twitter
rss

🇬 🇺 🇷 🇺 🇻 🇦 🇷 🇾 🇦

🇳 🇪 🇼 🇸

🌞वार - मंगळवार

🌄 दिनांक - 16/05/2017

🎯 *आजच्या शैक्षणिक बातम्या* 🎯

-----------------------------------------------
_*साभार -Online पुढारी,लोकसत्ता,लोकमत,म.टा.,सकाळ .*_

-----------------------------------------------

_*संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

-----------------------------------------------
'

दररोज नियमित शैक्षणिक बातम्या वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

*🎯 दरवर्षी हवी १३% फी वाढ*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/siscoms-recomendation-regarding-fee-hike-in-schools/articleshow/58688120.cms

*🎯 फी वाढीचा प्रश्न आता नियंत्रण समितीपुढे*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/fee-hike-issue-will-be-considerd-by-fee-controll-committee/articleshow/58688046.cms

*🎯 नको समर क्मँप , हवा स्वत:चा वेळ*

http://m.image.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/neither-summer-camp-should-be-your-own-time/articleshow/58687372.cms

🎯 *शुल्क नियंत्रण कायद्यात सुधारणा करणार: शिक्षणमंत्री*

Updated May 15, 2017

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

विद्यमान शुल्क नियंत्रण कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल तसेच कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करु देणार नसल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

शिक्षण संस्थांमध्ये नफेखोरी झाल्याचे आढळून आल्यास अशा शाळा व शिक्षण संस्थांना वटणीवर आणण्यात येणार असल्याचा इशाराही तावडे यांनी दिला. सीबीएसई आणि आयसीएसई मधील कोणत्याही शाळांना पुस्तके त्याच शाळेतूनच घेण्याची सक्ती करता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यामधील १८ शाळांपैकी आज सहा शाळांची सुनावणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या सुनावणी प्रसंगी शाळांमधील पालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चार पालक, संस्थाचालक, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शाळांमधील फी वाढीसंदर्भातील मुद्दे पालकांनी उपस्थित केले, तर संस्थाचालकांनी त्या संदर्भात आपल्या अडचणी व बाजू या बैठकीत मांडली. शाळांमध्ये पालकांचे प्रतिनिधीत्व करणारी पॅरेटन्स टिचर असोसिएशन (पीटीए)च्या उपस्थित व त्यांच्या अनुमतीने संबंधित शाळांमध्ये जी फी वाढ करण्यात आली त्या शाळांचे व्हिडीओ रेकॉर्डींग दोन दिवसात सादर करण्याचे आदेश शिक्षणमंत्री तावडे यांनी संबंधित शाळांना दिले.

त्याशिवाय, शाळांमध्ये स्थापन होणारी पीटीए कोणत्या पध्दतीने स्थापन होते आणि यामध्ये सदस्यांची निवड कशाप्रकारे होते याची प्रक्रिया सर्व शाळांनी काटेकोरपणे अवलंब करावी, तसेच या सर्व प्रक्रियेचे नियमानुसार व्हिडीओ रेकॉर्डीग करावे जेणेकरुन भविष्यात या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यात येईल, अशा आशयाचे पत्रक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने लवकरच काढण्यात येणार असल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज विबग्योर स्कूल, इंदिरा नॅशनल स्कूल, युरो स्कूल, सिंहगड स्प्रिंगडल स्कूल, महर्षि कर्वे शिक्षण संस्था, इमॅन्युअल मारथेामा इंग्लिश मिडीयम स्कूल या सहा शाळांची सुनावणी पार पडली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भातील याचिकेवर १९ मे रोजी सुनावणी*

औरंगाबाद / प्रतिनिधी

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांप्रकरणात आता १९ मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने बदल्यांचे नवे धोरण सोमवारी (दि.१५) जाहीर केले. त्यानुसार यापुढे शिक्षकांच्या अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांतील शाळांतच बदल्या होणार आहेत.

जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करताना २७ फेब्रुवारी २0१७ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयात अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्राची निवड करण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. बदल्यांच्या एकूणच धोरणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने हायकोर्टात आव्हान दिले आहे. समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप रमाकांत ढाकणे यांनी अँड़ एस. जी. मुंडे यांच्यावतीने खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

*शिक्षक भारतीचीही याचिका*

दरम्यान, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनीही २७ फेब्रुवारी रोजीच्या परिपत्रकाला खंडपीठात आव्हान दिले आहे. अँड़ दीपक राजपूत यांनी याचिकेत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिलेल्या अवघड व सोपे क्षेत्र निवडीचे अधिकार चुकीचे असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला. तसेच पती-पत्नी एकत्रीकरण, जिल्हा बदली, सेवा ज्येष्ठता, शाळा व तालुक्याची उपस्थिती, महिला शिक्षकांवर होणारा अन्याय व समुपदेशन याबाबतीत संदिग्धता असल्याचे म्हणणे याचिकेत मांडण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃