🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣6⃣3⃣
*दागिने विकून शिक्षिकेने मुलांसाठी बनवली ‘हायफाय क्लासरूम’*
_*शाळेतील मुलांना अन्नपूर्णा इंग्रजी शिकवतात*_
लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 24, 2017
छोट्या छोट्या गावातील शाळा आणि शहरांतील शाळा यांच्यांत टोकाचे अंतर. लहान मुलांच्या गरजा, त्यांची आवड लक्षात घेऊन इथले वर्ग बांधले आणि सजवले जातात. गावात मात्र साऱ्याच अडचणी. इथे अनेकदा मुलांसाठी शाळाच नसतात तिथे आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त वर्ग म्हणजे फक्त ‘कवी कल्पनाच’. पण तामिळनाडूतमधली एक शिक्षिका या सगळ्यांहूनही वेगळी आहे. गावात लहान मुलांसाठी शहरातल्या शाळांसारखे वर्ग असावेत, तिथेही रंगीबेरंगी बाक, मुलांसाठी खेळणी, वाचनासाठी गोष्टींची पुस्तकं, त्यांच्या ज्ञानात भर पाडणारे पझल्स गेम्स असावे असे तिला वाटायचे, पण या सगळ्या गोष्टींसाठी लागणारा खर्च हा न परवडणाराच, सरकारकडून अनुदान मिळेल पण त्यासाठीही आणखी वाट पाहावी लागणार म्हणूनच तामिळनाडूमधल्या अन्नपूर्णा मोहन या शिक्षिकेने आपले दागिने विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून मुलांसाठी अगदी शहरातल्या शाळांसारखा वर्ग बनवून घेतला.
तामिळनाडूतल्या विल्लूपुरम गावात जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेतील मुलांना अन्नपूर्णा इंग्रजी शिकवतात. गावातल्या मुलांना देखील चांगल्या वातावरणात शिकता यावे यासाठी त्यांनी तशाच प्रकारे वर्ग बांधण्याचा हट्ट धरला. यातली एकूण एक गोष्ट मुलांना आवडेल आणि मुलं वर्गात रुळतील अशा प्रकारे बनवण्यात आली आहे. यासाठी लागणारा खर्च जास्त होता तेव्हा अन्नपुर्णा यांनी आपले दागिने विकून खर्चासाठी पैसे दिले. गावातल्या मुलांना इंग्रजी आले पाहिजेच यासाठी त्या आग्रही असतात म्हणूनच तास सुरू झाल्यानंतर संपेपर्यंत त्या इंग्रजीत मुलांशी संवाद साधतात. बालनाट्य रचून त्याचे व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करतात. हे व्हिडिओ पाहून शाळेतले इतर शिक्षकही मुलांना भेटवस्तू पाठवतात. म्हणून मुलांचाही उत्साह अधिक वाढत जातो. फेसबुकवर त्यांच्या या अनोख्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुलांना मिळणारे शिक्षण आणि गावाकडे मुलांना मिळणा-या शिक्षाणातली तफावत अशाच उपक्रमातून दूर करण्याचा प्रयत्न आहे आणि एकदिवस ही तफावत नक्कीच दूर होईल असाही निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_