🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣2⃣6️⃣
*अभिमानास्पद ! बाळाला जन्म देण्याआधी 'या' मराठी महिलेने दिला कोरोना टेस्टिंग किटला जन्म*
सकाळ न्यूज नेटवर्क,01.24 PM
_मिनल यांच्या टेस्टिंग किटला कोरोनाची टेस्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मायलॅब्सकडून पहिल्या १५० टेस्टिंग किट मुंबई, पुणे, बंगळुरू, गोवा आणि दिल्ली इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत._
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढत चालला असताना भारताकडे स्वतःची कोरोना चाचणी करण्याची टेस्टिंग किट नाही यावरून भारतावर सतत टीका करण्यात आली. भारताकडे सुसज्ज सोयी नाहीत अशी टीकाही काही लोकांकडून करण्यात आली. मात्र आता या टीकेला सडेतोड उत्तर एका मराठमोळ्या महिलेनं दिलंय. या महिलेनं कोरोना व्हायरस साठीचं पाहिलं-वहिलं पहिली 'मेड इन इंडिया टेस्टिंग किट' बनवलाय.
मिनल दाखवे-भोसले असं या महिलेचं नाव आहे. पुण्यातल्या मायलॅब्स या प्रयोगशाळेत त्या विषाणू वैद्यक शास्त्रज्ञ आहेत. मायलॅब्समध्ये मिनल आणि यांनी कोरोनाच्या या टेस्टिंग किटचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे मीनल यांनी आपल्या बाळाला जन्म देण्याच्या काही तासांआधीच या टेस्टिंग किटचा शोध लावला. हे टेस्टिंग किट्स बनवण्याचं काम वेळेत पूर्ण करून दाखवलं असं देखील मिनल यांनी म्हंटलंय.
मिनल यांच्या टेस्टिंग किटला कोरोनाची टेस्ट करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मायलॅब्सकडून पहिल्या १५० टेस्टिंग किट मुंबई, पुणे, बंगळुरू, गोवा आणि दिल्ली इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या आहेत. तसंच हे टेस्टिंग किट तयार करण्याची किंमत अत्यंत कमी आहे. देशात आतापर्यंत परदेशातून कोरोनाच्या टेस्टिंग किट मागवण्यात येत होत्या. परदेशातील एका किटची किंमत तब्बल ४५०० रुपये इतकी होती. मात्र मायलॅब्सनं बनवलेल्या या टेस्टिंग किटची किंमत फक्त १२०० रुपये आहे. त्यामुळे आता कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त रुग्णांची कोरोना तपासणी होऊ शकणार आहे.
"आमचा लढा वेळेशी होता, कारण कोरोना वेगानं पसरत चालला होता, आमची टीम ही टेस्टिंग किट बनवण्यासाठी योग्य ती मेहनत घेत होती आणि मिनल आम्हा सगळ्यांचं मनोधैर्य वाढवत काम करत होती. मायलॅब्स अशा तब्बल १ लाख टेस्टिंग किट एका आठवड्यात बनवू शकते तसाच गरज पडली तर प्रतिआठवडा हा आकडा वाढवूही शकते," असं मायलॅब्सचे संचालक डॉक्टर गौतम वानखेडे यांनी म्हंटलंय.
*बाळाआधी दिला टेस्टिंग किटला जन्म:*
मिनल यांनी हे टेस्टिंग किट तयार करण्याच्या काही तासानंतरच त्यांच्या बाळाला जन्म दिला. "गरोदर असताना हे काम करणं खूप अवघड होतं, मात्र मला माझ्या देशासाठी काही करून दाखवायचं होतं. माझ्याकडे वेळ नव्हता मात्र हे आव्हान मी स्वीकारलं. मी आणि माझ्या साथीदारांनी मिळून हे टेस्टिंग किट बनवण्याचं काम वेळेत पूर्ण करून दाखवलं. मीनल यांनी बनवल्या टेस्टिंग किट मधून चाचणीचा निष्कर्ष २-३ तासात देते तर परदेशातून आयात करण्यात आलेल्या किटमधून चाचणीचा निष्कर्ष ५-६ तासात येतो. यामुळे आम्ही जलद आणि उत्तम दर्जाचे किट बनवण्यात यशस्वी झालो आहोत,असं मीनल भोसले यांनी म्हंटलंय.
या टेस्टिंग किटला अन्न आणि औषध प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हे किट्स कोरोना संशयितांच्या चाचण्या करण्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
https://www.esakal.com/mumbai/fight-against-corona-virus-marathi-women-minal-bhosale-made-made-india-covid19-testing-kits
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_