twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣8️⃣

*🦅🦉लॉकडाऊनचा सदुपयोग करत शिक्षकाने बनवली पक्ष्यांसाठी घरटी*

Last Updated: Apr 22 2020 6:54PM

इस्लामपूर : सुनिल माने

उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मानवासह पशुपक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. या कडक उन्हात पाण्यावाचून प्राणी, पक्ष्यांचा मृत्यू दरही वाढतच असतो. अशातच सतत होणारी अवैध वृक्षतोड वाढणारी सिमेंटची जंगले यामुळे पक्षी नामशेष होऊन त्यांचा किलबिलाट लुप्त होत असल्याचे चित्र आहे.

एरवी सतत अंगणात येणारी, एवढ्याशा पाण्यात स्नान करणारी आणि वेळप्रसंगी जेवणाच्या ताटा जवळ येऊन बसणारी चिमणी तर अलीकडे गायबच झाली आहे. निसर्ग साखळीत या प्राणी, पक्ष्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळे या प्राण्या पक्ष्यांचे संगोपन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. याच उदात्त हेतूने पक्षी मित्र अश्पाक आत्तार यांनी आपल्या इस्लामपूर येथील घराजवळ पक्षांसाठी स्वतः घरटी तयार केली आहेत. या घरट्यांवर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा, पक्ष्यांचे रक्षण सुख समृद्धीचे लक्षण, चलो आज आदमी से फरिश्ते बन जाये एक पक्षी की जान बचाए, पक्षी है खेतों की शान, जीवन में एक नियम बनाओ पक्षीयोंको घर का सदस्य बनाओ, पक्षी बचाव जीवन बचाव असे एक ना अनेक शुभ संदेश लिहून पक्ष्यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. सुंदर हस्ताक्षरात लिहिलेल्या या शुभ संदेशामुळे घरटेही आकर्षक दिसत आहेत. शिवाच्या रंगीबिरंगी घरटयांमुळे त्यांच्या अंगणामध्ये पक्ष्यांचा राबता वाढला असून, किलबिलाट सुरू झाला आहे.

वेगवेगळ्या फळांसह फुलझाडांचाही त्यांच्या अंगणामध्ये समावेश आहे. त्यामुळे दिवसभर हे पक्षी या फळ आणि फुल झाडांवर विसावलेले असतात. त्यांच्या पत्नी गुलजार आत्तार या देखील अंगणामध्ये दररोज सकाळी धान्याची रांगोळी काढून पक्षांच्या घासाची तजवीज करत आहेत. मातीच्या भांड्यात पाणीही ठेवले जात आहे. त्यामुळे चिमणीसह लाल बुडाचा पक्षी, कबूतर कोकीळ या पक्षांचा सध्या येथे राबता आहे. या पक्ष्यांच्या सुरेल किलबिलाटामुळे वातावरणही अल्हादायक बनत आहे.

आष्पाक आत्तार यांनी यापूर्वी निसर्ग आणि पर्यावरण जनजागृतीसाठी झाडांवर सुंदर हस्ताक्षरांमध्ये बोध वाक्य लिहून झाडांनाच बोलके केले होते. त्यांच्या या आदर्श उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करून अनुकरणही केले.

आता पक्ष्यांसाठी वाटीभर पाणी मूठभर धान्य अंगणात ठेऊन तसेच घरटी बनऊन पक्षी वाचवा निसर्ग वाचवा असा शुभ संदेश त्यांनी दिला आहे. पेशाने शिक्षक असणाऱ्या आश्पाक अत्तार यांनी लॉकडाऊनचा असा सदुपयोग करून एक वेगळा आदर्श समोर ठेवला आहे.

समाजातील प्रत्येकाने असा प्रयत्न केल्यास कदाचित लुप्त झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट पुन्हा सर्वांना ऐकायला मिळेल. पर्यायाने निसर्ग व पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल. बदलती जीवन शैली, रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर, मोबाईलचे टॉवर यामुळे चिमण्यांसह अनेक पक्ष्यांच्या जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पक्षांना घरटी करण्यास जागा उपलब्ध होत नाही. परिणामी ते मानवापासून दूर जाऊ लागले आहेत. निसर्गाशिवाय वृक्षारोपणात या पक्षांचं महत्त्व आहे. त्यामुळे या पक्ष्यांसाठी अंगणात गच्चीवर घरटे बांधून शिवाय थोडं अन्न पाणी ठेवून या चिमण्यांसह पक्ष्यांची संख्या वाढवता येईल. शिवाय मुलांमध्येही आवड निर्माण होऊन त्यांच्याकडून  निसर्ग संवर्धनाचा प्रयत्न होईल.

https://www.pudhari.news/news/Sangli/Islampur-Using-a-lockdown-the-teacher-built-a-nest-for-birds/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_