twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣6⃣2⃣

*प्रेरणादायी : आईसोबत बांगड्या विकणारा परिस्थितीशी झगडून झाला आयएएस*

_*शेतात काम करणारी त्यांची आई बांगड्या विकण्याचा व्यवसाय करत असे.*_

साभार ~ लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 18, 2017

*रमेश घोलप*

जर तुमचा निश्चय पक्का असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचण्यापासून अडवू शकत नाही. असंच काहीसं झारखंडच्या सरायकेला खरसावांचे उपायुक्त रमेश घोलप यांच्या बाबतीत झालं. ज्यांचे बालपण एक-दोन रुपयांच्या याचनेत गेले, ते आज देशातील प्रतिष्ठेची समजली जाणारी लोकसेवा आयोगाची परीक्षा पास करून भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून रुजू झालेत. रमेश घोलप २०१२ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असून, सरायकेला जिल्ह्याचे उपायुक्त आहेत. याआधी ते खुंटीमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत होते. आपल्या कार्यकुशलतेने रमेश यांनी प्रत्येक ठिकाणी आपली एक अविट छाप सोडली. रमेश केवळ मनमिळावू अधिकारी नसून, लोकांचे दुःख जाणून घेऊन ते दूर करण्यासाठी प्रयत्नदेखील करतात, असे लोकं म्हणतात. त्यामुळेच लोकांमध्ये ते पेन्शन मिळवून देणारे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत.

   रमेश यांचे आयुष्य अतिशय दारिद्र्यात गेले. त्यांचे वडील गोरख घोलप यांचे सायकलचे दुकान होते. दारूचे प्रचंड व्यसन असलेल्या त्यांच्या वडिलांची सर्व कमाई दारू पिण्यातच वाया जाई. वडिलांच्या अशा वागण्याने चार जणांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची आई विमल घोलप यांनी पेलली. गरिबी आणि योग्य उपचार करण्याच्या क्षमते अभावी व्यसनग्रस्त वडिलांचे काही दिवसांनी निधन झाले. वडिलांच्या पश्चात आईने काबाडकष्ट करून दोन मुलांचे पालनपोषण आणि शिक्षण केले. परिस्थितीची जाण असलेले रमेश शारीरिक व्याधी असतानादेखील बालवयात आईला कामात मदत करायचे. शेतात काम करणारी त्यांची आई बांगड्या विकण्याचा व्यवसायदेखील करत असे.
२६ जानेवारी रोजी परेडची सलामी घेताना रमेश घोलप
२००५ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षणाचे महत्व समजून देत आईने रमेशला १२वीच्या परीक्षेला पाठवले. परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाला पर्याय नसल्याचे तिने रमेशच्या बालमनावर बिंबविले. शिक्षकांनीदेखील त्याला समजावून सांगितले. खूप अभ्यास करून रमेशने बारावीच्या परीक्षेत ८८.५ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. नंतर शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली. परंतु, त्यांचे ध्येय निराळेच होते. प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या रमेश यांनी २०१० मध्ये नोकरीतून सहा महिन्यांची सुट्टी घेऊन यूपीएससीची परीक्षा दिली. परंतु, त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. गावातील काही लोकांकडून पैसे जमा करून आईने त्यांना पुन्हा अभ्यासासाठी प्रोत्साहित केले. त्यानंतर पुण्यात राहून त्यांनी खूप अभ्यास केला. २०१२ मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवून त्यांनी २८७ वे स्थान प्राप्त केले.
सध्या ते झारखंडमधील सरायकेला खरसावांमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. वृद्धांना विनासायास पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करणारे अधिकारी म्हणून ते लोकप्रिय आहेत. त्यांच्या या कार्यामागेसुद्धा पूर्वायुष्यातील एक क्लेशकारक आठवण आहे. त्यांची आई वृद्धांसाठी मिळणारे पेन्शन आणायला जायची, तेव्हा तिला अतोनात हाल सहन करावे लागतं. प्रसंगी लाचसुद्धा द्यावी लागे. हे दुःख जवळून अनुभवलेल्या रमेश यांना आईने सोसलेल्या यातनांची जाण आहे. त्यामुळेच लालफितीचा कारभार दूर सारत गरजूंना इंदिरा आवास अथवा अन्य सुविधा प्राप्त करून देण्यासाठी ते स्वत: जातीने मेहनत घेतात.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_