twitter
rss

_Guruvarya News_

*♻️जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शाळा बंद,अध्ययन सुरु*

*_अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा पुढाकार_*

सांगली / मिरज - दि.२५/०४/२०२०
   लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासमाला हा उपक्रम राज्यभर सुरु झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी ऑनलाईन अभ्यासमाला सुरु होत आहे. त्यामुळे शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिकणे सुरु आहे.
     डाएट अधिव्याख्याता ,विषय सहाय्यक ,समावेशित तज्ज्ञ,केंद्रप्रमुख,साधनव्यक्ती यांच्या माध्यमातून प्रत्येक पालकांचे व्हॉटस् अॅप ग्रुप , शिक्षकांचे विविध व्हॉटस् अॅप ग्रुप यांच्या माध्यमांतून ही अभ्यासमाला दररोज पोहचवण्यात येते. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीचा झाला असून याबाबत पालकांनी सकारात्मक प्रतिसाद व समाधान व्यक्त केले आहे.
    लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरीही ते SCERT पुणे मार्फत तयार करण्यात आलेल्या दिक्षा अॅप ऑनलाईन अभ्यासमाला व पूर्वप्राथमिक / बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दररोज सकाळी १०.०० वाजता 'गली गली,सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जात आहे.
   या माध्यमातून विद्यार्थी शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी होत आहेत.दैनंदिन 'झूम' मिटिंगच्या माध्यमातून देखिल शिक्षण विभाग व डाएट मधील सर्व अधिकारी , शिक्षक स्वत: गुणवत्ता विकासात सक्रिय राहून कार्य करीत आहेत. तसेच सर्व विद्यार्थी ,पालक, शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करित आहेत.
  '' सांगली जिल्ह्यातील सर्व अधिकारी ,शिक्षक,पालक व विद्यार्थी सहजगतीने ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करुन Study form home हा उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत याबद्दल सर्वांचे अभिनंदन व आभार.''

  - डॉ.आर.ए.होसकोटी,
   प्राचार्य,डाएट सांगली.