twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣7⃣7⃣

_*तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे फायदे*_

भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे निर्जंतुक तर होतातच पण आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात असतात.

आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले  पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे  किमान 8  तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.

👉 तांबे शरीरात मेलॅनीन तयार करण्यास मदत करतात म्हणून रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.

👉 हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यावे कारण तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असते.

👉 तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असल्याने चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

👉 तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अ‍ॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अ‍ॅन्टीवायरल असल्याने शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.

👉 तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो.

👉 पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करते. यामुळे तुमचे वजन कंट्रोल मध्ये राहते.

👉 तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहतात व थायरॉईड्च्या आजारापासून आराम मिळतो.

👉 अ‍ॅनिमियाशी सामना करणार्‍यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे कारण तांबे रक्तातील लोह वाढवतात तसेच रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.

👉 विविध अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी सामना करण्याची ताकत असते. म्हणून रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍