🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣2⃣0⃣
🏤 *मंदिरासाठी जमलेला निधी दिला ज्ञानमंदिरास..!*
Last Updated: Mar 03 2020 9:23AM
कोल्हापूर : प्रवीण ढोणे
ग्रामदैवताचे मंदीर उभारण्यासाठी जमलेली लोकवर्गणी गावातीलच शाळेला देऊन शाळेचे अंतर्बाह्य रुपडे पालटण्याचा स्तुत्य उपक्रम बनाचीवाडी (ता.राधानगरी) येथील ग्रामस्थांनी राबवला आहे. हे डोळस पाऊल अन्य गावांना देखील अनुकरणीय असेच आहे. कारण पिढी घडवणारे ज्ञान मंदिर जपणे, वाढवणे अधिक महत्त्वाचे आहे.
अवघी लोकसंख्या दीड हजारच्या आसपास व राधानगरी शहरापासून हाकेच्या अंतरावरील हे बनाचीवाडी गाव डोंगराळ परिसरातच वसलेले. रस्ते, पाणी, गटर आदी भौतिक सुविधाची वानवा. गावाला शेती असुन केवळ पाण्याची उपलब्धता नाही. तरीही याच शेतीवर रोजंदारी करणे हाच उदर निर्वाहाचा मार्ग. येथील ग्रामदैवत हनुमान मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी २०१७ मध्ये ग्रामस्थ मंडळींची बैठक बसली होती. बोलता, बोलता शाळेमधील समस्यांची चर्चा पुढं आली. शिक्षणाची दुरद्रष्टी लाभलेल्या ग्रामस्थमंडळींनी लगेचच ग्राममंदीर जिर्णोध्दाराचा निर्णय बदलुन शाळेच्या जिर्णोद्धाराठी लोकवर्गणीचे चार लाख, वस्तू रुपाने तसेच श्रमदानातून तीन लाख असे मिळून जवळजवळ सात लाखांचा निधी प्राथमिक शाळेच्या सुविधेसाठी खर्च करण्याचा निश्चय केला.
शाळेच्या विविध कामाचे काँन्ट्रक्ट न देता सरपंच, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे अधिकारी, शिक्षकांनी स्वत: ग्रामस्थांच्या मदतीने कामे करुन घेतली. वॅाल कंपाऊंड, रंगरंगोटी, बोलतका व्हरांडा, ई- लर्निंग, हँन्डवाँश स्टेशन, शैक्षणिक साहित्य, सुंदर बाग, सुसज्ज कार्यालय, संगणक कक्ष, पिण्याचे पाणी, मुलांमुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रयोगशाळा साहित्य, ग्रंथालय आदी कामे केली.
यानंतर केलेल्या कामाचे मुल्यमापन केले असता ७ लाखाचा निधी खर्च केला असला तरी प्रत्यक्षात.१२ लाखाचे काम लोकसहभागामुळे झाल्याचे दिसुन आले. आता या ज्ञानमंदीराचे काम पुर्ण झाले असुन ग्रामस्थमंडळी सध्या ग्राममंदीर हनुमान मंदीराच्या जिर्णोद्धाराच्या कामाला लागली आहेत. या ग्रामस्थांमध्ये एवढी एकी, प्रेम, आपुलकी आहे की ठरवलेल्या कामाची निर्गत झाल्याशिवाय ही मंडळी थांबतच नाहीत.
*शाळेतील परसबागेतील भाजी पोषण आहारासाठी.*
शाळेने परसबाग इतकी स्वच्छ, सुंदर केली आहे की याठिकाणी विविध भाज्या, फळभाज्या पिकविल्या जातात, या भाज्यांचा वापर शालेय पोषण आहारासाठी केला जातो. ज्यापध्दतीने ग्रामस्थमंडळी सार्वजनिक कामासाठी झटतात त्याच पध्दतीने या शाळेतील शिक्षक सार्वजनिक कामासाठी वेळ देतात.
*आमदार आबिटकरांकडूनभरघोस निधी, तर खासदार संभाजीराजेंकडून गाव दत्तक*
या गावकऱ्यांची जिद्द, चिकाटी, एकी पाहून विकासकामांसाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी भरघोस निधी दिला. तर या गावांशी चार पिढ्या ऋणानुबंध असणाऱ्या छत्रपती घराण्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी हे गावच दत्तक घेतल्याने बनाचीवाडी गाव विकासाचे मॉडेलच बनले आहे.
https://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-district-banachivadi-villagers-provided-school-funds-for-the-temple/m/
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_