twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣7⃣9⃣

*थंडे का फंडा*

*_✒ऋजुता दिवेकर, आहारतज्ज्ञ_*

उन्हाळा सुरु झाल्याने थंडाव्यासाठी आता काही ना काही उपाययोजना करणं गरजेचं आहेच. शरीराला थंडावा मिळेल अशा प्रकारचा आहार घेण्याचा आता तुम्ही विचार करत असाल. आपल्या देशातच पूर्वापार चालत आलेले असे काही पदार्थ आहेत जे उन्हाळ्याचा त्रास कमी होण्यास मदत करतील. त्यांची माहिती खालीलप्रमाणे

*दही-*

या दिवसात बद्धकोष्ठता, गॅस आणि ऍसिडिटीचा त्रास होणाऱ्यांसाठी दही खाणं अगदी मस्ट! अर्थात हे दही घरी लावलेलं असावं. दहीभाताचा जेवणात समावेश असणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.

*गुलकंद-*

   गुलाब पाकळ्या, साखर आणि अन्य काही वनौषधींचा वापर करून बनवण्यात येणारे गुलकंद हा उन्हाळ्यातील आणखी एक अप्रतिम पदार्थ! उन्हाळ्याच्या दिवसातही चेहऱ्यावरची तकाकी तशीच ठेवण्याचं काम गुलकंद सहज करू शकतो. सकाळी उठल्यावर एक चमचा अथवा दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणांनंतर अर्धा चमचा गुलकंद खाल्ल्यास या दिवसात फायदेशीर ठरतं.

*सब्जा-*
           अगदी पूर्वीच्या काळापासून भारतातील अनेक घरांमध्ये फालुदा, ताक, खीर अशा पदार्थांमध्ये सब्जा आवर्जून घातला जातो. तत्काळ थंडावा मिळण्यासाठी सब्जा अतिशय गुणकारी आहे. ग्लासभर पाण्यात भिजवलेला सब्जा घालून ते पाणी पिणं वजन घटवण्यासाठीही अतिशय उपयोगी आहे.

*आंबा-*
         खाण्यापूर्वी २० ते ३० मिनिटे आंबा पाण्यात भिजवून ठेवावा. जसा चवीला चांगला तसाच संपूर्ण शरीरयंत्रणेत लगेच सुसूत्रता आणून देण्यासाठीही आंबा मदत करतो. अनेकांना ठाऊक नसलेली आणखी एक गोष्ट अशी, की आंबा वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त आहे.

*नारळ पाणी-*

    सोडिअम आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असलेलं नारळ पाणी त्वचेला तजेलदार ठेवण्यास अतिशय फायद्याचं आहे. सतत येणारे क्रॅम्प्स आणि डिहायड्रेशन यावर नारळ पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय होय.

*जिरे-*
          या मसाल्याच्या पदार्थांमधील घटकाचा, उन्हाळ्यात उपयुक्त ठरणाऱ्या गुणांबद्दल अनेकांना माहीत नसतं. मेद कमी करण्यास मदत करणं, नसांना आराम देणं या गोष्टी जिऱ्याचा सेवनाने साध्य होतात. भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमूटभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला हवा असलेला थंडावा मिळाल्याचं तुम्हाला सहज जाणवेल.

*माठातलं पाणी-*

   एक मातीचा माठ, एक मलमलचं कापड आणि खस-खसचा पाला यापासून तुम्ही थंडावा मिळेल असं पेय तयार करू शकता. मडक्याच्या तळाशी खस-खसचा पाला टाका आणि त्यात पाणी भरून ठेवा. सच्छिद्र माठ आणि खस-खसमुळे शरीराला थंडावा मिळतो.

*काजूगर-*

संत्र्यापेक्षा अधिक प्रमाणात व्हिटॅमिन 'सी' असलेले काजूगर फॅट्स कमी करण्यासाठी फायद्याचं आहे. हे रसाळ फळ उन्हाळ्यात खाणं नक्कीच फायदेशीर आहे

*ज्वारी-*

  शरीराला आवश्यक असलेला थंडावा देण्याची नैसर्गिक क्षमता ज्वारीत आहे. व्हिटॅमिन बी१, लोह आणि फायबर यांचं भरपूर प्रमाण असलेली ज्वारी वजन नियंत्रणास मदत करते. बाजरीच्या भाकरीचा आहारात समावेश केल्यास वजन नियंत्रित राखण्यास नक्कीच मदत होईल.

*कोकम सरबत-*

   तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म असलेलं कोकम लठ्ठपणावर मात करायला मदत करतं. या गुणधर्मांमुळे उन्हाळ्यात उपयुक्त ठरणारं कोकम सरबत, कॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासही मदत करत असल्याने ते आवश्य खावं.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_