twitter
rss

📚👕🚫'पालकांवर जबरदस्ती करणाऱ्या शाळा बंद करू'*

*📚👕 शालेय साहित्य गणवेश खरेदीची सक्ती कराल ?*

*...तर शाळाच बंद करू!: तावडे*

Updated Apr 22, 2017.

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

विद्यार्थांना शाळेत शिक्षणाची हमी असायला हवी. पुस्तके, गणवेश याच शाळेतून घ्या, असा आग्रह कोणतीच शाळा करू शकत नाही. शालेय साहित्यांची विक्री करणे हे शाळेचे काम नाही. असे प्रकार कोणती शाळा करत असेल तर ताबडतोब बंदची कारवाई करू, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी येथे दिला.

यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयाचा (वायसीसीई) दीक्षांत समारंभ शुक्रवारी पार पडला. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू सिद्धार्थविनायक काणे, शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, आमदार समीर मेघे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

शाळांच्या व्यावसायिकतेवर तावडे यांनी रोष व्यक्त केला. कोणतीच शाळा विद्यार्थ्यांना असा आग्रह करू शकत नाही. शाळांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. शाळांच्या माध्यमातून असे नियमबाह्य काम सुरू असेल तर शाळा बंद करण्याचे आदेशच दिले जातील. अशा तक्रारी नागरिकांनी शासनाकडे दाखल करण्याची गरज आहे, असेही तावडे म्हणाले. काही पालकांनीच शाळांना अशी चुकीची सवय लावली आहे. वस्तूंवर एमआरपी असते, मग तुम्हीच आम्हाला साहित्य पुरवा असा आग्रह काही पालकांकडून करण्यात आल्याने शाळांनी असे प्रकार सुरू केले. मात्र, आता काही पालकांकडून या प्रकाराला विरोध होऊ लागला असल्याचेही तावडे म्हणाले.

*‘तीन महिन्यांत भरू रिक्त पदे’*

शिक्षणक्षेत्रातील रिक्तपदांमुळे होत असलेल्या अडचणी लवकरच आता दूर होणार आहेत. येत्या ३ महिन्यांत रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले.

*‘आधी जागा भरा, नंतरच नवीन कॉलेज’*

आता नवीन कॉलेजला परवानगी दिली जाणार नाही. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा कोटा कोटा न भरणे ही आणखी एक मोठी समस्या आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयासाठी मागण्यात आलेल्या काही परवानग्या रद्द करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.

*आवडीच्या अभ्यासक्रमालाच घ्या प्रवेश*

शासनाकडून शुल्क मिळते म्हणून आवड नसणाऱ्या अभ्यासक्रमालाही प्रवेश घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. त्यामुळे असे विद्यार्थी त्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळवून शकत नाही अशी खंत व्यक्त करत तावडे यांनी विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात जाऊन करिअर करण्याचा सल्ला दिला.
महाविद्यालयात प्रवेश घेतला म्हणून नाही तर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच ही मदत देण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि महाविद्यालयांचे संयुक्त बँकखाते उघडून हा पैसा देण्याचा विचार शासन करीत असल्याचेही तावडे यांनी सांगितले. शिष्यवृत्तीचा गैरवापर नको, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.

*‘यू आर लकी’*

नागपूरला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रूपात डबल इंजिन प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागपुरात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. अशा योग्यवेळी पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी लकी असल्याचे सांगत, आलेल्या संधीचा योग्य लाभ घेण्याचा सल्ला तावडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. केवळ पदवी घेऊन समाधान मानू नका तर नोकरी मिळण्याचा आत्मविश्वास शिक्षणातून मिळायला हवा, अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.

*३२ गुणवंतांचा सन्मान*

वायसीसीईतील ३२ पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच संस्थेतर्फे ९९२ पदवी व २२३ पदव्युत्तर पदवी उपस्थितांच्या हस्ते बहाल करण्यात आल्या. या समारंभात २०१५-१६मधील आकांक्षा त्यागी, पूजा जयस्वाल, अश्वीन शाहू, श्रद्धा कळाळकर या चार गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.

*‘येचुरींना विरोध करणे चुकलेच’*

बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाच्या राष्ट्रीय चर्चासत्राला खासदार सीताराम येचुरी प्रमुख अतिथी म्हणून आल्यास सुव्यवस्था बिघडेल, असे कारण देत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी कार्यक्रमाला स्थगिती दिली होती. यावरून चांगलाच वाद झाला होता. विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षांत सभागृहात होणारे हे व्याख्यान कुलगुरू डॉ. काणे यांनी अचानक रद्द केल्याने येचुरी यांनी नाराजी व्यक्त केली होती. या परिस्थितीमुळे लोकशाहीच धोक्यात आली असल्याचा मुद्दाही येचुरी यांनी उपस्थित केला होता. यावर तावडे यांना विचारले असता, सीताराम येचुरी यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याची गरजच नव्हती असे तावडे म्हणाले. लोकशाही मार्गाने कोणत्याही मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मग तो पंतप्रधानांच्या विरोधात असेल तरी त्याचे स्वागतच झाले पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे इथे वैचारिक मंथन व्हायलाच हवे असे तावडे म्हणाले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎯प्रगत महाराष्ट्राच्या आड मूठभर शिक्षकांची दिरंगाई*

_*राज्यस्तरीय कार्यशाळेत नंदकुमार यांची खंत*_

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: April 22, 2017

पश्चिम महाराष्ट्रातील एक जिल्हा १०० टक्के प्रगत म्हणून जाहीर होणार आहे; परंतु ही प्रगती संपूर्ण महाराष्ट्रात दिसण्यासाठी काही मूठभर शिक्षकांच्या कामातील दिरंगाई आड येत असल्याची खंत शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी व्यक्त केली. शिक्षण संचालक आणि संदीप विद्यापीठ यांच्यातर्फे शुक्रवारी येथे आयोजित प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्यमिक स्तर) राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.
शिक्षकांनी आपली गुणवत्ता सुधारणे व वस्तुस्थितीपूर्वक समस्यांना तोंड देण्यासाठी विद्यार्थी सक्षम करणे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात साधारणत: ६५ टक्के विद्यार्थ्यांपर्यंत मूलभूत शिक्षण पोहोचविणे शिक्षकांना जमले नाही. ‘प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल अॅसेसमेंट’साठी शाळा आणि शिक्षणपद्धती अद्ययावत करण्याची गरज आहे. आपल्या विषयाचे ज्ञानदान करण्यासोबत विद्यार्थ्यांमध्ये माणुसकी रुजविणे हेदेखील शिक्षकांचे आद्यकर्तव्य आहे. आधुनिकीकरण जाणून घेणारा आणि अंगीकृत करणारा विद्यार्थी घडविणे काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक नामदेवराव जरग यांनी प्रास्ताविकात विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगितले. आजचा विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे पडू नये यासाठी शासनाने जो पुढाकार घेतलेला आहे त्याची माहिती त्यांनी दिली. प्राथमिक शिक्षकांना खऱ्या अर्थाने शैक्षणिक स्वातंत्र्य देण्यात आले आहे. यामुळे अनेक होतकरू शिक्षक उदयास आल्याचे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाहावयास मिळाले. गळती शून्य संदेश गावोगावच्या शाळांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी संदीप विद्यापीठाच्या वाटचालीचा आढावा घेतला, तर संस्थेचे प्रमुख डॉ. संदीप कुमार झा यांनी शिक्षक अपयशी ठरला तर त्याचा परिणाम संपूर्ण पिढीला व समाजाला भोगावा लागतो याकडे लक्ष वेधले. परिषदेत सहभागी झालेल्या विज्ञान, गणित व इंग्रजी या विषयांच्या प्रयोगशील शिक्षकांचे संकल्पनिहाय सादरीकरण झाले. तसेच शैक्षणिक उपकरणाचे ३० कक्ष आणि विद्यार्थिदशेत उपयुक्त ठरणाऱ्या पुस्तकांचे कक्ष उभारण्यात आले होते. परिषदेत राज्यातून चार हजार मुख्याध्यापक तसेच इंग्रजी, गणित व विज्ञान शिक्षक उपस्थित होते.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💸राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ*

सकाळ न्यूज नेटवर्क
05.54 AM

मुंबई - राज्यातील सर्व श्रेणीतील सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगातील महागाई भत्त्यात 7 टक्के वाढ करण्याचा निर्णय आज राज्य सरकारतर्फे घेण्यात आला. यामुळे वर्षाला तिजोरीवर साडेतीन हजार कोटींचा भार पडणार आसल्याचे सांगण्यात येते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आसला तरीही राज्यस्तरीय कर्मचाऱ्यांना मात्र आजपर्यत सहाव्या वेतन आयोगाच्या तरतुदीतील महागाई भत्त्याच्या फरकासाठी तिष्ठत राहावे लागत होते.

राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने आज घेतलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्याची 7 टक्के इतकी भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज वित्त विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला. यामुळे राज्यातील 19 लाख कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. ही वाढ 1 जुलै 2016 पासून लागू होणार आहे. यानुसार फरकाची रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

सातारा

👨🏻‍🏫 सहा हजार शिक्षकांवर बदलीची वेळ?*

सकाळ वृत्तसेवा

शुक्रवार, 21 एप्रिल 2017

*प्राथमिक शिक्षणात होणार उलाढाल; दुर्गम शाळांची संख्या वाढणार*

सातारा - शिक्षकांच्या नव्या बदली धोरणामुळे प्राथमिक शिक्षण विभागात उलथापालथ होणार आहे. सुमारे सहा हजार शिक्षकांना बदलीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता शिक्षण क्षेत्रात वर्तवली जात आहे. सुगम-दुर्गम शाळांच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेतला गेल्याने त्याचे फेरसर्वेक्षण करण्याच्या हालचाली गतिमान असून, दुर्गम शाळांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.

राज्य शासनाने प्राथमिक शिक्षण बदलीसंदर्भात नव्याने धोरण ठरविल्याने राज्यभरातील शिक्षण विभागात वादळ घोंगावू लागले आहे. बदली प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात सुगम-दुर्गम शाळा ठरविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात शिक्षक बदल्या होणार आहेत. त्यामध्ये दुर्गम शाळांत तीन वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदलीचा अधिकार राहणार आहे. प्राथमिक स्थितीत जिल्हा परिषदेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल ५२८ शाळा दुर्गम, तर २१८८ शाळा सुगम ठरल्या आहे. मात्र, अनेक दुर्गम, डोंगरी भागातील शाळांवर या सर्वेक्षणात अन्याय झाला असल्याच्या तब्बल ३७२ तक्रारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. तसेच त्यात आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्यांनीही आक्षेप घेतले आहेत. त्यामुळे फेरसर्वेक्षण करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिक्षण सभापती राजेश पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे दुर्गम शाळांची संख्या ६०० च्या घरात जाण्याची शक्‍यता आहे.

दुर्गम शाळांत तीन वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस अधिकारप्राप्त असल्याने, तसेच सुगम शाळांत दहा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले बदलीस पात्र असल्याने त्यांच्या बदल्या होणार, हे निश्‍चित आहे. तसा विचार केल्यास तीन हजार शिक्षकांच्या बदल्या होऊ शकतात. मात्र, प्राथमिक शिक्षण विभागाच्या मते या धोरणानुसार तब्बल सहा हजार शिक्षकांना बदलीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने त्यांची कार्यवाही सुरू आहे. या बदल्यांमुळे शिक्षण क्षेत्रात प्रथम इतकी मोठी उलथापालथ होणार आहे.

*आकडे बोलतात...*

प्राथमिक शिक्षण विभाग
मंजूर शिक्षक पदे       ८८४२
कार्यरत शिक्षक        ८४७९
रिक्‍त पदे                   ३६६

*तालुका बदलून सर्वेक्षण*

फेरसर्वेक्षणाची तालुकानिहाय जबाबदारी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांवर दिली जाणार आहे. सर्वेक्षणात त्रुटी राहू नयेत, यासाठी तालुका बदलून सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी दिली.

*बदलीचे टप्पे...*

सुगम-दुर्गम शाळा अंतिम करणे

तालुकानिहाय समान जागा रिक्‍त करणे

विशेष संवर्गातील बदल्या करणे

अधिकारप्राप्त व पात्र शिक्षकांच्या बदल्या करणे

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज

♻'त्या' विद्यार्थ्यांना गुप्त मार्क्स मिळणार*

Updated Apr 22, 2017

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

दहिसर येथून चोरीला गेलेल्या १०वीच्या ५१६ पैकी २०० उत्तरपत्रिका शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे बोर्डाची चिंता कायम आहे. या उत्तरपत्रिका जर एका महिन्यात सापडल्या तर त्यांचे मूल्याकंन करणे शक्य आहे, अन्यथा ‘त्या’ विद्यार्थ्यांना गोपनीय पध्दतीने गुण देण्यात येतील, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.
राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या ५१६ उत्तरपत्रिका दहिसर येथील शाळेतून चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली होती. त्याप्रकरणी सध्या पोलिसतपास सुरू असून दहिसर पोलिसांनी चोरीला गेलेल्या ५१६ उत्तरपत्रिकांपैकी ३१६ उत्तरपत्रिका हस्तगत केल्या आहेत. मात्र उर्वारित २०० उत्तरपत्रिकांचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांनी बोरिवली नॅशनल पार्क परिसरातही या उत्तरपत्रिकांचा शोध घेतला होता.

एका महिन्यात जर या उत्तरपत्र‌किा सापडल्या तर बोर्डाला त्याचे मूल्यांकन करणे शक्य होईल. त्यानंतर निकालाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, याची कल्पना पोलिसांनाही देण्यात आली आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📻 बच्चे कंपनीसाठी सांगलीत आर. जे. कार्यशाळा*

By pudhari | Publish Date: Apr 22,2017

सांगली : प्रतिनिधी

उन्हाळी सुट्टीचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी दैनिक पुढारी अंकुर क्‍लब आणि आपलं एफ. एम. यांच्या वतीने लिटल रेडिओ जॉकी (आर. जे.) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

एफ. एम. हे एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण सर्वजण रोज 91.9 आपलं एफ. एम एकतो. रेडिओवरील कार्यक्रम ऐकताना यात आर. जे. कसे बोलतात, त्यांचे बोलणे सर्वांना कसे ऐकू येते, रेकॉर्डिंग कसे केले जाते, फोनवर कसे बोलले जाते याचे सर्वांनाच कुतूहल असते. हे सर्व अनुभवण्याची संधी कार्यशाळेच्या माध्यमातून बच्चे कंपनीला मिळणार आहे.

या कार्यशाळेत रेडिओ माध्यमाची ओळख, आर. जे. होण्यासाठी लागणारे गुण, मुलाखत तंत्र, आवाज आणि आवाजाची ओळख, संभाषण कौशल्य, जाहिरातीसाठी आवाज देणे, साऊंड एडिटिंग, अशा विविध गोष्टी व्यावसायिक रेडिओ जॉकीकडून शिकता येणार आहेत. ही कार्यशाळा 3 ते 10 मे या कालावधीत होणार आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ऑडिशन देणे बंधनकारक आहे. हे ऑडिशन 29 एप्रिल रोजी होणार आहे.

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी सांगली-मिरज रोड, सांगली जिल्हा परिषदेसमोर, पुढारी भवन, सांगली या पत्त्यावर अथवा प्रदीप : 9371197711, अमोल 9765566377, अक्षय : 8657343038 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃