twitter
rss

[5/20, 12:59 PM] Deepak Mali: 🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🎯 रात्रशाळा शिक्षकांना दिलासा*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/good-news-for-nighht-school-teachers/articleshow/58740385.cms


♻‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पेपरफुटी रोखण्यासाठी समितीची स्थापना*

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: May 20, 2017

_*सरकारकडून आठ सदस्यीय समिती; दोन महिन्यात अहवाल सादर करण्याची सूचना*_

‘व्हॉट्सअ‍ॅप’वरील पेपरच्या ‘व्हायरलची साथ’ कशी रोखायची हा प्रश्न सरकारला सातत्याने भेडसावत होता. यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने आठ जणांची समिती स्थापन केली आहे. ‘व्हॉटसअ‍ॅप व्हायरल’सोबतच परीक्षेदरम्यान गरप्रकार रोखण्यासाठी कशा प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येतील याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांवर या समितीची जबाबदारी देण्यात आली असून दोन महिन्यांत समितीला अहवाल सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेदरम्यान होणारा गरप्रकार थांबविण्यासाठी आणि कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी गरमार्गाशी लढा हा उपक्रम सुरू केला. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान पेपर व्हायरल होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आले आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी मंडळाने अनेक प्रयत्न सुरू केले असून त्याच पाश्र्वभूमीवर ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या आठ जणांच्या समितीत शिक्षण आयुक्तांसह नवी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी, शिक्षण संचालक, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, मंडळाचे अध्यक्ष, सीबीएसईचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती पेपर व्हॉटसअ‍ॅपवर व्हायरल होत असल्या प्रकरणाची कारणे, परीक्षा नियोजनातील त्रुटी, करावयाच्या उपाययोजना, अशा स्वरूपाच्या घटना घडू नयेत तसेच परीक्षेदरम्यान कॉपी रोखण्यासाठी आवश्यक नियमांवर विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक शिक्षक मुख्याध्यापकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्य सरकारने स्थापन केलेल्या या समितीचे स्वागत आहे. मात्र हे काम आणखी उत्तम व योग्य करण्याकरिता प्रत्यक्ष परीक्षेचे काम पाहणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी यांनादेखील समितीत स्थान देणे अपेक्षित होते. त्यांची मते व अनुभव समितीला उपाययोजना सुचविण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील, असे मत मुंबई मुख्याध्यापक संघ महामंडळाचे सचिव प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

⚙मुक्त विद्यापीठात आता व्यावसायिक अभ्यासक्रम*

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जोडीला आता व्यावसायिक अभ्यासक्रमदेखील शिकविले जाऊ लागले आहे. आगामी शैक्षणिक वर्षात डिप्लोमा इन इसेन्शियल स्कील्स (डीएसई) या तांत्रिक अभ्यासक्रमाला सुरुवात केली जात आहे. कौशल्य विकासाच्या दृष्टीने उपयोगी ठरणार्‍या या अभ्यासक्रमास दहावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

मुक्त विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थी आकर्षित होत नाहीत. यामुळे विद्यापीठाने व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुरुवात केली आहे. चालू शैक्षणिक वर्षात सुरू होणारा डीएसई हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना पुढील वर्षापासून डिप्लोमा इन बिझनेस स्कील (डीबीएस) व डिप्लोमा इन इंडस्ट्रियल स्कील (डीआयएस) या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविता येणार आहे. उद्योग व व्यवसायाशी निगडीत कौशल्य विद्यार्थ्यांना देणो हा अभ्यासक्रमाचा उद्देश असेल. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वयंरोजगार मिळवू शकतील किंवा नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमात थेअरी ऑनलाइन, मोबाइल किंवा डिस्टंन्स मोडद्वारे शिकविली जाणार आहे.

अठरा वर्ष पूर्ण झालेले व दहावी किंवा समक्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतील, तर डिप्लोमा इन बिझनेस स्कील्स किंवा डिप्लोमा इन इंडस्ट्रियल स्कील या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी डिप्लोमा इन इसेन्शियल स्कील हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करावा लागणार आहे, तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रत्येक सत्रातील ऑन जॉब ट्रेनिंगकरिता ७५ टक्के हजेरी बंधनकारक असेल. कमवा व शिका योजनादेखील लागू आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎋४५ कोटींची शिष्यवृत्ती पडून*

Updated May 19, 2017

म. टा. विशेष प्रतिनिधी,नागपूर

देशभर कॅशलेस व्यवहार होत असताना तब्बल १४६ संस्थांनी विद्यापीठ अनुदान आयोगाने वारंवार विनंती करूनही पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट स्कीममध्ये नोंदणी केलेली नाही. त्यामुळे तब्बल ४५ कोटी १४ लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती व अनुदाने आयोगाने दिलेली नाहीत. त्यात महाराष्ट्रातील पुणे आणि नांदेड विद्यापीठांचाही समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने २०१५ मध्ये देशभरातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि अनुदान परतावा देण्यासाठी पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट स्कीम अंतर्गत नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट शिष्यवृत्ती वळती करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार अनेक विद्यापीठे आणि कॉलेजेसने या पीएफएमएस मध्ये नोंदणी केली होती. तसेच विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्ती व अनुदानांबाबतचा थेट लाभही घेतला. मात्र, सीमारे १४६ विद्यापीठे व कॉलेजेसने त्यात नोंदणी केली नाही.

त्यामुळे गेल्या वर्षी विद्यापीठ अनुदान आयोगाने पुन्हा या संस्थांना पीएफएमएसमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही १४६ विद्यापीठे व कॉलेजेस त्यात सहभागी झालेली नाहीत. परिणामी विद्यापीठ अनुदान आयोगाने आता प्रत्येक विद्यापीठ व कॉलेजनिहाय किती विद्यार्थ्यांच्या शिष्यवत्ती व अनुदाने

प्रलंबित आहेत,त्याची यादीच जाहिर केली. त्यानुसार तब्बल ४५ कोटी १४ लाख ८० हजार रूपयांचा निधी आयोगाकडे पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देखील पीएफएमएसमध्ये नोंदणी केलेली नाही.

परिणामी नांदेड विद्यापीठाचे तब्बल ३१ लाख ४ हजार आणि पुणे विद्यापीठाचे ३ कोटी ७९ लाख १५ हजार रुपये आयोगाकडे थकीत असल्याचे स्पष्ट होते. त्या विद्यापीठांना आता पीएफएमएसमध्ये तातडीने नोंदणी करून अनुदाने व शिष्यवृत्ती याचा परतावा तातडीने घ्यावा, असे आवाहन आयोगाने केले आहे.

पुणे, नांदेड नोंदणीत मागे
विद्यापीठ अनुदान आयोगाने शिष्यवृत्ती व फेलोशिप प्राप्त करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे खाते या पीएफएमएसशी लिंक करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार राज्यातील सर्वच विद्यापीठांनी आता डिजिटल पद्धतीचा अवलंब केला आहे. पुणे व नांदेड विद्यापीठाची अनुदानाची रक्कम पीएफएमएसमध्ये नोंदणी न केल्याने देण्यात आलेली नाही, असे यूजीसीच्या परिपत्राकातून स्पष्ट होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

*🎞 शिक्षण पध्‍दतीवर भाष्‍य करणारा 'हिंदी मीडियम'*

By pudhari | Publish Date: May 19 2017 12:31PM

*इंग्‍लिश भाषा येणे गरजेचे असली तरी कोणतीही भाषा माणसाची श्रेष्‍ठता सिध्‍द करु शकत नाही. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर खुलून भाष्‍य करतो.*

पुढारी ऑनलाईन : 

बॉलीवूड अभिनेता इरफान खानचा 'हिंदी मीडियम' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर भाष्‍य करणारा आहे. शिक्षण पध्‍दतीतील गोंधळाचे मार्मिक चित्रण 'हिंदी मीडियम'मध्‍ये दाखवण्‍यात आले आहे.

या चित्रपटातील खास बाब म्‍हणजे, प्रत्‍येक आई-वडिलाला आपल्‍या मुलाच्‍या शिक्षणासाठी झगडावे लागते. चांगल्‍या शाळेत प्रवेश मिळण्‍यासाठी आटापिटा करावा लागतो. या गंभीर विषयाचे मार्मिक चित्रण दाखवण्‍यात आले आहे. हसत-हसत कथेचे मर्म प्रेक्षकांना लक्षात येण्‍यासारखा आहे.

इरफान सोबत अभिनेत्री सबा कमरही मुख्‍य भूमिकेत आहे. याशिवाय, अमृता सिंह, दीपक डोबरियाल, तिलोतिमा शोम या कलाकारांच्‍याही चांगल्‍या भूमिका आहेत. तिलोतिमा शोमने यापुर्वी 'किस्‍सा' या चित्रपटात इरफानसोबत अभिनय केला आहे. या चित्रपटात तिने एज्‍युकेशन काउंन्सलरची भूमिका चांगल्‍या पध्‍दतीने पार पाडली आहे.  

इरफान खान आणि सबा हे दोघे पालकांच्‍या भूमिकेत आहेत. आपल्‍या मुलीला चांगल्‍या इंग्‍लिश मीडियम शाळेत प्रवेश मिळावा म्‍हणून प्रयत्‍न करत आहेत.  या मूळ विषयाशिवाय चित्रपटातून अनेक संदेश मिळतात. तसेच शाळेत चालणार्‍या श्रीमंत-गरीब भेदभावाच्‍या राजकारणावरही प्रकाश टाकतो. इंग्‍लिश भाषा येणे गरजेचे असली तरी कोणतीही भाषा माणसाची श्रेष्‍ठता सिध्‍द करु शकत नाही, असा संदेश यातून देण्‍यात आला आहे. 

. हा चित्रपट शिक्षण पध्‍दतीवर खुलून भाष्‍य करतो. 

'हिंदी मीडियम' या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून मनोरंजनासोबत चांगला संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃