twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣5⃣8⃣

*वीर जवान तुझे सलाम !,*

*९ गोळ्या लागूनही जवानाने मृत्यूला हरवलं*

*सीआरपीएफचे कमांडट...चिता यांनी मृत्यूवरही विजय मिळवलाय. कारण नऊ गोळ्या लागूनही त्यांनी मृत्यूला हरवलंय*

Sachin Salve | Updated On: Apr 5, 2017

05 एप्रिल : 'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक म्हण आहे. सीआरपीएफचे अधिकारी चेतन चिता यांनी अक्षरशः मृत्यूवर मात केलीय. १४ फेब्रुवारीला ९ गोळ्या लागूनही त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं. आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे.


*हे आहेत चेतन चिता....*

सीआरपीएफचे कमांडट...चिता यांनी मृत्यूवरही विजय मिळवलाय. कारण नऊ गोळ्या लागूनही त्यांनी मृत्यूला हरवलंय. त्यांच्या प्रखर देशभक्ती आणि जगण्याच्या दुर्दम्य इच्छेपुढं यमराजही हात हलवत माघारी गेले. 14 फेब्रुवारीला काश्मीरातल्या बांदिपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना चेतन चिता यांना नऊ गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या चिता यांना काश्मिरातून एम्समध्ये हलवण्यात आलं. तिथं त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सुरुवातीला कोमात असणारे चेतन चिता शुद्धीवर आले. आता त्यांची तब्येत सुधारली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. या सगळ्या काळात त्यांच्या पत्नी उमासिंह त्यांच्यासोबत सावलीसारख्य़ा उभ्या होत्या. खंबीर होत्या.

चेतन जसे शत्रूंशी लढले. तसे ते मृत्यूशीही लढले आणि जिंकलेही. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूलाही माघारी पाठवणारा हा जाबाज अधिकारी लवकरच यातून सावरुन देशसेवेसाठी पुन्हा सज्ज होईल यात शंकाच नाही.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_