twitter
rss

🎯 _*डिहायड्रेशन आणि घ्यावयाची काळजी*_ 🎯

यंदा उन्हाळ्याची चाहुल लवकरच लागली असून या दिवसात अनेकजण डिहायड्रेशनचे बळी पडतात. फ्लूइड अथवा लिक्विडची कमतरता निर्माण झाल्यास शरीराचे इलेक्ट्रोलाइट बॅलेंस बिघडते यास ‘डिहायड्रेशन’ असे म्हणतात. थोडक्यात शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. हे शारीरिकदृष्ट्या हानिकारक असते म्हणून डिहायड्रेशनची काय लक्षणे आहेत व त्यापासून कशी काळजी घ्यावी त्याविषयी जाणून घेऊयात...

🎯 _*डिहायड्रेशन म्हणजे काय?*_

जेव्हा व्यक्तीच्या शरीरातील पाणी किंवा तरल पदार्थांचे प्रमाण शरीरातून उत्सजिर्त होणार्‍या पाण्यापेक्षा कमी होते तेव्हा शरीराची कार्यप्रणाली कोलमडते. यालाच ‘डिहायड्रेशन’ म्हणतात. अशावेळी पीडित व्यक्तीचे तोंड वाळणे, जास्त थकवा येणे, चक्कर येणे, अंग गळाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात. शरीरातील पेशी, रक्तवाहिन्या आणि अंतर्गत अवयवांना पाण्याची गरज असते .

🎯 _*डिहायड्रेशन पासून वाचण्यासाठी काय कराल?*_

👉 ग्रीन टी आणि कोल्ड कॉफी घ्या.

👉 हलकं फुलकं जेवण घ्या.

👉 टरबूज, खरबूज, काकडी अशी सिझनल फळं खा.

👉 पाणीदार खाद्य पदार्थ घ्या.

👉 भोजनादरम्यान मोठा गॅप असू नये.

👉 अपचणाचा त्रास जाणवत असल्यास लिंबू पाणी आणि पुदीना पाणी प्या.

👉 जेवढं जास्त पाणी पिता येईल तेवढं प्या.

👉 बाजारातील पेयपदार्थांऐवजी दही, ताक, लस्सी, नारळ पाणी अशा पदार्थांना प्राधान्य द्या.

👉 तुम्ही उन्हात जाताना गॉगल घालून बाहेर पडा.

🎯 _*कोणत्या गोष्टी टाळाल*_

👉 तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा.

👉 गरम फळं उदा. चेरी, पेरू, आंबे अशी फळं प्रमाणात खा.

👉 चहा आणि गरम कॉफीपासून दूर राहा.

👉 शक्यतो उन्हाळ्यात ड्रायफ्रूटस टाळा.

👉 उन्हाळ्याच्या काळात अतिप्रमाणात श्रम करणे त्रासदायक ठरू शकते.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍