*प्रज्ञान बग्गी....🖋️दीपक माळी ©*
_ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा विश्वातील कोणत्याही मानवी अथवा अमानवी जीवाशी कसलाही संबंध नाही, असा संबंध आढळल्यास तो योगायोग समजावा._
*प्रज्ञान बग्गी*
🖋️ *दीपक माळी ,*📲९६६५५१६५७२.
*भाग - ३*
राजपुत्र चंद्रसेन विचार करु लागला, ''आपण या पृथ्वीवासियांपेक्षा प्रगत की मागास आहोत ? भले आपला ग्रह लहान आहे, पण आपले एकसंघ एकच राज्य आहे, अनेक राज्यांत विखुरलेले हे मानव आपला मुकाबला कधीच करु शकत नाहीत, तरीही आपणांस गप्प बसून चालणार नाही ते कधीही चांद्रभुमीवर आक्रमण करु शकतात. त्यांच्या प्रत्येक योजनेची आपल्याला पूर्वकल्पना यायला हवी यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.पृथ्वीवरील जी राज्ये चांद्रभुमीवर आक्रमण करु शकतात त्यांच्यावर कायम लक्ष ठेवायला हवे, त्यासाठी आपले 'पृथ्वीयान' सदैव पृथ्वीभोवती फिरत रहायला हवे.''
राजपुत्राने सर्व संशोधकांना 'चांदसा'त बोलावले . ''पृथ्वीवर २४ तास आपली नजर राहाण्यासाठी आपल्या 'पृथ्वीयानां'ची संख्या वाढविणे आवश्यक आहे. आपला ग्रह पृथ्वीपेक्षा लहान आहे ,आपण मानवापेक्षा लहान आहोत,आपले पृथ्वीयान'ही लहानच असायला हवे, पृथ्वीवरील मानवाने चुकून पाहिले तरी 'उडती तबकडी ' दिसली की काय ? असा त्याला भास व्हायला हवा.
इतके करुनही जर पृथ्वीवरुन मानवाने आक्रमण केले तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपणांस क्षेपणास्त्रांची निर्मिती करायला हवी.'' अशा सुचना राजपुत्राने दिल्या.
लवकरच संशोधकांनी आणखी काही पृथ्वीयानां'ची निर्मिती केली. ती पृथ्वीयाने पृथ्वीभोवती २४ तास भ्रमण करु लागली,त्यांनी पृथ्वीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींचा वृत्तांत क्षणात पाठविणे सुरु केले.तसेच हवेत ५० कि.मी.पर्यंत मारा करुन शत्रूचे लक्ष्य अचूक टिपणारे क्षेपणास्त्र संशोधकांनी निर्माण केले.त्यामुळे चंद्रावर येणाऱ्या कोणत्याही वस्तूला आता चांद्रभुमीवर उतरणे अशक्यप्राय झाले.
...........................................................
काही दिवसांनी पृथ्वीयानाद्वारे गुप्तखबर मिळाली की पृथ्वीवरील इस्त्रायल राज्य चांद्रभुमीवर चांद्रयान पाठवणार आहे , इस्त्रायल हे पृथ्वीवरील प्रगत राज्य आहे तेथील लोकांनी सर्व क्षेत्रात प्रगती केली असून त्यांना आता चंद्रावर यान पाठवून चांद्रभुमीवर आपला झेंडा रोवायचा आहे. त्यासाठी त्यांचे शास्त्रज्ञ दिवसरात्र राबत आहेत.
राजपुत्र चंद्रसेन ही बातमी ऐकून घाबरला नाही त्याने धैर्याने या संकटाला सामोरे जायचे ठरविले.
राजपुत्राने तात्काळ राजाला ही खबर दिली ,चांद्रराज्यातील सर्व लोकांना धुळीच्या आवरणाखाली राहण्याची सक्ती केली.सैनिक आणि चांदसा'चे एजंट फक्त धुळीच्या आवरणाच्यावर जाऊ शकतील . अशी सक्त सुचना राजपुत्राने दिली. सर्वांना आपल्या राजपुत्राच्या कर्तृत्वावर विश्वास होता पण थोडी भिती वाटत होतीच. शेवटी मुकाबला मानवाशी होता....
राजपुत्र चंद्रसेेन आपल्या पृथ्वीवरील पृथ्वीयानांच्या सतत संपर्कात राहून माहिती घेत होता .
इस्त्रायलचे चांद्रयान लवकर चांद्रभुमी येणार होते , विशेष म्हणजे जेथे मानवाने आपले पहिले पाऊल ठेवले होते,
त्याच भागाजवळ ते यान उतरणार होते.राजपुत्राने आपल्या सर्व सैनिकांना आपली योजना सांगितली.त्यांना योग्य त्या सुचना दिल्या.चांदसा'मधील मॉनिटर'वर यानाची दिशा आणि वेग अचूक दिसत होता .त्याच्या आधारे क्षेपणास्त्रे रोखून धरण्यात आली होती. एक क्षेपणास्त्र असफल झाले तर त्याला पर्यायी दुसरी क्षेपणास्त्रे सज्ज ठेवली होतीे.
आता इस्त्रायलचे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करुन वेग कमी करीत चांद्रभुमीच्या दिशेने हळू हळू मार्गक्रमण करु लागले होते. राजपुत्र मॉनिटर'वर स्वत:लक्ष ठेवून होता . इस्त्रायली चांद्रयान योग्य टप्प्यात येताच राजपुत्राने इशारा केला . राजपुत्राचा इशारा होताच क्षेपणास्राने यानाच्या दिशेने झेप घेतली.काही क्षणातच क्षेपणास्त्राने यानाचा अचूक वेध घेतला . इस्त्रायलचे चांद्रयान आपली दिशा आणि वेग गमावून चांद्रभुमीवर कोसळले. या यानासोबतच मानवी स्वप्नांचाही चक्काचूर झाला. संपूर्ण विश्वावर निर्विवाद वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानवी महत्वाकांक्षांना पहिला धक्का बसला होता . चांद्रभुमीवर कोसळलेल्या यानाचा चांद्रराज्याच्या सैनिकांनी लगेच ताबा घेतला .त्यामध्ये कोणी मानव नसल्याची खात्री करुन जल्लोषाला सुरुवात झाली.राजपुत्राने आज आपला बदला पूर्ण केला होता .''आपल्या भूमीवर येणाऱ्या प्रत्येक पृथ्वीवासियांचे असेच स्वागत केले जाईल'', अशी घोषणा राजपुत्राने केली.ही आनंदाची बातमी संपूर्ण चांद्रराज्यात पसरली.
...................................................................................
पण चांद्रवासी लोकांचा हा आनंद क्षणभुंगर ठरणारा होता, राजपुत्राला आणि त्याच्या सहकाऱ्यांना विजयोत्सव साजरा करायची संधीही मिळाली नाही.योद्ध्यांच्या नशिबी उत्सव नसतोच मुळी, त्यांच्या नशिबी असतं फक्त लढणं आणि लढणंच....!
*क्रमश:*