाइंडर-1 व एनएलएस-19 हे अनुक्रमे अमेरिका आणि कॅनडाचे उपग्रह अवकाशात सोडले गेले.

आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तमासकर या विद्यार्थ्यांना जुलै 2007मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने त्याची बांधणी सुरू केली. त्सुनामीसारख्या प्रलयाची पूर्वकल्पना देण्याची क्षमता ‘प्रथम’मध्ये आहे, असा दावा मुंबई आयआयटीने केला आहे. विशेष म्हणजे अवघ्या १० किलो वजनाच्या या उपग्रहाचे इस्रोनेही कौतुक केले आहे.

* 8 उपग्रह कोणती?*

1) भारताचा स्कॅटसॅट उपग्रह
( वजन 371, हवामानाची आणि समुद्रातील वातावरणाची ताजी माहीती, फोटो देणारा उपग्रह )

2) मुंबई आयआयआटी च्या विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘प्रथम’ हा 10 किलोग्रॅमचा उपग्रह.
8 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर

3) बंगळूरच्या पीईएस विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी बनवलेला ‘पीसॅट’ हा 5.25 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह.

4) अल्जेरीया देशाचे तीन उपग्रह आहेत.
( 117, 103 आणि 7 किलो वजनाचे उपग्रह )

5) अमेरिकेचा 44 किलोग्रॅम वजनाचा एक उपग्रह.

6) कॅनडाचा 8 किलोग्रॅम वजनाचा एक उपग्रह.

असे एकुण 8 उपग्रह इस्त्रो पीएसएलव्ही रॉकेटमधून अंतराळात दोन वेगवेगळ्या कक्षेत सोडणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 

_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_