🌳कमवा व शिका’ योजनेचे प्रवर्तक*
By pudhari | Publish Date: May 8 2017
सांगली :
कर्मवीरअण्णांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज (जि. कोल्हापूर) येथे झाला. त्यांचे शिक्षण विटा, कोल्हापूर येथे झाले. भाऊरावांनी पुढे गोर- गरिबांच्या मुलांसाठी मोफ त शिक्षण देऊन क्रांतिकारक काम केले. गरीब मुलां- मुलींसाठी त्यांनी बोर्डिंग सुरू केले. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या असहकार आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. तेव्हापासून ते खादी वापरू लागले.
सन 1919 मध्ये त्यांनी काले येथे वसतिगृह सुरू करून रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सन 1929 मध्ये नेर्ले येथे विद्यालय आणि सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डींग सुरू केले. या बोर्डिंगला महात्मा गांधींनी भेट देत आर्थिक मदतही केली होती.
अण्णांनी धनिणीची बाग येथे वसतिगृह सुरू केले. तेथील मोठ्या वडाच्या झाडाखाली ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. तेच झाड रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह झाले. ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, म. ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांना गुरूस्थानी मानत होते.
सातार्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी हमीद अली यांच्या मदतीने त्यांनी सातारा येथे दहा एकर जागेत सध्याचे रयत शिक्षण संस्थेचे कार्यालय बांधले. पुढे त्यांचा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी स्नेह झाला. त्यांनी भवानीनगर येथे क्रांतिसिंह नाना पाटील हे हायस्कूल सुरू केले. संत गाडगे महाराज यांच्या स्मरणार्थ कराड येथे सन 1954 मध्ये सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय सुरू केले.जनतेतून पैसा गोळा करून गावो गावी वसतिगृहे बांधली व शिक्षणाचा प्रसार केला.
त्यांनी शिक्षणाची गंगा बहुजन समाजापर्यंत पोहोचवली. महाराष्ट्राला सुशिक्षित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. रयत शिक्षण संस्थेत शिकलेले अनेकजण मोठ्या पदांवर पोहोचले. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शंकरराव खरात, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी. जी. पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव भोसले हे सर्व रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी.
अण्णांना रयतेने कर्मवीर ही पदवी दिली. भारत सरकारने पद्मभूषण ही पदवी दिली. पुणे विद्यापीठाच्यावतीने त्यांना डी. लिट ही पदवी ससून हॉस्पिटल मध्ये जाऊन दिली. शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची ज्ञानगंगा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविली.
श्रम व स्वावलंबन याला अण्णांनी शिक्षणात महत्व दिले होते.
✒-प्रा. जी. एन. हंचे, सांगली
🍝🌮शाळांमध्ये जंकफूड बंदी*
By pudhari | Publish Date: May 9 2017
मुंबई : पुढारी वृत्तसेवा
लठ्ठपणाची समस्या जगभर भेडसावत आहे. विशेषत: शाळकरी मुलांमध्येही दिवसेंदिवस लठ्ठपणाचे प्रमाण वाढत आहे. त्याची गंभीर दखल सरकारने घेतली आहे. यापुढे शाळेच्या कँटीनमध्ये खनिजांची कमतरता असणार्या व मीठ, साखर तसेच मेदाचे प्रमाण जास्त असणार्या पदार्थांच्या विक्रीवर एवढेच नव्हे तर असे पदार्थ ठेवण्यावरही सरकारने बंदी घातली आहे.
केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाने यासंदर्भात हैद्राबादच्या राष्ट्रीय पोषण आहार संस्थेच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट नेमला होता. या कार्यगटाने विद्यार्थ्यांच्या आहारातील पोषणमूल्यात सुधारणा करून या विद्यार्थ्यांचा चांगल्या पध्दतीने शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यानुसार शाळेच्या कँटीनमध्ये कोणते पदार्थ ठेवावेत व कोणते पदार्थ ठेवू नयेत यासंबंधी महत्वपूर्ण शिफारस केली आहे. यानुसार शाळेच्या कँटीनमध्ये जंक फूड( एच एफ एस एस म्हणजेच हाय इन फॅट, सॉल्ट अँड शुगर) विकण्यास व ते ठेवण्यासही बंदी घालण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार राज्य सरकारने आदेश काढून हे पदार्थ ठेवण्यास व विकण्यास शाळेतील कँटीनना बंदी घातली आहे.
लठ्ठपणाच्या समस्येला तोंड देताना नाकी नऊ येतील अशी परिस्थीती आहे. विशेषत: शाळकरी मुलांमधील वाढता लठ्ठपणा व त्यामुळे होणार्या परिणामांमुळे पालकांची काळजी वाढते आहे. तर यावरील उपचार व सल्ल्यासाठी वेळ व पैसा दोन्ही खर्च करावे लागत आहे.त्यामुळे यापुढे ज्या पदार्थात साखर, मीठ व मेदाचा जास्त प्रमाणात समावेश आहे व ज्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे असे पदार्थ शाळेच्या कँटीनमध्ये ठेवता येणार नाहीत. असे पदार्थ हे विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणा वाढवत असुन अन्य आजारांचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्यां शैक्षणिक कार्यक्षमतेवर होत आहे. त्यामुळेच शरीराला हानीकारक असलेल्या पदार्थांऐवजी अन्य पोषक आहाराचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ ठेवण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. शाळेच्या कँटीनमध्ये कोणते पदार्थ ठेवायच व कोणते पदार्थ ठेवायचे नाहीत याची यादीही सरकारने जारी केली आहे. केवळ बंदी आदेश काढण्यापुरतेच नाही तर यासंदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यात याबाबत जागृती करावी व समुपदेशन करावे. त्यासाठी आहारतज्ञांची मदत घेण्यात यावी असेही सरकारने आदेशात म्हंटले आहे.
_*उशिरा पण अत्यावश्यक पाउल : डॉ जयश्री तोडकर*_
सरकारने उशिरा हे पाऊल उचलले असले तरी ते अत्यावश्यक असल्याचे बॅरिअॅट्रीक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी पुढारी शी बोलताना सांगितले. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. खाण्यापिण्याच्या सवयी मुलांना लठ्ठपणाकडे घेऊन जात असल्याचे सांगुन त्या म्हणाल्या की, जीवनपध्दतीतही झपाट्याने होणारे बदल याला कारणीभूत आहेत. मुलांचे मैदानावरील खेळण्याचे प्रमाण घटते आहे. तर बर्याचवेळा पालकही मुलांना खेळायला जाण्यास प्रतिबंध करतात त्याचाही लठ्ठपणा वाढण्यात परिणाम होतो आहे. विद्यार्थ्यांचे स्क्रिन टायमिंगही वाढत आहे. जसे की मोबाईल, टि व्ही , काँप्युटर वर जाणारा वेळ वाढत आहे.
*जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा*
भारतातील विशेषत: विद्याथ्यार्र्ंतील लठ्ठपणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दहा वर्षापूर्वीच इषारा दिला होता. मात्र सरकारने त्याची आता दखल घेतली आहे.याबाबत कठोर उपाययोजना केल्या नाहीत तर हा धोका जीवावरही बेतु शकतो असेही त्यांनी म्हंटले होते.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃
🎯भौतिकशास्त्रने आणला भितीचा गोळा*
By pudhari
मुंबई : प्रतिनिधी
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनतर्फे (सीबीएसई) वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा मुंबईत सुरळीत पार पडली. मात्र अनेकांना भौतिकशास्त्र या विषयातील अवघड प्रश्नांनी भितीचा गोळा आणला. तर जीवशास्त्रातातील काही प्रश्न अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.
देशभरात 56 हजार वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा आहेत. या जागांवर नीट च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने यंदा देशभरासाठी एकाच वेळी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यंदाच्या परीक्षेसाठी सीबीएसईने विद्यार्थ्यांसाठी कडक आचारसंहिता लागू केल्यामुळे ऐन परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागला. गेल्यावर्षीचा अनुभव लक्षात घेता पालकांनी सकाळी लवकर परीक्षा केंद्रावर हजेरी लावल्याने यंदा फारशा तक्रारी आल्या नाहीत. मात्र काहीकेंद्रांवर पाच मिनिटे उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला नसल्याच्या तक्रारी आहेत.
देशभरात नीट परीक्षेसाठी 11 लाख 5 हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी होती. 9.30 नंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असे कडक आदेश सीबीएसई मंडळाने दिल्याने अनेकजण साडेसात वाजताच केंद्रावर दाखल झाले होते. परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी ए आणि बी असे दोन गट करण्यात आले होते. ए गटातील विद्यार्थ्यांना 7.30 ते 8.30 या वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला तर बी गटातील विद्यार्थ्यांना 8.30 ते 9.30 या वेळेत प्रवेश देण्यात आला.
नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थीनींना त्यांचे स्कार्फ, बेल्ट आणि दागिनेही काढून ठेवण्यास सांगण्यात आल्याचे पालकांनी सांगितले. अनेक ठिकाणी विद्यार्थीनींना हेअर बेल्ट, कमरेचा बेल्ट, स्कार्फ, हेअर पीनसुद्धा लावण्यास मनाई करण्यात आली. सेफ्टी पीनसुद्धा सोबत ठेवायची नाही असे सांगण्यात आल्याने केंद्रावर तारांबळ उडाली होती. सॅण्डल, बूटाऐवजी स्लीपर घालाव्यात अशा सूचना अगोदरच केल्याने ही काळजी अनेक विद्यार्थ्यांनी घेतली होती. मात्र काही ठिकाणी काही विद्यार्थी उशिरा आल्यानेही परीक्षा केंद्रात घेतले नाही अशा एक दोन जणांच्या तक्रारी आल्या आहेत.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎋अभिजित राऊत सांगली झेडपीचे नवे ‘सीईओ’*
By pudhari | Publish Date: May 9 2017
सांगली : प्रतिनिधी
नंदूरबारचे सहायक जिल्हाधिकारी अभिजित राजेंद्र राऊत यांची सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती झाली आहे. राऊत हे सन 2013 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे ‘आयएएस’ अधिकारी आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री घरकुल, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते यावर फोकस राहील, असे राऊत यांनी सांगितले.
राऊत हे मूळचे मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठातून बायोटेक्नॉलॉजी पदवी घेतली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) रूरकी येथे त्यांनी बायोटेक्नॉलॉजीमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
ते सन 2013 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. ट्रेनिंग कालावधीत त्यांनी आष्टा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, आटपाडीचे गटविकास अधिकारी म्हणून दीड महिने तसेच विट्याचे तहसीलदार म्हणून काही दिवस तसेच सांगली जिल्हा परिषदेत 15 दिवस प्रोबेशनरी म्हणून काम केले आहे. नंदूरबारचे सहायक जिल्हाधिकारी आणि तळोद्याचे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आयएएस प्रोबेशन कालावधीत कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची आता सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.
*आधी लगीन झेडपीचं; पदभार घेतल्यानंतर लग्न!*
राऊत यांचे मंगळवारी (दि. 16 मे) अमरावती येथे लग्न आहे. गुरूवारी (दि. 18 मे) बुलढाणा येथे लग्नाचा स्वागत समारंभ आहे. त्यामुळे राऊत हे लग्नापूर्वी रूजू होणार की लग्नानंतर; याबाबत उत्सुकता होती. त्याबाबत दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगली जिल्हा परिषदेत उद्या अथवा परवा रूजू होईन. ‘आधी लगीन झेडपीचं’, असेही ते उद्गारले.
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणत्या विषयांना प्राधान्य राहिल या प्रश्नावर अभिजीत राऊत म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल, जलयुक्त शिवार अभियान, स्वच्छ भारत मिशन हे महत्वाकांक्षी कार्यक्रम राहतील. ग्रामीण विकासाच्यादृष्टीने रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण यावरही विशेष फोकस राहील. जिल्हा परिषदेच्या सेवा जनतेला अधिक चांगल्याप्रकारे कशा मिळतील याकडे लक्ष राहील. *डिजीटल शाळा, ई-लनिर्ंंग महत्वाचे आहे. पण त्याचबरोबर या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक अधिक चांगले असले पाहिजेत, असेही राऊत यांनी सांगितले.*
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
♻शिक्षकांच्या २२ मेपासून बदल्या*
सकाळ वृत्तसेवा
05.09 AM
*ऑनलाइन प्रस्ताव भरणे सुरू; सर्व्हर डाउन होत असल्याने मानसिक त्रास*
सातारा - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेला २२ मे पासून सुरवात होणार असून, त्यात आंतरजिल्हा बदलीसह प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीने माहिती भरण्यास सुरवात केली आहे. मात्र, सातत्याने सर्व्हर डाऊन होणे, माहिती अपलोड न होण्याचे प्रमाण वाढले असल्याने माहिती भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभागाकडून दर वर्षी समायोजनाने शिक्षक बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत होती. या वर्षापासून ग्रामविकास विभागाने या प्रक्रियेत बदल केला आहे. त्यात प्रामुख्याने अवघड क्षेत्राची माहिती मागवून त्यानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. संपूर्ण बदली प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. बदलीस पात्र, तसेच विनंती बदलीसाठी शिक्षकांनी माहिती ‘स्टॉफ पोर्टल’वर ऑनलाइन भरावयाची असून, त्यानुसार प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही बदली प्रक्रिया २२ मेपासून सुरू होणार आहे. प्रामुख्याने यंदापासून चार संवर्गानुसार बदल्या करण्यात येणार आहेत. यात दुर्गम (अवघड) क्षेत्राकरिता बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक, विशेष संवर्ग भाग एक आणि भाग दोन, तसेच ज्यांना एका ठिकाणी दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत; अशा बदलीस पात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
शिक्षक बदली प्रक्रियेसाठी आंतरजिल्हा बदलीकरिता इच्छुक शिक्षकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन माहिती आठ मे या दरम्यान सादर करावयाची होती. मात्र, सर्व्हेर डाऊन होणे, ऑनलाइन माहिती अपलोड करण्यास अनेक अडचणी येत असल्याने अद्यापही सर्वांनी माहिती भरली गेली नाही. त्यामुळे त्यास *मुदतवाढ मिळण्याची शक्यता शिक्षण विभागातून व्यक्त करण्यात आली.
*उन्हाळी सुटीला मिळाली ‘सुट्टी’!*
ऑनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू असल्याने शिक्षकांना उन्हाळी सुटीचा आनंद घेणेही दुरापास्त झाले आहे. सुट्टीच्या दिवशी तास न् तास ऑनलाइन माहिती भरावी लागत आहे. त्याशिवाय, माहिती अपलोड होत नसल्याने, सर्व्हरच्या समस्या असल्याने मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. ही प्रक्रिया कशी पार पडणार, याबाबतही शिक्षकांतून साशंकता व्यक्त होत आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃