😔 साहित्यिक प्रा. रामनाथ चव्हाण यांचे निधन*
Updated Apr 20, 2017
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ साहित्यिक रामनाथ चव्हाण यांचे दीर्घ आजाराने रुग्णालयात निधन झाले. ते ६५ वर्षे वयाचे होते. रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्वाचे लेखक म्हणून उल्लेख केला जातो. चव्हाण यांचे पार्थिव दुपारी १.३० ते २ या वेळेत अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत ठेवण्यात येणार आहे.
त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख होते.
*रामनाथ चव्हाण यांचे साहित्य :-*
आधारस्तंभ (नाटक), पारख (नाटक), भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४), घाणेरीची फुले , वेदनेच्या वाटेवरून
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
👨🏻🏫 केंद्रीय विद्यालयात शिक्षकांची १० हजार पदे रिक्त*
By pudhari | Publish Date: Apr 20 2017
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभर असणार्या २०० केंद्रीय विद्यालये आणि १२५ नवोदय विद्यालयांमध्ये प्राचार्यांची पदे रिक्त आहेत. ही माहिती मानव संसाधन विकास मंत्रायला देण्यात आलेल्या एका अहवालामध्ये देण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालयांमध्ये १० हजार पेक्षा अधिक शिक्षकांची पदेही रिक्त आहेत.
आयआयटी आणि इतर प्रमुख संस्थांमध्ये रिक्त असणारी शिक्षकांची पदे भरण्याची मागणी वारंवार होत आहे. तसेच दिल्ली विद्यापीठासारख्या केंद्रीय विद्यापीठांमध्ये असणारी रिक्त पदे भरण्याबाबतही वारंवार मागणी होत आहे. यातूनच ही माहिती समोर आली आहे. देशभरातून या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
केंद्रीय विद्यालय संगठनकडून प्रसिद्ध होणार्या २०१५-१६ च्या वार्षिक अहवालात सांगितले आहे की, प्राचार्यांच्या एकूण १०८१ पदांपैकी २०० पदे रिकामी आहेत. याबरोबरच ११३ शाळांमध्ये उपप्राचार्याची पदेही रिक्त आहेत. टीजीटी, पीजीटी आणि पीआरटीची १०,०३९ पदेही रिकामी आहेत. तर याशिवाय केंद्रीय विद्यालयात १४,१४४ शिक्षकेतर कर्मचार्यांचीही पदे रिकामीच आहेत.
सध्या केंद्रीय विद्यालय संगठनची १४,१४४ विद्यालये कार्यरत आहेत. यामध्ये तीन विदेशात आहेत. यामध्ये मास्को (रशिया), काठमांडू (नेपाळ) आणि तेहरान (इराण) याठिकाणी एक-एक केंद्रीय विद्यालय आहे.
केंद्रीय मंत्रीमंडळाने गेल्या महिन्यात देशामध्ये ५० नवीन केंद्रीय विद्यघलये उभारण्यास तसेच ६५० पदे नियमित करण्यास हिरवा कंदील दिला होता. याचा उद्देश ५० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे असणार आहे.
नवोदय विद्यालय समितीनेही आपल्या वार्षिक अहवालात अशीच सि्थती दर्शवली आहे. हिच समिती देशभरातील नवोदय विद्यालयांवर देखरेख ठेवत असते. देशातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारने एक-एक जवाहर नवोदय विद्यालयाची स्थापना केलेली आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज
🍛शालेय पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऐन उन्हाळ्यात आधार नोंदणी*
*स्वयंपाकी महिला व मदतनीसांचाही समावेश*
प्रशांत देशमुख, वर्धा | Updated: April 20, 2017
*शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना होणारा पुरवठा काही भागात वादग्रस्त ठरला.*
*राज्यातील सर्व शाळांमध्ये मोहीम सुरू करण्याचे निर्देश; स्वयंपाकी महिला व मदतनीसांचाही समावेश*
शालेय पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आधारसंलग्न नोंदणी फ सल्याने शिक्षण विभागाने परत ऐन उन्हाळयात नोंदणीचा फ तवा जारी करताना स्वयंपाक्यांचाही समावेश केला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ही मोहीम आता सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने केंद्र शासनाच्या सूचनेअंती दिले. शालेय पोषण आहारातील विद्यार्थी तसेच आहार तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिला व मदतनीस यांचेही आधार संलग्न बँक खाते अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व नोंदणीचा आढावा केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाचे मुख्य सचिव हे २८ ते ३० एप्रिल दरम्यान घेणार असल्याची ताकीदही संबंधित यंत्रणेला प्रथमच देण्यात आली आहे.
शालेय पोषण आहारातील विद्यार्थ्यांना होणारा पुरवठा काही भागात वादग्रस्त ठरला. तसेच स्वयंपाकी महिलेस दर महिना तीन हजार रुपये व मदतनीसास हजार रुपये मानधन आहे. हे मानधन देण्याबाबतही तक्रारी उद्भवल्या. या पाश्र्वभूमीवर आता नव्याने नोंदणी पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. महिन्याभरापूर्वीच या योजनेसाठी राज्य शासनाने एक स्वतंत्र विभाग स्थापन करीत योजनेचे गांभीर्य स्पष्ट केले होते. योजनेतील दोन्ही कर्मचाऱ्यांचे मानधन बँक खात्याद्वारेच करण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे. पण तसे होत नसल्याचे दिसून आले.
या पाश्र्वभूमीवर या योजनेतील प्रत्येकाचे आधारकार्ड अनिवार्य ठरल्यानंतर नोंदणी मोहिमेचा फ तवा निघाला. २४ एप्रिलपर्यंत ही माहिती देणे क्रमप्राप्त आहे. आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तालुकानिहाय प्रत्येक शाळेतून संकलित करायची आहे. त्याची माहिती एमडीएम पोर्टलवर टाकल्यानंतर परत नोंदणी करावी. शाळांना उन्हाळी सुट्टी लागणार असल्याने एप्रिलमधेच प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. आधारकार्ड नसणाऱ्या विद्यार्थ्यांचे कार्ड काढण्याचेही काम याच महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. विशेष म्हणजे बंॅक खात्याबाबत १०० टक्के काम पूर्ण न झाल्याबद्दल आक्षेप आहे. शालेय पोषण आहार योजनेची देयके मंजूर करीत अनुदान वितरित करण्यासाठी शाळांच्या बँक खात्याची माहिती अद्यावत करण्याबाबत सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले होते. ते अपूर्णच असल्याने संबंधित बँॅकेकडून परत खातरजमा करण्याची सूचना आहे. त्यासाठी विद्यार्थी, स्वयंपाकी व मदतनीस यांच्या बंॅक पासबुकाच्या झेरॉक्स प्रती जोडून पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा मुख्य सचिव या उपक्रमातील सर्व नोंदणीचा आढावा पुणे दौऱ्यात स्वत: घेणार असल्याने शिक्षण विभागाची लगीनघाई सुरू झाली आहे. रणरणत्या उन्हात शाळा शिक्षक व मुख्याध्यापक याच कार्यावर लक्ष केंद्रित करून बसल्याचे चित्र पुढे येते. विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप म्हणाले, आधार नोंदणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, झालेल्या नोंदणीत त्रुटी आहेत. मुलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता यात गोंधळ आहे. त्यामुळे तेच काम परत करावे लागणार. शाळेतील आधारची व बँक खात्यावरील संपूर्ण माहिती एकच असावी, हा या मागचा उद्देश आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎯सीबीएसई शाळांचे दुपारचे वर्ग बंद*
Updated Apr 19, 2017
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
उन्हाळ्यातही भरदुपारी शाळा सुरू ठेवण्याच्या सीबीएसईसह इतर मंडळांच्या शाळांच्या मनमानीला अखेर चाप लागला आहे. शिक्षण विभागाच्या सुधारित आदेशानंतर लगोलग दुसऱ्या दिवशी या शाळांनी दुपारचे वर्ग बंद केले आहेत. सीबीएसई शाळांमुळे प्रचंड उन्हातही विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागत असल्याचा मुद्दा ‘मटा’ने उचलून धरला होता. त्यानंतर ही सूत्रे हलली.
उन्हाळ्यामध्ये शाळा केवळ सकाळच्या सत्रात घेतल्या जाव्यात, असे आदेश शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिले होते. त्यानुसार, राज्य मंडळाच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सकाळी सुरू झाल्या होत्या. मात्र, सीबीएसई, आयसीएसईसारख्या मंडळांच्या शाळांनी दुपारी १ वाजेपर्यंत वगैरे वर्ग घेण्याचे आडमुठे धोरण स्वीकारले होते. अनेक पालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. ‘मटा’ने देखील दुपारी चालणाऱ्या सीबीएसई शाळांचा आणि मुलांच्या आरोग्याचा मुद्दा उचलून धरला होता. त्यामुळे, मंगळवारी नागपूरचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. सर्व मंडळाच्या सर्व शाळांनी सकाळच्या सत्रातच शाळा घ्याव्या, अशा सक्त सूचना उपसंचालकांनी दिल्या. या घटनाक्रमानंतर लगेचच बुधवारपासून शाळांनी आपल्या वेळांमध्ये बदल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ख्यातनाम शाळांनी दुपारच्या सत्रातील वर्ग बंद केले आहेत. पहिली ते पाचवी या वर्गांना बुधवारपासून पूर्णपणे सुटी देण्यात आली आहे. सहावी ते बारावीचे वर्ग आता केवळ ११ वाजेपर्यंत घेण्याचा निर्णय अनेक शाळांनी घेतला आहे.
अनेक शाळा सकाळी सुरू होऊन दुपारी १२ ते १२.३० वाजतापर्यंत चालत होत्या. त्यानंतर, स्कूल बस, ऑटोरिक्षा, व्हॅन या वाहनांनी घरी पोचण्यासाठी किमान अर्धा तास लागतो.
शाळेतून विद्यार्थ्यांना घरी पोहोचेपर्यंत १ ते २ वाजत असत. दिवसातील सर्वाधिक उष्ण काळात विद्यार्थी स्कूलबसमध्ये प्रवास करीत असल्याचे चित्र अनेक सीबीएसई शाळांमधून दिसत आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचाच हा नियम असून, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळ्यात वर्ग घेतले जातात, असे शाळांकडून सांगण्यात येत होते.
या निर्णयांमुळे भर दुपारी भरणाऱ्या वर्गांवर बंधन येणार आहे. अनेक पालक आणि शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या आदेशाचे स्वागत केले आहे.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃
🎨सांगलीत शनिवारी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद*
By pudhari | Publish Date: Apr 20,2017
सांगली : प्रतिनिधी
राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, सांगली जिल्हा कलाध्यापक संघातर्फे शनिवारी व रविवारी सांगलीत कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन येथे 38 वी राज्यस्तरीय कलाशिक्षण परिषद होणार आहे, अशी माहिती कलाध्यापक संघ महामंडळाचे उपाध्यक्ष दादा भगाटे, प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी दिली. कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी, वंदना हुलबत्ते उपस्थित होते.
कला शिक्षण परिषदेचे उद्घाटन शनिवारी (दि. 22) सकाळी 10.30 वाजता आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते व खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. भारत सरकारच्या अॅनिमेटर-फिल्म डिव्हिजनचे भीमाशंकर शेंडगे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवले जाणार आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, सुमन पाटील, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, अनिलराव बाबर, सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर हारूण शिकलगार, गौतम पाटील उपस्थित राहणार आहेत. शनिवारी दुपारी दीड वाजता ‘प्राथमिक व माध्यमिक शाळेतील कला विषयाची सद्य:स्थिती’, दुपारी 4 वाजता ‘कला इतिहास आणि कला अभिव्यक्ती’, सायंकाळी साडेपाच वाजता ‘ग्रेड परीक्षा आणि वाढीव गुणांची सवलत’ या विषयावर चर्चासत्र व रात्री 9 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रविवारी सकाळी 9 वाजता शिल्पकार, चित्रकारांची कला प्रात्यक्षिके होणार आहेत. स. 11 वाजता ‘कला शिक्षण आणि कला संचालनालय’ हे चर्चासत्र, दुपारी 12 वाजता खुले चर्चासत्र आहे.
*कला शिक्षकांच्या मागण्या*
प्राथमिक शाळांमध्ये कलाशिक्षक नेमावेत, निवृत्तीनंतर त्या जागेवर कलाशिक्षकांचीच नेमणूक करावी, ए. एम. शैक्षणिक अर्हता प्राप्त कला शिक्षकांना विनाअट वेतनश्रेणी आदी मागण्या असल्याचे भगोटे, पाटील, माळी यांनी सांगितले.
🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃