twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣6⃣0⃣

*🙋🏻 प्रेझेन्ट मॅडम... प्रेझेन्ट सर...!*

By pudhari | Publish Date: Apr 16 2017

डहाणू ग्रामीण : चंद्रकांत खुताडे

डहाणूच्या ययाती गावड या विद्यार्थिनीने वर्षभरात शाळेला एकही दिवस दांडी न मारता शंभर टक्के हजेरी लावली आहे. तिने राष्ट्रीय विक्रम करून देशात ग्रामीण विभागात पहिली येण्याचा मान मिळविला असून शहरी व ग्रामीण संयुक्त विभागातही ती देशात दुसरी आली आहे.

लहान शाळकरी विद्यार्थ्यांना अनेकदा शाळेला दांडी मारावीशी वाटते. काही मुले  पोटात दुखते, तब्येत बिघडली असा बहाणा करून शाळेला दांडी मारतात. अनेक विद्यार्थी तर शाळेचा कंटाळा, अभ्यासाची गोडी नसणे, गुरुजी-बाईंचा धाक, अपूर्ण गृहपाठ या कारणांनी शाळेत गैरहजर राहतात. परंतु, डहाणूतील चिखले गावातील दहा वर्षीय ययाती शैलेंद्र गावड या विद्यार्थिनीने शंभर टक्के उपस्थिती दर्शवत अनोख्या राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. ती दुसरी ते सहावी या वर्गांत शिक्षण घेत असताना एकही दिवस गैरहजर राहिली नाही. त्याची नोंद इंडियन वर्ल्ड रेकॉर्डस्मध्ये करण्यात आली असून ती राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण विभागात प्रथम व शहरी आणि ग्रामीण संयुक्त विभागात देशात दुसरी आली आहे.ययातीने 2012-13 ते 2016-17 या शैक्षणिक वर्षांत (सतत पाच वर्षे) शंभर टक्के उपस्थित राहून हा विक्रम आपल्या नावावर केल्याने डहाणू तालुक्याचे व पर्यायाने राज्याचे नाव उंचावलेआहे. असा अनोखा विक्रम करणारी ती आपल्या देशातील दुसरी, ग्रामीण भागातून देशातून पहिली व महाराष्ट्र राज्यातून पहिली विद्यार्थिनी ठरली आहे. 2012-13 ते 2014-15 या तीन वर्षांत डहाणू पारनाका येथील न्यू एज्युकेशन ट्रस्ट प्राथमिक शाळा येथे दररोज 16 कि.मी. चा प्रवास खासगी वाहनाने करून तिने शिक्षण घेतले. तसेच 2015-16 ते2016-17 या दोन वर्षांत बोर्डी येथील एस.पी.एच.हायस्कूल येथेरोजचा 16 कि.मी.चा प्रवास एसटीने प्रवास करून तिने हा पराक्रम केला. अभ्यासाबरोबरच खेळ व वक्तृत्व स्पर्धांमध्येही अव्वल असणारी ययाती शाळेत, गावात, मित्र-मैत्रिणी व कुटुंबामध्ये सर्वांची लाडकी आहे. या विक्रमाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

  - http://guruvarykm.blogspot.in/

   या आपल्या Blog ला भेट द्या.....