🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣5⃣7⃣
*गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकविण्याचा वसा*
By pudhari | Publish Date: Apr 2 2017
पिंपरी : वर्षा कांबळे
गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुले कुवत असूनही पुढे जाऊ शकत नाहीत. ज्या शाळांमध्ये ते शिक्षण घेतात, त्यातून प्रत्येकाचा विकास साधेलच असे नाही आणि शिक्षण फक्त नावापुरतेच घेतले न जाता या मुलांनाही शिकून डॉक्टर, इंजिनिअर होता यावे यासाठी आळंदी येथील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’मार्फत मोफत शिकविण्याचे काम करत आहेत.
अजीज-उर-रहमान यांनी 2014 मध्ये जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्टची स्थापना केली. झोपडपट्टी आणि गोरगरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणासाठी बळ देणे, हा ट्रस्टचा उद्देश आहे. ज्यामुळे ही मुलेही इतर मुलांसारखी इंजिनिअर, डॉक्टर बनतील. पुण्यात आल्यानंतर अजीज-उर-रहमान इंजिनिअरिंगचा अभ्यास करत असताना त्यांनी पाहिले की, त्यांचा एखादा मित्र कोणत्याही विषयात कमजोर असेल, तर त्याचे संपूर्ण वर्षाचे नुकसान होते. रहमान यांची गणितावर चांगली पकड होती. त्यांनी आपल्या ज्या मित्रांचे गणित कच्चे होते त्यांना गणित विषय शिकविण्यास सुरुवात केली. अशी दोन वर्षे शिकवत राहिल्यानंतर त्यांना कळून आले की, ते चांगले शिकवू शकतात. ही गोष्ट महाविद्यालयात शिक्षक आणि प्राचार्यांना समजल्यावर त्यांना महाविद्यालयात शिकविण्याची परवानगी मिळाली. याबरोबरच गणित विषय शिकविण्याचे काम सुरूच ठेवले. त्यांच्या मनात विचार आला की, कामाचा अजून विस्तार करावा.
एक दिवस रहमान शासकीय शाळेत गेले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना आपली इच्छा सांगितली की, शाळेतील मुलांना कॉम्प्युटर शिकवायचा आहे. मुख्याध्यापकांनीही परवानगी दिली; मात्र रहमान यांच्या एकट्याने हे काम होणार नव्हते, मग त्यांनी आपल्या मित्रांची मदत घेतली, ज्यांना त्यांनी यापूर्वी गणित विषय शिकविला होता.
सुरुवातीला त्यांनी पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असणार्या आळंदी गावातील एका शाळेची निवड केली. या ठिकाणी रहमान आणि त्यांची टीम मुलांना गणित, इंग्रजी आणि कॉम्प्युटर शिकवितात. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दर शनिवारी व रविवारी हे क्लास घेतले जातात, मुलांना गृहपाठही दिला जातो.
हळूहळू कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना माहिती झाले की, रहमान ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ चालवित आहे. तेव्हा कॉलेजमधील 48 विद्यार्थी ट्रस्टमध्ये सामील झाले. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना मुलांना शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. याप्रकारे दरवर्षी कॉलेजचे विद्यार्थी ट्रस्टशी जोडले जात आहेत. आज ट्रस्टशी 126 विद्यार्थी जोडले गेले आहेत, जे इंजिनिअरिंग क्षेत्रातील आहेत.
‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ गरीब, अनाथ आणि दिव्यांग मुलांना मोफत कॉम्प्युटर, गणित आणि इंग्रजीचे शिक्षण देत आहे. आळंदी गावातील या कोचिंग क्लासेसमध्ये 40 मुलांकरिता रोज सांयकाळी 5 ते 7 पर्यंत शिकविले जाते. यामध्ये मुलांना शिक्षणात येणार्या समस्या सोडविल्या जातात; तसेच ज्या कारणामुळे मुलांना अर्ध्यातून शिक्षण सोडावे लागते ते शोधून त्यांना पुन्हा शाळेत भरती केले जाते. रहमान यांची इच्छा आहे की, हे काम फक्त आळंदीपुरतेच मर्यादित न राहता दुसर्या शहरांमध्ये देखील वाढावे, जेणेकरून जास्तीत जास्त मुले याचा फायदा घेतील.
टीम ही आठवड्यातून एखाद्या दिवशी दिव्यांग मुले आणि गोरगरीब मुलांना शिकवितात. मुलांना शिकविण्याबरोबरच त्यांच्यातील कौशल्यास प्रोत्साहन देण्याचे कामही करते. यासाठी मुलांचे ग्रुप डिस्कशन, वादविवाद, चर्चा, सामान्य ज्ञान, आणि खेळाचेही प्रशिक्षण दिले जाते.
रहमान यांच्याबरोबर तीन कॉलेजही जोडले गेले आहेत. जास्तीत जास्त तरुण या ट्रस्टशी जोडले जातील, हाच प्रयत्न आहे. कारण हे सर्व एकट्याने होणार नाही. मित्र आणि सदस्यांच्या देगणीवर ट्रस्ट आपला खर्च चालविते; तसेच ज्या विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले आणि कोठे नोकरी करत आहेत, असे विद्यार्थी आपल्या पगारातील 10 टक्के रक्कम ट्रस्टसाठी देतात.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......
- http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या.....