twitter
rss

*_🌴 नारळाची मलाई 🥥_*

पुण्यातील आझम कॉलेजचा कॅम्पस् , वेळ दुपारी दोनची....
आमच्या प्रशिक्षणातील मधला ब्रेक झाला . कमी वेळेत खायला जवळ काही मिळत नसल्याने आम्ही दुपारच्या ऊसाचा रस प्यायचो,
पण आज नेमके रसवंतीगृह बंद होते , त्यावेळी काही जन चहा घेण्यासाठी गेले, मी आणि श्रीकृष्ण माळी सरांनी  नारळपाणी प्यायचे ठरवले, दोघांनी दोन नारळ घेतले तितक्यात तिथे MPSC online ची परीक्षा देवून एक मुलगा जवळ आला, त्यानेही एक नारळ घेतला आम्ही तिघेही नारळपाणी प्यायलो, या विक्रेत्याचे असे वैशिष्ट्य होते की तो नारळपाणी प्यायले की त्यातील खोबरे (इथे त्याला मलई म्हणतात) काढून देत असे . आम्ही त्याच्याकडे नारळ देणार तितक्यात त्या तरुणाचे लक्ष त्याच्या नारळाकडे गेले तर त्याच्या नारळात खोबरे नव्हते ,त्याने माझ्याकडे नारळाकडे पाहून म्हणाला ,'' सर,तुमच्या नारळात लई मलई आहे .'' नारळविक्रेत्याने त्याला त्याचे खोबरे काढता येत नाही असे सांगितले आणि आमच्या दोन नारळातील खोबरे काढून दिले ,त्यावेळी  श्रीकृष्ण माळी सरांनी एक नारळ त्या तरुणास दिला आणि उरलेला आम्ही खाल्ला..
त्या तरुणाने त्याची *मलई* संपल्यानंतर प्रसन्न चेहऱ्याने आम्हांस खुणावून तो निघून गेला.

....... नंतर श्रीकृष्ण माळी सरांनी मला असे सांगितले की नारळाचे तीन प्रकार असतात, पहिला पाण्याचा ,दुसरा खोबरे असलेला आणि तिसरा नारळ व पाणी दोन्ही असलेला... _पण ढिगातील नारळापैकी कोणता नारळ कोणत्या प्रकारचा आहे हे फक्त त्या विक्रेत्यालाचं माहित असते...._

_असचं काही तरी आपल्या जीवनाच्या बाबतीत असते ना, कधी कोठे जन्म घ्यायचा कोणाच्याच हातात नसते . पण आपल्याला मिळालेल्या मलईचा थोडा भाग ज्याला काहिच मिळालेला नाही त्यांला दिला तर.जग नक्कीच थोड फार बदलेल . ...._

*🖋 श्री.दीपक माळी , ९६६५५१६५७२.*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣8⃣

*⛳सांगलीच्या १० वर्षीय उर्वीने सर केले ‘सरपास’ 🧗🏻‍♀*

May 16 2018 8:51PM

साभार : पुढारी वृत्तसेवा

हिमालयातील शिवालिक रेंजमधील 13 हजार 800 फुटांवरील काळाकुट्ट भोवताल... उणे 8 अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फवृष्टी, कडाडणार्‍या विजा अशा पार्श्‍वभूमीवर मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणार्‍या उर्वी अनिल पाटील या 10 वर्षांच्या मुलीने ‘सरपास’ हे शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली आहे.

उर्वीने मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कँपवरून 4 मे 2018 पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे 7 मेपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली.

*असे सर केले अवघड सरपास शिखर*

सरपास हे शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे 14 कि.मी.चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून, अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे 2 वाजता होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गूळ व फुटाणे हा अल्पोपाहार करून  ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातावरण अचनाक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले. अशाही परिस्थितीत पुन्हा पहाटे 3.15 वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. 200 मीटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. 14 मे 2018 ला पठारावर पोहोचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता.

*अशीही घेतली जोखीम*

सरपास या शिखराच्या ट्रेकिंगसाठी यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या आयोजक संस्थेने ट्रेकिंगची वयोमर्यादा 15 वर्षे ठेवली आहे. यात मी जेमतेम 10 वर्षांची असल्याने मला ही संधी मिळणार नव्हती; पण  मी मनाचा हिय्या केला आणि हा ट्रेक करण्याचे ठरवले. माझ्या वडिलांनी या संस्थेला सहमतीपत्र लिहून दिले आणि मला सरपासकडे मोर्चा वळविण्याची रीतसर परवानगी मिळाली, अशी माहिती तिने दिली.

*अशी केली तयारी*

हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिकरीत्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व  व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने आत्मविश्‍वासाने सांगितले. आता एव्हरेस्ट सर करण्यासाठी ती उत्सुक आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣7⃣

*एका बेफाम जिद्दीची गोष्ट...*

*आजीबाई वनारसे खानावळ ..लंडन.*

राधाबाई,.....

यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारिद्र घरात.
अचानक एक दिवस इंग्लंडहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.
एक दिवस आकाश कोसळले.
थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवऱ्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते ही ऐन हिवाळ्यात. बाईच्या हाताला धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर ही अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती...
अशा अवस्थेत जवळच राहणाऱ्या एका भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. ही म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडनला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
.
पुल, अत्रे, यांपासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत. (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या). स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळही त्यांनीच बांधले.त्यांच्या अंत्ययात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचा महापौर हजर होता. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण...
कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्‍या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
तात्पर्य: फक्त शिक्षण व पैसे ह्या बाबी व्यवसाय करण्यासाठी इतक्या महत्वाच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे आहेत ते चिकाटीने प्रयत्न करणे, मेहनत घेणे व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द.
१९५० च्या दशकात राधाबाई वनारसे (पूर्वाश्रमीच्या राधा डोमाजी डहाके) या लंडनला गेल्या आणि घरकाम करता करता त्यांनी भारतातून तिकडे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आजीबाईंची खानावळ’ सुरू केली. पुढे काही वर्षांनी ही खानावळ तेथील सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बनले. या राधाबाई वनारसे यांच्या जिद्दीची ही कहाणी सरोजिनी वैद्य यांनी ‘कहाणी लंडनच्या आजीबाईं’ची या पुस्तकातून मांडली होती. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ सप्टेंबर १९९६ मध्ये प्रकाशित झाली होती. आजवर पुस्तकाच्या आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

याच पुस्तकावर आधारित संतोष वेरुळकर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना घेऊन "लंडनच्या आजीबाई" हे नाटक दिग्दर्शित केलं होतं..

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣6⃣

*🛸जे 'नासा'ला जमले नाही ते ठाणेकर अक्षतने केले...!*

Published On: May 05 2018

साभार- पुढारी, विशेष प्रतिनिधी ठाणे.

आतापर्यंत नासाच्या शास्त्रज्ञांना जे जमले नाही ती किमया अकरावीमध्ये शिकणार्‍या अक्षत मोहिते या ठाणेकर विद्यार्थ्याने करून दाखवले. पृथ्वी ग्रहाच्या बाहेर तब्बल 20 हजार लोक पृथ्वीसारख्याच चांगल्या वातावरणात राहतील, असे मशिन अक्षतने तयार केले असून या संशोधनाची दखल घेत नासाने अमेरिकेत होणार्‍या 2018 च्या इंटरनॅशनल स्पेश डेव्हलपमेंट कॉन्फरन्ससाठी अक्षतला आमंत्रित केले आहे.

रायगड जिल्ह्याच्या मानगांव तालुक्यातील भालेगावचा असलेला अक्षत मोहिते हा ठाण्यातील घोडबंदर रोडच्या विजय नगरीमध्ये राहतो. त्याने आनंदनगर आर्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले असून मुलुंडच्या होली ऐंजल हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये सध्या तो बारावी विज्ञान शिकतोय. अक्षतला नासाच्या स्पेस सेटलमेंटच्या संशोधनाची माहिती मिळाल्यानंतर अक्षतने पृथ्वीच्या वातावरणाबाहेर किमान 20 हजार लोक राहू शकतील,  असे स्पेस मशिन तयार केले. दैनिक पुढारीला त्याने सांगितले की, हे मशिन अवघ्या दहा दिवसांत तयर केले. त्यासाठी विशिष्ट सॉफ्टएवर वापरण्यात आले. अलिबागमधील नासाचे प्रतिनिधी असलेले प्रणीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले आहे आणि नॅशनल स्पेस सोसायटी आयोजित स्पेस सेटलमेंट कॉन्टेस्ट या स्पर्धेत या मशिनची निवडही  झाली.

आतापर्यंत पृथ्वीग्रहाबाहेर फक्त सहा जण राहतील एवढ्याच क्षमतेचे स्पेस मशिन तयार होऊ शकले आहे. ही क्षमता तब्बल 20 हजार लोकांपर्यंत वाढवण्याचे मोठे काम अक्षतने केले.  या मशिनद्वारे 20 हजार लोक पृथ्वीबाहेरच्या वातावरणात अतिशय व्यवस्थित व  प्रदुषणमुक्त जगू शकतील. हे संशोधन गेल्या 15 फेब्रुवारीला नासा सेंटरकडे पाठविण्यात आले. 16 मार्चरोजी माझ्या संशोधनासाठी निवड झाल्याचे नासाकडून कळविण्यात आले आणि इंटरनॅशनल स्पेस डेव्हलपमेंट कॉन्फरन्ससाठी आमंत्रणही मिळाले, हे सांगताना अक्षतचा आनंद अवकाशात मावत नव्हता.आता होऊ घातलेल्या स्पर्धेत असे स्पेस मशिन  प्रत्यक्षात तयार करावे लागणार असून अक्षत मोहिते 20 मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे. अक्षतचा गुरुवारी युवासेनाप्रमुख आदित्य  ठाकरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते. अक्षतच्या अमेरिकेला जाण्या-येण्यापासूनचा सर्व खर्च शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे.

अवघ्या दहा दिवसांमध्ये 20 हजार लोक क्षमतेचे स्पेस मशिन संशोधित करण्यासाठी पहाटे 3 वाजेपर्यंत काम करावे लागत होते. सततच्या जागरणामुळे कॉलेजला उशिरा जाणे, कधी कधी दांडी मारावी लागली. तरी देखील कॉलेजने मला सांभाळून घेतले.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣1⃣

_*ऑन ड्युटी २४ तास. ..!*_

*जेव्हा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पोलीसच झाला शिक्षक*

लोकसत्ता ऑनलाइन , May 4, 2018

नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पासवान हे आपली ड्युटी संपल्यावर इथल्या गरीब मुलांना गणित विषय शिकवतात. समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षण हे गरजेचं आहे. ‘शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता’, नेल्सन मंडेला म्हणाले होते. याच विचारांतून प्रभावित होऊन प्रमोद हे झारखंडमधल्या गुरबंदा गावात रोज गरीब मुलांना शिकवण्यासाठी जातात.
हा भागही नक्षलग्रस्त आहे. इथल्या मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवला नाही तर तेदेखील नक्षलवादाकडे ओढले जातील याची भीती प्रमोद यांना आहे म्हणूनच ते या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. ‘या भागातील लोक गरीब आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच माझ्याजवळचं ज्ञान मी त्यांना वाटण्याचं ठरवलं आहे. ही मुलं शिकली तर ती नक्षलवादापासून दूर राहतील. या भागातील सगळेच सुशिक्षित झाले तर नक्षलवाद दूर होईल.’ असा विश्वास प्रमोद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
प्रमोद विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवतात. ड्युटी संपली की ते नचुकता शाळेत जातात. गणित हा विषय नेहमीच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण, योग्य तंत्र वापरून तो शिकवला तर विद्यार्थ्यांना समजून घ्यायला वेळ लागणार नाही असंही ते म्हणतात. शिक्षण हेच या विद्यार्थ्यांचा विकास घडवू शकतं ही आशा त्यांना आहे आणि यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_