twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣7️⃣

*तान्ह्या मुलाला घेऊन आयुक्त कामावर रुजू*

Last Updated: Apr 13 2020 12:13AM

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

कोरोना महारोगराई आपत्तीला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. यात अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य अगदी जबाबदारीने निभावत आहेत. याचे एक उदाहरण नुकतेच विशाखापट्टणम येथे दिसून आले. या महारोगराईच्या काळातही विशाखापट्टणम महानगरपालिकेच्या आयुक्त एक महिन्याच्या मुलासह ऑफिसमध्ये कार्यरत राहून कोरोनाविरोधी लढाईचा भाग बनल्या आहेत.

विशाखापट्टणम महापालिकेच्या (ग्रेटर विशाखापट्टणम म्युनिसिपल कॉर्पोरेशन) आयुक्त सृजना यांनी एक महिन्यापूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. याच काळात कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनला सुरुवात झाली. साथीच्या रोगकाळात महापालिका आयुक्तांची जबाबदारी किती मोठी असते, हे वेगळे सांगायला नकोच. याची जाणीव असलेल्या सृजना यांनी जबाबदारी ओळखून कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला काही दिवस मुलाला पती आणि आईच्या ताब्यात देऊन त्या रोज कार्यालयात हजर राहिल्या, तर बर्‍याचदा त्या एका महिन्याच्या मुलाला घेऊनच कार्यालयातून कार्यरत असतात. स्वच्छतेच्या कामावरही त्यांची देखरेख आहे. एवढेच नाही, तर प्रसूतीच्या काही दिवस आधीही त्या आपले कर्तव्य पार पाडत होत्या.

नवजात मुलांना आईची गरज असते; पण वैयक्तिक गरजा सध्या मी बाजूला ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाच्या मदतीने कोरोना व्हायरसच्या नियंत्रणासाठी आम्ही कार्यरत आहोत. या महारोगराईला रोखण्यात माझेही योगदान असले पाहिजे. त्यामुळे स्वच्छतेसह शुद्ध पाणी उपलब्ध केले जात आहे.

- सृजना, आयुक्त, विशाखापट्टणम.

https://www.pudhari.news/news/National/commissioner-of-Visakhapatnam-came-on-duty-with-baby-shown-dedication-of-work/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_